देवाच्या सेवेतील बत्तीस अपराध

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सेवेतील बत्तीस अपराध

 १) पादत्राणे घालून मंदिर प्रवेश.

२) भगवंताचे जन्म उत्सव , जयंती न करणे.

३)  श्रींची मुर्ती दिसुनही प्रणाम – वंदन न  करणे.

४) अपवित्र अवस्थेत देव दर्शन करणे.

५) देवाला एका हाताने प्रणाम करणे.

६) प्रदक्षिणा करतांना देवाच्या मूर्तीच्या समोर आल्या नंतर किंचितही न थांबता पुढे पहातच प्रदक्षिणा करणे.

७) देवांच्या मुर्ती समोर पाय पसरुन बसणे.

८) मुर्ती समोर गुढघे वर करुन त्याला हातांचा विळखा घालून बसणे.

९) मुर्ती समोर झोपणे.

१०) देवांच्या समोर जेवण करणे.

११) देवांच्या समोर खोटं बोलणे.

१२) देवांच्या – श्रेष्ठांच्या समोर मोठमोठ्याने बोलणे.

१३) देवांच्या मूर्ती समोर आपसात फुसफुस करणे.

१४) श्रीमुर्ती समोर ओरडणे.

१५) देवा समोर कलह – भांडण करणे.

१६) श्रीमुर्ती समोर कोणालाही त्रास देणे.

१७) श्रीमुर्ती समोर  कोणालाही अनुग्रह देणे.

१८) मंदिरात कोणाला निष्ठुर बोलणे.

१९) देवा समोर पुर्ण शरीर चादर – घोंगडी  आदिने झाकुन घेणे.

२०) देवांच्या समोर कोणाची निंदा करणे.

२१) देवांच्या समोर देव सोडुन दुस-यांची स्तुती करणे.

२२) श्रीमुर्ती समोर अश्लील बोलणे.

२३) श्रीमंदिरात अधोवायुचा मुद्दाम त्याग करणे.

२४) पात्रता असुनही गौण अर्थात सामान्य उपचाराने भगवंताची पुजा करणे.

२५) भगवंताला नैवेद्य दाखवण्या अगोदरच कोणत्याही वस्तुचे सेवन करणे .

२६) ज्या ऋतु मध्ये जे फळ असेल त्याचा नैवेद्य भगवंताला न दाखविणे. अर्पण न करणे.

२७) कोणत्याही फळाचा अग्रभाग तोडुन तो देवाला अर्पण करण्यासाठी देणे.

२८) भगवंताच्या मुर्तीकडे पाठ करुन बसणे.

२९) भगवंताच्या मुर्तीच्या समोर दुस-या कोणाला तरी प्रणाम करणे.

३०) श्रीगुरुंची सेवा न करणे , त्यांचे कुशल विचारपुस न करणे , त्यांचं स्तवन न करणे , त्यांना प्रणाम न करणे.

३१) आपणच आपली स्तुती करणे .

३२) कोणाही देवांची – गुरुंची निंदा करणे.

 हे बत्तीस सेवा अपराध शास्त्रात  मानले आहेत – सांगितले आहेत.श्रीमद् भागवत महापुराण वाचुन खात्री करून घ्यावी. शक्यतो अपराध टाळण्याचे प्रयत्न करावेत.

(७०६ )

जय हरि

माऊली शिष्य हंसराज महाराज मिसाळ यांचा सविनय

हंसराज महाराज मिसाळ

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

  1. पती पत्नी च्या एकमेकांच्या पाप पुण्यातील वाटा…याबद्दल माहिती द्यावी…ही विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *