त्रिपुरारी पौर्णिमा महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव-दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. संपूर्ण भारतात कार्तिकोत्सव कुठे एक दिवस, कुठे ५ दिवस तर कुठे १० दिवस साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेची एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी – एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण अशी चर्चा चालू होती. तेंव्हा शंकराने आपले ज्योती-रूप प्रकट केले. त्याने ब्रह्मा व विष्णूला त्या ज्योतीचा आदी आणि अंत शोधायला पाठवले. ब्रह्मा ज्योतीच्या आकाशाकडचे टोक शोधायला निघाला, तर विष्णू पाताळाकडचे. फार काळ, फार अंतर पार केल्यावर, ब्रह्माला त्या प्रकाशामध्ये तरंगणारे फुल दिसले. ते शिवाच्या जटेतील ३०,००० वर्षांपूर्वी वाहिलेले फुले होते. तेंव्हा ब्रह्माने तोच आरंभ आहे असे मानले.

कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव-दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. संपूर्ण भारतात कार्तिकोत्सव कुठे एक दिवस, कुठे ५ दिवस तर कुठे १० दिवस साजरा केला जातो.
कार्तिक पौर्णिमेची एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी – एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण अशी चर्चा चालू होती. तेंव्हा शंकराने आपले ज्योती-रूप प्रकट केले. त्याने ब्रह्मा व विष्णूला त्या ज्योतीचा आदी आणि अंत शोधायला पाठवले. ब्रह्मा ज्योतीच्या आकाशाकडचे टोक शोधायला निघाला, तर विष्णू पाताळाकडचे. फार काळ, फार अंतर पार केल्यावर, ब्रह्माला त्या प्रकाशामध्ये तरंगणारे फुल दिसले. ते शिवाच्या जटेतील ३०,००० वर्षांपूर्वी वाहिलेले फुले होते. तेंव्हा ब्रह्माने तोच आरंभ आहे असे मानले.

परत येऊन त्याने शंकराला खोटेच सांगितले, की मी तुझ्या ज्योती-रूपाचा आरंभ पहिला! इतक्यात विष्णू पण परत आला. विष्णूने हात जोडून, सत्य सांगितले, “मला काही तुझा अंत लागत नाही!” शंकराने प्रसन्न होऊन विष्णूला वर दिला, “भूलोकी तुझी अनेक मंदिरे बांधून, तुझी पूजा केली जाईल!” आणि ब्रह्माला मात्र शाप दिला, “तुझे मंदिर कोणी बांधणार नाही!” कार्तिक पौर्णिमा त्या अनादी, अनंत ज्योतीचा हा उत्सव आहे.

त्रिपुरी पौर्णिमेला शंकराला शेकडो वातींचा दिवा लावायची प्रथा आहे. तर शिवालायांमधून आज रुद्राभिषेक केला जातो.
कार्तिक पौर्णिमेसाठी दिव्यांनी सजलेले तामिळनाडूचे अरुणाचलेश्वर शिव मंदिर. इथे कार्तिक पौर्णिमेचा उत्सव सौर कॅलेंडर प्रमाणे साजरा केला जातो. या उत्सवाला कार्थिकै दिपम् किंवा कार्थिकै ब्रह्मोत्सव सुद्धा म्हणतात.
कार्तिक पौर्णिमेची अजून एक गोष्ट अशी आहे – तारकासुर नावाच्या असुराची. त्याला तीन मुले होती – ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. त्या तिघांनी एक एक नगरी अर्थात ‘पूर’ वसवले होते. देवासुरांच्या युद्धात शंकराने या असुरांना त्यांच्या तीन पुरांसकट नष्ट केले. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. शंकरची म्हणजे ‘तीन पुरांच्या अरीची’ ही ‘त्रिपुरारी’ पौर्णिमा. असुरांच्या जाचातून सुटल्याने आनंदलेल्या देवांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली!

या तारकासुराने ब्रह्माकडून ‘अमर’ होण्याचा वर मागितला होता. ब्रह्मा म्हणाला, “असे काही मी देऊ शकत नाही. तू दुसरे काहीतरी माग.” तेंव्हा त्याने, “मला शिवाच्यापुत्राकडून मृत्यू येवो.” असे मागितले. त्यावेळी सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मदहन केले होते. आणि शंकर अत्यंत दु:खी होऊन कित्येक वर्ष समाधी लावून बसले होते. या वराने तारकासुर जवळ जवळ अमर झाल्यासारखाच होता. पुढे पार्वतीची तपश्चर्या, शिव-पार्वती विवाह आणि कार्तिकेयचा जन्म झाला. आणि तारकासुराचा वध कार्तिकेयने केला. कार्तिकी पौर्णिमेला कार्तिकेयाचे दर्शन घेण्याची पद्धत आहे.


राजस्थान मधील पुष्कर येथे एक ब्रह्ममंदिर आहे. या ब्रह्ममंदिरात त्रिपुरी पौर्णिमेला फार मोठा मेळा भरतो. उंट, शेळ्या, मेंढ्या, गायी यांची या मेळ्यात खरेदी-विक्री केली जाते. कार्तिक पौर्णिमेला, पुष्कर सरोवरात दीपदान करायची पद्धत आहे.
वाराणसीला गंगेच्या घाटावर हजारो दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते.

देव दिवाळी, गंगा घाट, वाराणसी
शिवाय शिप्रा, नर्मदा, गोमती व इतर अनेक नद्यांमध्ये दीपदान केले जाते. दीपदान करावयाचे दिवे – शास्त्राप्रमाणे गव्हाच्या पिठाचे किंवा मातीचे असावेत. त्यामध्ये तेलाचा नाहीतर तुपाचा दिवा लावावा. असे दिवे नदी प्रदूषित करत नाहीत.
कार्तिकी पौर्णिमेला, महाराष्ट्र, गोवा येथील मंदिरांमधून शेकडो दिवे लावून दीपमाळा प्रज्वलित केली जाते.
ही कार्तिक पौर्णिमा आपले जीवन ज्ञानाच्या, समृद्धीच्या आणि आणि आणंदाच्या प्रकाशाने ऊजळू दे.

त्रिपुरी पौर्णिमा कथा

एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण अशी चर्चा चालू होती. तेंव्हा शंकराने आपले ज्योती-रूप प्रकट केले. त्याने ब्रह्मा व विष्णूला त्या ज्योतीचा आदी आणि अंत शोधायला पाठवले. ब्रह्मा ज्योतीच्या आकाशाकडचे टोक शोधायला निघाला, तर विष्णू पाताळाकडचे. फार काळ, फार अंतर पार केल्यावर, ब्रह्माला त्या प्रकाशामध्ये तरंगणारे फुल दिसले. ते शिवाच्या जटेतील ३०,००० वर्षांपूर्वी वाहिलेले फुले होते. तेंव्हा ब्रह्माने तोच आरंभ आहे असे मानले. परत येऊन त्याने शंकराला खोटेच सांगितले, की मी तुझ्या ज्योती-रूपाचा आरंभ पहिला! इतक्यात विष्णू पण परत आला. विष्णूने हात जोडून, सत्य सांगितले, “मला काही तुझा अंत लागत नाही!” शंकराने प्रसन्न होऊन विष्णूला वर दिला, “भूलोकी तुझी अनेक मंदिरे बांधून, तुझी पूजा केली जाईल!” आणि ब्रह्माला मात्र शाप दिला, “तुझे मंदिर कोणी बांधणार नाही!” कार्तिक पौर्णिमा त्या अनादी, अनंत ज्योतीचा हा उत्सव आहे.
त्रिपुरी पौर्णिमेला शंकराला शेकडो वातींचा दिवा लावायची प्रथा आहे. तर शिवालायांमधून आज रुद्राभिषेक केला जातो.

कार्तिक पौर्णिमेची अजून एक गोष्ट अशी आहे

तारकासुर नावाच्या असुराची. त्याला तीन मुले होती – ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. त्या तिघांनी एक एक नगरी अर्थात ‘पूर’ वसवले होते. देवासुरांच्या युद्धात शंकराने या असुरांना त्यांच्या तीन पुरांसकट नष्ट केले. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. शंकरची म्हणजे ‘तीन पुरांच्या अरीची’ ही ‘त्रिपुरारी’ पौर्णिमा. असुरांच्या जाचातून सुटल्याने आनंदलेल्या देवांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली!


या तारकासुराने ब्रह्माकडून ‘अमर’ होण्याचा वर मागितला होता. ब्रह्मा म्हणाला, “असे काही मी देऊ शकत नाही. तू दुसरे काहीतरी माग.” तेंव्हा त्याने, “मला शिवाच्यापुत्राकडून मृत्यू येवो.” असे मागितले. त्यावेळी सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मदहन केले होते. आणि शंकर अत्यंत दु:खी होऊन कित्येक वर्ष समाधी लावून बसले होते. या वराने तारकासुर जवळ जवळ अमर झाल्यासारखाच होता. पुढे पार्वतीची तपश्चर्या, शिव-पार्वती विवाह आणि कार्तिकेयचा जन्म झाला. आणि तारकासुराचा वध कार्तिकेयने केला. कार्तिकी पौर्णिमेला कार्तिकेयाचे दर्शन घेण्याची पद्धत आहे.


राजस्थान मधील पुष्कर येथे एक ब्रह्ममंदिर आहे. या ब्रह्ममंदिरात त्रिपुरी पौर्णिमेला फार मोठा मेळा भरतो. उंट, शेळ्या, मेंढ्या, गायी यांची या मेळ्यात खरेदी-विक्री केली जाते. कार्तिक पौर्णिमेला, पुष्कर सरोवरात दीपदान करायची पद्धत आहे.
वाराणसीला गंगेच्या घाटावर हजारो दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते.
शिवाय शिप्रा, नर्मदा, गोमती व इतर अनेक नद्यांमध्ये दीपदान केले जाते.
दीपदान करावयाचे दिवे – शास्त्राप्रमाणे गव्हाच्या पिठाचे किंवा मातीचे असावेत. त्यामध्ये तेलाचा नाहीतर तुपाचा दिवा लावावा. असे दिवे नदी प्रदूषित करत नाहीत.
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

दिनविशेष व्रते

कार्तिक पौर्णिमा आवळी-पूजन

कार्तिक पौर्णिमेस आवळी वृक्षाची पूजा करतात. मृदुमान्य दैत्याने देवांना स्वर्गातून स्थानभ्रष्ट केले. तेव्हा देवांनी पृथ्वीवर येऊन आवळीच्या झाडाचा आश्रय घेतला. त्या दिवसापासून या वृक्षाला या दिवशी पूज्यत प्राप्त झाली. म्हणून कार्तिक पौर्णिमेस या वृक्षाची पूजा विहित आहे. पूजेच्या वेळी आवळीला सूत गुंडाळतात. श्रीफलयुक्त अर्घ्य देतात. तिच्या चारी दिशांना बलिदान करतात. अष्ट दिशांना तुपाचे दिवे लावतात. पुढील मंत्राने प्रार्थना करतात

धात्रिदेवि नमस्तुभ्यं सर्वपापक्षयंकरि ।
निरोगं कुरु मां नित्यं निष्पापं धात्रि सर्वदा ॥

नंतर पितरांचे तर्पण, घृतपात्रदान व दंपतीभोजन करून व्रत समाप्त करतात.

 
कार्तिकी व्रत

तामिळ लोकांचे एक व्रत. कार्तिकी पौर्णिमेस पंचमहाभूतांप्रीत्यर्थ हे व्रत करतात. यात अग्नीला प्राधान्य असते. यामुळेच सूर्यास्तानंतर घरीदारी दिवे लावून सर्वत्र प्रकाश करणे हे या व्रताचे वैशिष्ट्य आहे.
दक्षिण अर्काट जिल्ह्यातील तिरुवन्नमलाईच्या शिव-मंदिरात हा व्रतोत्सव थाटाने साजरा करतात. या वेळी त्या सर्व डोंगरावर रोषणाई होते व शिखरावर एक मोठी मशाल पेटविली जाते. या उत्सवात पालापाचोळा एकत्र करून जाळण्याची प्रथा आहे.
निचेंगोडू, पळणि व वेदारण्यम् व तिरुचेंदूर येथेही हा उत्सव करतात. याच्या कथेचे पर्याय पुढीलप्रमाणे
(१) सर्वांगाच दाह होत होता म्हणुन बलिराजाने हे व्रत केले.

(२) महिषासुराशी लढताना शिवलिंग भग्न झाले, म्हणून त्या पापाच्या क्षालनासाठी पार्वतीने हे व्रत केले.

 
त्रिपुरीज्वलन व्रत

कार्तिक पौर्णिमेस या व्रताचे नाव आहे. या पौर्णिमेस आरंभ करून पुढील वर्षाच्या कार्तिकी पौर्णिमेस व्रताचे उद्यापन करतात. या व्रताचा मुख्य देव शिव आहे. दरमहा पौर्णिमेला शिवापुढे निरनिराळ्या प्रकारच्या ७५० वाती लावणे, निरनिराळी दीपपात्रे दान करणे, नैवेद्यासाठी निरनिराळे अन्नपदार्थ करणे, शिवाच्या निरनिराळ्या नावांचा आदेश करून ते पदार्थ शिवाला अर्पण करणे, असा या व्रताचा विधी आहे. दुसर्‍या दिवशी दांपत्याला भोजन घालून वस्त्रालंकारांनी त्याची संभावना करायची असते. उद्यापनाच्या दिवशी संकल्पपूर्वक ब्रह्मादी देवतांची स्थापना, कलशावर पूर्णपात्रात शिवाची सुवर्ण प्रतिमा ठेवून तिची पूजा करतात. नंतर पितळेच्या दीपपात्रात अठरा धाग्यांनी बनविलेल्या ७५० वाती तुपात भिजवून त्यांनी देवाची आरती करतात. रात्री जागरण करून दुसर्‍या दिवशी समिधा, तीळ पायस व तूप या हविर्द्रव्यांनी हवन करतात. शेवटी गोदान, पीठदान करून बारा दापंत्यांना यथाशक्‍ती वस्त्रालंकार व सौभाग्य वायने देतात.

 
त्रिपुरी पौर्णिमा
कीटा: पतंगा: मशकाश्‍च वृक्षा
जले स्थले ये विचरन्ति जीवा: ।
दृष्ट्वा प्रदीपं न च जन्मभागिनो
भवन्ति नित्यं श्‍वपचा हि विप्रा: ॥ 

स्कंदजयंती कार्तिकी पौर्णिमे दिवशी स्कंदजयंती मानतात व त्या दिवशी स्कंदमूर्तीची पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेस कृत्तिका नक्षत्र असताना स्कंदाचे दर्शन घेणारा धनवान व वेदपारंगत होतो. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजा करून एका उंच स्तंभावर अग्नी प्रज्वलित करतात.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी
कार्तिक शुद्ध १५
कार्तिक शु. १५ हा दिवस त्रिपुरी पोर्णिमेचा म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवसाचें महात्म्य पुराणग्रंथांतून सांपडतें. पूर्वी त्रिपुरासूर नांवाचा एक दैत्य फार उन्मत्त झाला होता. आपल्या राजधानीभोंवतीं तीन मोठे तट निर्माण करुन तो अजिंक्य झाला होता. इंद्रादिक देवांचेंहि त्याच्यापुढें कांहीं चालत नव्हतें, तेव्हा नारदाच्या सांगण्यावरुन सर्व देव शंकरास शरण गेले, व त्यांनीं त्रिपुर दैत्याचा नाश करण्यासाठीं शंकराला विनंति केली. शंकरानें ती मान्य करुन आपल्या प्रचंड सामर्थ्यानें त्रिपुरासुराचा नाश केला. तो दिवस कार्तिक शु. १५ हा होता. या विजयाची स्मृति आजपर्यंत भारतीयांनीं कायम ठेविली आहे.

या दिवशीं सर्व शिवालयांतून दीपोत्सव करण्यांत येत असतो. कांहीं प्रांतांत हा दिवस शिवाच पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय याचा जन्मदिवस म्हणून पाळतात; आणि तत्प्रीत्यर्थ त्याच्या मूर्तीची पूजा-अर्चा करण्यांत येते. तारकासुराचा नाश करणारा हाच वीर असून तो अतिशय सुंदर होता. या विजयाची स्मृति आजपर्यंत भारतीयांनीं कायम ठेविली आहे. या दिवशी सर्व शिवालयांतून दीपोत्सव करण्यांत येत असतो. कांहीं प्रांतांत हा दिवस शिवाचा पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय याचा जन्मदिवस म्हणून पाळतात; आणि तत्प्रीत्यर्थ त्याच्या मूर्तीची पूजा-अर्चा करण्यांत येते.

तारकासुराचा नाश करणारा हाच वीर असून तो अतिशय सुंदर होता. दक्षिण हिंदुस्थानांत शिवासाठीं कृत्तिका नांवाचा महोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. सर्वत्र उत्कृष्ट प्रकारचा साज-शृंगार करुन मिरवणूक, महापूजा, वगैरे उत्सव मोठ्या प्रमाणावर होत असतात. “सुमारे पंचवींस हात उंचीचा खांब देवळासमोर उभा करुन त्यावर कापूर व इतर ज्वालाग्राही पदार्थ घालून तो पेटवून देतात. तिरुवण्णामल्ली, त्रिचनापल्ली, तिरुलन्नी, इत्यादि ठिकाणीं जेथें जेथें टेकडी आहे अशा ठिकाणी दीपोत्सव करण्यांत येत असतो.”

पुराणांत सांगितलेल्या त्रिपुरासुराच्या वधाचा उल्लेख रुपकात्मक असावा असें कित्येकांचें मत आहे. “क्रोध, लोभ व मोह हे (असुर) प्रबल झाले म्हणजे इंद्रियांना (देवाना) त्रास देतात, तेव्हां इंद्रियें आत्म्यास (शिवास) शरण जातात आणि मग तो आत्मा एकाच बाणानें त्रिपुरांना (स्थूल, सूक्ष्म व कारण या तीन शरिरांना) व्यापून असणारे कामक्रोधादि जे असुर त्यांचा वध करतो. अशी कल्पना रुपक सोडविताना करण्यांत येते.

वातींचे प्रकार.

🔹१) नंदादीप वात- किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी- ही ५, ७, ९ पदरी असते शक्यतोवर ५ किंवा ७ पदरी असते. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.

🔹२) बेल वात- ह्या श्रावणात महिनाभर लावतात. एकाला जोडून एक अश्या ३ वाती करतात (४+४+३ पदरी) एकूण अकरा पदर. ह्या कोणी रोज महिनाभर ११ वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात.

🔹३) शिवरात्र वात- महाशिवरात्रीला ११०० पदराची वात तुपात भिजवून लावतात.

🔹४) वैकुंठ वात- ३५० पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशीला लावतात. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात.

🔹५) त्रिपूर वात- तीन पदराच्या जोडून (३६५ +३६५) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.

🔹६) अधिक महिन्याची वात- ३३ पदरी ३३ वाती, ३३ फुलवाती तुपात भिजवून लावतात. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.

🔹७) कार्तिकी वात- एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत ३ पदरी १०५ वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच १०५ वाती लावतात.

🔹८) काड वाती- तुळशीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळून गणपतीला, होमहवन, पुरण आरती करतात.

🔹९) श्रावण वात- रोज महिनाभर ११ पदराच्या ११ वाती लावतात.

🔹१०) फुलवाती- ह्या निरंजनात रोज लावतो आरतीच्या वेळी.

११) लक्ष्मी वात- शीघ्र लक्ष्मीप्राप्तीसाठी कुंकू लावलेली लाल रंगाची फुलवात, ह्या निरंजनात लावतात आरतीच्या वेळी.

🔹१२) कुबेर लक्ष्मी वात- शीघ्र लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी कुंकू लावलेल्या लाल फुलवाती सोबत एक लवंग शुद्ध तुपासोबत चांदीच्या निरंजनीत ठेवतात.

🔹१३) अनंतवात- ह्यामधे एक वशाची एक वात, दोन वशाच्या दोन वाती, तीन वशाच्या तीन, असे १०८ वशाच्या १०८ वाती करतात व तुपात भिजवून श्रीकृष्णाला ओवाळतात.

🔹१४) देह वात- आपल्या डोक्यावर टाळुपासून ते पायाच्या अंगठ्या पर्यंतची उंची मोजून घेऊन तेवढ्या लांबीची १०८ किंवा ३६५ पदरी वात करतात व ती तेलात भिजवून ज्याच्या मापाची केलीय त्या व्यक्तीने लावायची असते.

🔹१५) ब्रम्हांड वात- आपल्या कपाळावर कुंकू लावतो त्या जागेपासून पुर्ण डोक्याला फेर घेऊन ते मोजून तेवढ्या लांबीची २५० पदरी वात बनवतात व ज्याच्या मापाची आहे त्यांचे हातून तीळ तेलात भिजवून लावतात.

🔹१६) काकडा- काळ्या कपड्याचे बारीक तुकडे करून त्याच्या वाती करून काकड आरतीला लावायच्या, दृष्ट काढणे किंवा नजर उतरणे यासाठीही या वाटेचा उपयोग केला जातो.

🔹१७) दिवटीची वात – खंडोबाच्या नवरात्रात दिवट्या बुधल्यां साठी ही वात तयार केली जाते.

🔹१८) मशाल आणि टेंभे – जागरण आणि गोंधळ, या कार्यक्रमांसाठी मशाल आणि टेंभें यांच्या वाती तयार करतात.

१९) कंदील वात- दिवाळीच्या वेळेस दीपमाळ, आकाश दिवे, काचेचे कंदील, शेगडी इत्यादींसाठी सुती धाग्यांच्या वीणीच्या जाड चपट्या सुतासारख्या वाती.

🔹२०) दारुगोळा वात- फटाके आणि तोफांच्या दारूगोळ्याच्या कामी येणारी ही वेगळ्या प्रकारची वात असते.

🔹२१) रथ सप्तमी- ला ७ पदरी.
🔹२२) कृष्णाला- ८ पदरी.
🔹२३) रामनवमीला- ९ पदरी.
🔹२४) दशावतारीवात- विष्णूला– १० पदरी.
🔹२५) शंकराला- ११ पदरी.
🔹२६) सूर्याला- १२ पदरी.
🔹२७) वैकुंठ चतुर्दशीला- १४ पदरी.
🔹२८) गणपतीला- २१ पदरी.

हे सगळे वर्षभर करायचे असेल, तर नेम म्हणून तर त्या त्या दिवसापासून परत त्या दिवसापर्यंत व्रत करतात करणारे, जसे रथसप्तमी ते रथसप्तमी, गोकुळष्टमी ते गोकुळाष्टमी…

वरील सगळ्या वाती वसा काढूनच करतात, आणि जितकी पदरी पाहिजे तितके पदर गुंडाळायचे. फक्त जोडवाती म्हणजे एकाला एक दोन वाती जोडायच्या म्हणजे एक पूर्ण झाली की न तोडता दुसरी करायची.

३ पदरी असते ही वात… ३+३ पदर..
बेलवाती पण एकाला एक जोडून ३ वाती, ४,४,३ पदरी.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

कार्तिकस्नान, त्रिपुरारी पौर्णिमा, हरिहर मिलन महात्म्य विधी फळ

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *