श्रीगणेश भाग ७ देवनागरी लिपीचा आद्य निर्माता श्रीगणेश

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आपण जी देवनागरी लिपी वापरतो त्या
देवनागरी लिपीचा आद्य निर्माता श्रीगणेश आहे.

देवनागरी लिपी वैशिष्टे

जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब उच्चार करता येतो.
या लिपीत एकूण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.

भारत तसेच आशिया मधील अनेक लिप्यांचे (उर्दू सोडून) संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे.

जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब उच्चार करता येतो.
या लिपीत एकूण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.

भारत तसेच आशिया मधील अनेक लिप्यांचे (उर्दू सोडून) संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे.

आपले विचार शब्दांच्या किंवा कोणत्याही माध्यमातुन व्यक्त करण्याचे कार्य भाषा करते. तत्त्व: कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहिता येते. प्रत्यक्षात हे बरेचसे जमले तरी पूर्णपणे शक्य होत नाही. भाषेची लिपी त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठी असते. एखाद्या भाषेत जर विशिष्ट उच्चार नसतील तर तिच्या लिपीतही ते दाखवणाऱ्या अक्षरखुणा नसतात.

इंग्रजीत ख, च, छ, ठ, फ, घ, ढ, भ, ष, ळ हे उच्चार नाहीत. तमिळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध, फ, ब, भ, श, स, ह ही अक्षरे लिहिता येत नाहीत, पण यांच्यापैकी काही उच्चार आहेत. त्यामुळे लिप्यंतरावर मर्यादा पडतात.

उदाहरणार्थ
मराठीतला ‘पाटील” हा शब्द रोमन लिपीत Patil असा लिहिला जातो. त्याचा उच्चार पतिल/पतिळ/पॅतिल/पॅतिळ/पातिल/पातिळ/पाटिळ असा काहीही होऊ शकतो. देवनागरी लिपीत जगातल्या बहुसंख्य भाषांचे बहुतेक उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता असल्याने, तुलनात्मक दृष्ट्या या दृष्टिकोणातून देवनागरी ही एक उत्कृष्ट लिपी समजली जाते.

मराठीमध्ये वापरला जाणारा संगणक हा शब्द देवनागरी लिपीत `संगणक’ असा तर रोमन लिपीत ‘sanganaka’ असा लिहितात. तसेच त्याला इंग्रजी भाषेतला समानार्थी शब्द computer हा देवनागरीतून कम्प्यूटर किंवा कॉम्प्यूटर असा लिहिला आणि यशस्वीरीत्या वाचलाही जाऊ शकतो.

श्रीगणेश* भाग ७

गणपती हे आराध्य दैवत आहे. गणपती हा दशदिशांचा स्वामी आहे. त्याच्या परवानगीशिवाय इतर देवतादेखील कोणत्याही दिशेने पूजास्थानी येऊ शकत नाही. भारतात मोठ्या संख्येने लोक गणपतीची पूजाअर्चा व साधना करतात. सर्व धार्मिक गोष्टींचा प्रारंभ गणेश पूजन व गायनाने होतो.
गणेश हे दैवत सर्वार्थाने केवळ अलौकिक आहे. त्याचे सामर्थ्य अपार आहे.

गणपती हा स्थिर बुद्धीचा, शांत स्वभावाचा आणि समोर असलेली व्यक्ती मग ती देव असो किंवा राक्षस असो, कितीही संतापली, रागाच्या पूर्णपणे आहारी गेली तरी गणपती आपला शांतपणा कधीही सोडीत नाही. तो नृत्य, नाट्य अशा क्षेत्रांचा आदिदेव आहे. कोकणातील दहीकाले त्यांच्या पद्धतीने गणेशवंदना करूनच सुरू होतात. तर तमाशाच्या फडावर प्रारंभी जो गण केला जातो तीसुद्धा गणेशवंदनाच आहे आणि त्यामुळेच अनेक शाहिरांनी, तमासगीरांनी गणेश नमनपर खूपच रचना केल्या आहेत.

अगदी ऋग्वेदापासून तमाशाच्या बोर्डापर्यंत गणेशाचा जयजयकार सर्वत्र झालेला आहे, तो का? गणपतीबद्दल मराठी माणसांत नांदणारी श्रद्धा ही उपजतच असते.
आपण जी देवनागरी लिपी वापरतो त्या देवनागरी लिपीचा आद्य निर्माता श्रीगणेश आहे. गणपती आणि मराठी माणूस यांचा स्नेहबंध अगदी पुरातन काळापासून आजवर अबाधित राहिलेला आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांनी गणपतीच्या स्वरूपाचे रूपक योजून त्याचा साहित्य सृष्टीशी निकटचा संबंध कसा आहे ते दाखविले.

सर्व संतांनी गणपतीच्या स्तवनपर रचना केल्या आहेत. इतकेच नव्हे, तर शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांनीही गणपतीवर एक भक्तिगीत लिहिले आहे. मराठी मुलखात गणेशोत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा केला जातो ते आपण पाहतोच. मराठी माणूस कुठेही गेला तरी तो उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो.


आपल्याकडे भक्तीचे मुख्य प्रकार दोन. एक सकाम आणि दुसरी निष्काम. सकाम म्हणजे मनात काहीतरी इच्छा व अपेक्षा बाळगून केलेली भक्ती आणि निष्काम म्हणजे कोणतीही अपेक्षा न बाळगता केलेली भक्ती. गणेशोत्सव साजरा करणारे लोक भक्तिभावपूर्वक हा उत्सव साजरा करतात हे मान्य केले तर या भक्तीला आपण काय म्हणू शकतो? ही भक्ती सकाम आहे की निष्काम? “सुखकर्ता, दुःखहर्ता’ ही आरती म्हणताना “दर्शनमात्रे मनकामनापूर्ती’ अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो.

“लाडूमोदकअन्ने परिपूरीत पात्रे’ या आरतीत “अष्टहिसिद्धिनवनिधी देसी क्षणमात्रे’ याही आरतीत काही अपेक्षा आहेतच.
अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्येही अपेक्षा व्यक्त झालेल्या आढळतात आणि गणेशभक्त जी सजावट करतात आणि गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जे सतत जागरूक असतात तीसुद्धा एक गणेशभक्तीच आहे आणि गणपतीसमोर बोलले जाणारे नवस, त्याला अर्पण करण्यात येणारे विविध उपचार हे सगळे सकाम असतात.

मग कामना पुरविण्याचे सामर्थ्य या गणपतीपाशी आहेच ना!
इतक्या प्रदीर्घ काळ चाललेल्या या सकाम आराधनेला देशपातळीवर प्रतिसाद का मिळू नये? एक गोष्ट खरी, की चार युगे एक हजार वेळा झाल्यावर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. म्हणजे आपल्या दृष्टीने लक्षावधी वर्षांचा काळ म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. त्यामुळे देवाच्या लेखी शंभर किंवा हजार वर्षे हा काही मोठा कालखंड नव्हे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

गणपतीची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी पाहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *