चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?* 🌹

कांदा लसूण हे पदार्थ चातुर्मासात अभक्ष्य सांगितले आहेत. मनुस्मृतीत
“लशुनं गृंजनं चैव पलांडुकवकादि च । अभक्ष्याणि द्विजातीनाममेध्य प्रभवानिच ।।”
कांदालसूण हे पदार्थ शरीरात विकार व वासना वाढवून ते बुद्धीची ग्रहणक्षमता कमी करतात. म्हणून त्यांना मनुमहाराजांनी अमेध्य असे म्हणलेले आहे. हे पदार्थ औषधी आहेत हा विषय स्वतंत्र आहे. याचे उत्तर प.पू. गुळवणी महाराजांनी दिलेले आहे. त्यांना एकाने हेच विचारले होते की कांदा लसूण औषधी आहेत मग आम्ही खाऊ का. तेव्हा ते म्हणाले की यांसारखे इतरही अनेक औषधी पदार्थ आहेत, ते खावेत. तसेच
“पलांडुभक्षणात् पुनरपि मौंजीबंधनं कुर्यात् ।”
असे वचन असताना व कांदा खाल्यावर पुन्हा मौंजीबंधन करावे असे सांगितले असताना ते कटाक्षाने वर्ज्य केले पाहिजे. चातुर्मासात अनेक सण व्रते केली जातात त्यामुळे या काळ मुळातच सत्वप्रधान हवा. असे पदार्थ खाल्ले की सत्वगुण नष्ट होऊन रज व तमोगुण वाढत असतात व शरीरास एक विशिष्ट असा दर्प येत असतो. लसूण याचे दुसरे नाव “म्लेंछकंद” असेही आहे. म्लेंछांच्या शरीरास जसा दर्प येतो तसा दर्प लसणाचा असतो हे तात्पर्य आहे. परत गायत्री मंत्रांसारखे सात्त्विक मंत्र म्हणताना शरीरावर त्या त्या देवतांचे न्यास करत असतात व या देवता शरीरावर वास करत असतात. कांदा लसूण खाल्यावर शरीरास येणारा दुर्गंध लक्षात घेता अशा सात्विक देवता शरीरावर वास करणेच अवघड आहे. यामुळे अनुष्ठानांची फलप्राप्ती होणेही कठीणच आहे. म्हणूनच चातुर्मासात कांदा लसूण वर्ज्य सांगितले आहेत.


आयुर्वेद मानतो की आपल्या शरीरात सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण असतात. त्यातला तम हा गुण स्थितीदर्शक आहे. म्हणजे ज्याच्याकडे तम जास्त असेल, तो माणूस आहे आहे त्या स्थितीतच राहतो. काही कष्ट करावेत, कामं करावीत आणि आयुष्यात यश मिळवावं असं काहीही त्या माणसाकडून केलं जात नाही असं मानलं जातं. तम वाढवणारं अन्न आपल्या आयुष्यात अज्ञानाचा अंधार आणतो अशी खूप जुनी समजूत आहे. आणि आपला हा कांदा आणि लसूण दोघेही तामसिक! त्यामुळेच कांदा आणि लसूण खाऊ नये अशी एक धारणा आहे. 


कांदा आणि लसूण खाऊ नये या समजामागं आणखी एक धार्मिक कारणही आहे. पुराणांमध्ये कांदा आणि लसूण कसे निर्माण झाले याची एक कथा दिली आहे. त्या कथेत असं म्हटलंय की अमृतमंथनानंतर जेव्हा अमृताचं वाटप होत होतं त्यावेळी विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि सगळ्यात आधी देवांना अमृत दिलं. राहूच्या हे लक्षात आलं. त्यानं विष्णूचा हा कावा बरोब्बर ओळखला आणि तो रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. थोडक्यात, त्यालाही अमृत मिळालं. राहू ते अमृत पीत असताना चंद्र आणि सूर्याने त्याची चुगली केली.  विष्णूला मग राहूचा राग आला आणि त्यानं आपल्या सुदर्शन चक्रानं राहूचं डोकं उडवलं. त्यावेळी राहूच्या रक्ताचे काही थेंब धरतीवर पडले आणि त्यातून कांदा आणि लसूण निर्माण झाला असं या कथेत सांगण्यात आलंय. राहू हा असुर होता. त्याच्या रक्तापासून निर्माण झालेले असल्यामुळे कांदा-लसूण खाऊ नये असं या कथेनुसार मानण्यात येतं. 
असुराच्या रक्तापासून निर्माण झाले असले तरी ते साधसुधं रक्त नाहीये. त्या रक्तात अमृताचा अंशही आहे म्हणून आरोग्याच्या दृष्टीने कांदा-लसूण फारच उपयुक्त आहेत. कांदा हा लसणीपेक्षा थोडासा सौम्य आहे पण दोहोंचेही गुणधर्म सारखेच आहेत. पाहूयात मग त्यांचे काय गुण आहेत –

  • गुणाने तीक्ष्ण आणि उष्ण आहेत. त्यामुळं सर्दी-पडशासारख्या आजारांत एकदम गुणकारी आहेत. विशेषत: लसूण. 
  • अन्नपदार्थ पोटातून पुढे सरकवतात, सारक आहेत. 
  • अन्नाला चव देतात
  • पाचकाग्निची शक्ती वाढवतात
  • हृदयाला बल देतात
  • शारीरिक बल वाढवतात
  • त्वचा आणि केसांसाठी हितकर आहेत
  • पोटदुखी, मूळव्याध, जंत, सर्दी, दमा या व्याधीमध्ये उपयुक्त
  • अतिप्रमाणात खाल्ल्यास शरीरातून रक्तस्राव होतो म्हणजे रक्तपित्ताचा त्रास होऊ शकतो .

  • चातुर्मासाच्या या काळात पावसाळा असल्याने एकूणच आपली पचनशक्तीही मंदावलेली असते. त्यामुळे या काळात कमी, हलका आणि पचायला सहज सोपा असा आहार घेणे सांगितले गेले आहे. कांदा, लसूण चातुर्मासात वर्ज्य आहेत. मुळातच कांदा आणि लसूण हे पचायला जड आहेत. पचनशक्ती मंद झाल्याने तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणेही आरोग्यासाठीही चांगले नाही. त्यामुळेच पूर्वजांनी या चार महिन्यांत कांदा, लसूण खाऊ नका असे सांगितले आणि त्याला धार्मिकतेची जोड दिली. आषाढ महिन्यातील पहिली नवमी ‘कांदे नवमी’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी कांद्याची भजी करून खाल्ली जातात, कांद्याचा विपुल प्रमाणात वापर केला जातो. नंतर कांदा खाऊ नये त्यासाठी आधी ही सोय सांगितली आहे. मांस-मटण, मासे हेही पचायला जड असतात. त्यामुळे त्याचेही सेवन करू नये असे सांगितले गेले आहे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

महत्वाचे धार्मिक प्रश्न आणि उत्तरे

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *