पाण्‍यासंबंधी स्वप्न व त्याचे फळ, स्वप्नशास्र भाग ३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वप्न सूची पहा

🌹 *स्वप्नशास्र* 🌹

*भाग ३*

*पाण्‍यासंबंधी स्वप्ने*

आपण समुद्राचे काठी उभे असून आपल्‍या सभोवती लाटा आलेल्‍या स्‍वप्‍नात पाहिल्‍यास आपल्‍यावर दुर्निवार संकटे येतील. जहाजात चढताना पाहिल्‍यास प्रवास घडेल. समुद्रावर जातो असे पाहिल्‍यास धनलाभ, समुद्राचे पलीकडे आपल्‍याला मोठा उद्योग मिळेल. समुद्रामध्‍ये पोहत आहोत असे पाहिल्‍यास धनप्राप्‍ती होईल.

भरलेल्‍या तळ्याच्‍या मध्‍यभागी बसून कमळाचे पानावर जेवताना स्‍वप्‍नामध्‍ये पाहिल्‍यास राज्‍यप्राप्‍ती होईल.

आपल्‍या घरापुढून नदी वाहात आहे असे पाहिल्‍यास काही तरी उद्योग मिळून लोकांमध्‍ये मान मिळेल. पाऊस पडत आहे व नदीस पूर आलेला आहे असे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास सर्व देशभर भयंकर रोगाची साथ उद्भवेल. वाहात असलेला प्रवाह मध्‍यंतरीच कोरडा झालेला पाहिल्‍यास कष्‍टाचे निवारण होईल. पाण्‍याचा प्रवाह शेतातून वाहात असलेला दृष्‍टीस पडल्‍यास द्रव्‍यलाभ होईल.

निर्मळ पाण्‍याने पूर्ण भरलेली विहीर पाहिल्‍यास द्रव्‍यलाभ होईल, विहीर भरून पाणी बाहेर वाहात असलेले दृष्‍टीस पडल्‍यास द्रव्‍यनाश, हे स्‍वप्‍न पुरूषांनी पाहिल्‍यास त्‍यांच्‍या मित्रांमध्‍ये अगर आप्‍तांमध्‍ये एकास मरण अगर दुर्दशा प्राप्‍त होईल. बायकांनी पाहिल्‍यास त्‍यांस वैधव्‍य प्राप्‍त होईल अगर पतीवर मोठे संकट गुदरेल. आपण विहिरीतून पाणी काढीत आहे असे पाहिल्‍यास द्रव्‍यलाभ. हे स्‍वप्‍न अविवाहिताने पाहिल्‍यास त्‍याचे लग्‍न होऊन सासूकडून त्‍यास द्रव्‍यप्राप्‍ती. ते पाणी गढूळ असल्‍सास कष्‍ट प्राप्‍त होतील; दुस-याकरिता आपण पाणी काढीत आहो असे पाहिल्‍यास सेवकत्‍व येईल. स्‍नान केलेले स्‍वप्‍नात पाहिल्‍यास रोग. स्‍नान करण्‍याचे पाणी जितके ऊन असेल तितके कष्‍ट जास्‍त. स्‍नान करण्‍याकरिता वस्‍त्र सोडून स्‍नान केल्‍यावाचून परतल्‍यास आप्‍तामध्‍ये भांडण उत्‍पन्‍न होऊन लौकरच शांतता होईल असे समजावे.

निवळ पाण्‍याचा तलाव, ओढा अगर नदी स्‍वप्‍नात पाहिल्‍यास मनातील कार्य सिद्धीस जाईल, शरीरास आरोग्‍य येईल. पाणी गढूळ आहे. असे पाहिल्‍यास मनांतील कार्य सिद्धीस जाणार नाही, शरीर रोगी होईल.

पाय धुताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास क्‍लेश होतील. पाणी पीत आहो असे पाहिल्‍यास खेद होईल. आणि मनातील कार्य सिद्धीस जाणार नाही. व्‍यापा-याना व्‍यापारामध्‍ये नुकसानी येईल. कदाचित् त्‍यांना कारागृहवास ही घडण्‍याचा संभव आहे. पाण्‍याची चूळ भरून टाकलेली स्‍वप्‍नात पाहिल्‍यास आलेले संकट दूर होईल. दुखणे बरे होईल. डोके पाण्‍यात बुडवून पोहताना पाहिल्‍यास व्‍यापारात नुकसानी येण्‍याचा संभव आहे. कष्‍ट प्राप्‍त होतील, व आप्‍तांबद्दल वाईट बातमी बातमी ऐकण्‍यात येईल. संथ पाण्‍याचा तलाव पाहिल्‍यास तृप्‍ती वाहत्‍या पाण्‍याकडे टक लावून पाहात असल्‍याचा भास झाल्‍यास अकल्पित धनप्राप्‍ती होते. पाण्‍यावर आनंदाने तरताना पाहील्‍यास मित्रांच्‍या संगतीने सुख प्राप्‍त होईल. निवळ संथ सरोवराच्‍या पाण्‍यातून तराफ्यावरून अगर नावेतून फिरत असताना पाहिल्‍यास, हातात घेतलेला पदार्थ सुवर्ण होऊन मनांत धरिलेले अतिशयीत कठीण कामही सुलभ रीतीने पूर्ण होईल. ते पाणी गढूळ असल्‍यास मोठे दुखणे येईल, व संकटे येतील; पाण्‍यात शेवाळ लागून बाहेर आल्‍यास पैसा मिळतो.

ऊन पाणी पिताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास हेवेखोर मनुष्‍यापासून कष्‍ट होतील. ते पाणी जितके ऊन तितके कष्‍ट जास्‍त; जितके थंड पाणी असेल तितके सौख्‍य जास्‍त; पिण्‍याकरिता कोणी एकाने आपणास तांब्‍याभर पाणी दिलेले पाहिल्‍यास संतानवृद्धी होईल. वरील भरलेला तांब्‍या पडलेला स्‍वप्‍नात पाहिल्‍यास मित्रावर अरिष्‍ट येईल. फुटक्‍या भाड्यात, वस्‍त्रात अगर पिशवीत पाणी घेण्‍याचा निश्‍चय केल्‍याचा भास झाल्‍यास आपणावर संकट येईल. आपल्‍या भवशाचे लोक आपणास फसवितील, निदान आपले घरी चोरी तरी होईल. पाण्‍याची रास अगर भिंत करणे वगैरे असंभवनीय गोष्‍टी पाहिल्‍यास कष्‍टाचे दिवस जवळ आले आहेत असे समजावे. दुस-याने दिलेले पाणी पिताना पाहिल्‍यास कष्‍ट अधिक होतील. सर्व घर पाण्‍याने शिंपडलेले पाहिल्‍यास काही तरी हानी होईल असे जाणावे.

स्वप्न सूची पहा

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *