आकाशाचे स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

भाग ६
आकाशसंबंधी

स्‍वप्‍नामध्‍ये आकाश पाहणे चांगले, आकाश स्‍वच्‍छ आणि निरभ्र असे दिसल्‍यास श्रेष्‍ठत्‍व प्राप्‍त होईल, व इच्छित कार्य सिद्धीस जाईल, शत्रूपासून जय मिळेल. गेलेले धन मिळेल व वादात जय मिळेल. आकाश अभ्राने आच्‍छादित नीलवर्णाचे आहे असे दिसेल तर आपणास विपत्ती प्राप्‍त होण्‍याची लक्षणे समजावी. शिवाय रोग व लोकांशी शत्रुत्‍व होईल. स्‍वप्‍नांमध्‍ये आकाश नीलवर्णाचे असून चोहोकडून श्‍वेतवर्णाचे आभ्राने व्‍याप्त होत आहे असे पाहिल्‍यास आपणाला विपत्तीकाल प्राप्‍त होईल व त्‍या संकटातून मुक्‍तताही होईल, आकाश लाल वर्णाचे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास रोग होईल,

संध्‍याकाळचा संधीप्रकाश पाहिला असता, आपल्‍या घरामध्‍ये कोणाला तरी व्‍याधी उत्‍पन्‍न होण्‍याची लक्षणे समजावी. हेच स्‍वप्‍न व्‍यापारी लोकांना पडले असता त्‍यांना व्‍यापारापासून नुकसान होण्‍याचा संभव आहे. व ही दोन्‍ही स्‍वप्‍ने जर अविवाहित मनुष्‍याने पाहिली तर त्‍याचा विवाह होईल.- सूर्यमंडळ व चंद्रमडळ यास जो मनुष्‍य स्‍वप्‍नात पाहतो त्‍याला द्रव्‍यलाभ होऊन कार्यसिद्धी होते. चंद्र व सूर्य हे प्रभाहीन (म्‍हणजे निस्‍तेज) असे पाहिले असता मृत्‍यु जवळ आहे असे समजावे किंवा अति दु:ख तरी होईल.

– सूर्योदय होत असे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास कार्यसिद्धी. इष्‍टमित्र व बांधव यांस क्षेम, सूर्यसमुद्रातून वर येतो आहे असे स्‍वप्‍नात पाहिले तर सौख्‍यप्राप्‍ती होईल, प्रात:काळ होत आहे असे स्‍वप्‍नात पाहिले तर द्रव्‍यलाभ, उद्योगवृद्धी, आरोग्‍यप्राप्ति, कैद्याची तुरूंगापासून मुक्‍तता आणि द्रव्‍यलाभ सुचविते. बायकांना सूर्यदर्शन झाले तर पुत्रलाभ सूर्यास्‍त होत आहे असे पाहिल्‍यास मुलगी होईल. व व्‍यापा-यांचा नाश होईल, सूर्य अभ्‍राने झाकलेला आहे असे पाहिले तर घर दहन होईल, सूर्यकिरण पाहिले तर लाभ. किरणे अंथरूणावर पडली असे पाहिले तर रोग उद्-भवेल.

आपल्‍या खोलीभर ऊन पडलेले आहे असे पाहिल्‍यास, द्रव्‍यलाभ, मान, संतती इतर प्राप्‍त होतील. सूर्यबिंबाला ग्रहण लागले आहे असे दिसणे हे फार वाईट. हेच स्‍वप्‍न भीती बाळगणाराला चांगले. गर्भिणी स्‍त्रीने असे स्‍वप्‍न पाहिले तर तिला कीर्तिमान असा मुलगा होईल. अपराध्‍याला आपले डोके सूर्यकिरणांनी वेष्टिलेले आहे असे पाहिले तर तो बंधनात असला तरी मुक्‍त होतो. हेच स्‍वप्‍न इतरांस पडले तर तो राजसन्‍मानास पात्र होईल.

– चंद्रोलय होऊन शुभ्‍र असे चांदणे पडले आहे असे जो पाहतो;त्‍याला सर्वानुकूलता प्राप्‍त होते. चंद्र अभ्‍राने झाकलेला किंवा त्‍याला ग्रहण लागले आहे असे दिसेल, तर आपल्‍या घरातील एखाद्या स्‍त्रीस रोग उद्-भवेल किंवा चोर आपले घर लुटतील. हेच स्‍वप्‍न प्रवाशांना विपत्तिकारक. चंद्र मनुष्‍याचे मुखासारखे प्रकाशलेला दिसेल तर धनलाभ, पूर्णचंद्र पाहिला तर संततिदायक. आपले डोके चंद्रकिरणांनी वेष्टिलेले आहे असे पाहिले तर तो प्रसिद्धीस येईल. हेच स्‍वप्‍न कैद्याने पाहिले तर तो कैदेतून सुटेल.

– नक्षत्रांचा चकचकीत प्रकाश पाहिल्‍यास अभिवृद्धी, प्रकाश मिणमिणीत असा दिसेल तर दु:खकारक. आकाशामध्‍ये मुळीच नक्षत्र नाही असे पाहिले असता श्रीमंताना दारिद्रय व दरिद्र यांना रोगप्राप्‍ती. आकाशामध्‍ये मुळीच नक्षत्र नाही असे पाहिले असता श्रीमंताना दारिद्र्य व दरिद्री यांना रोगप्राप्‍ती. हे स्‍वप्‍न अपराधी मनुष्‍य पाहील तर भीतीपासून मुक्‍त होईल. नक्षत्रे पडताहेत असे पाहिले तर मृत्‍युकारक, तारे आपल्‍या घरावर पडले आहेत असे स्‍वप्‍नात पाहिले तर रोग उत्‍पन्‍न होतो किंवा घर सोगावे लागते. एखाद्या घरामध्‍ये नक्षत्रे प्रकाशत आहेत असे पाहिले तर घराचे मालकाचा नाश,

शेंडे नक्षत्र पाहिले तर विपत्ती प्राप्‍त होईल, शिवाय रोगही होईल.- इंद्रधनुष्‍य पूर्वेला पाहिले तर गरिबांना चांगले व श्रीमंताना वाईट. आणि पश्चिम दिशेला पडलेले पाहिले तर श्रीमंताना चांगले व गरिबांना वाईट.

-आपण आकाशात उडतो असे पाहिले तर कार्यसिद्धी होईल असे समजावे.-विजांचा च‍कचकाट हे स्‍वप्‍नात पा‍हणे फार चांगले. विजेच्‍या प्रकाशाने डोळे दिपले असता किंवा तिची गर्जना ऐकी असता अगर ती एखादे ठिकाणी पडून तिच्‍या योगाने स्‍वत:ला अगर परक्‍याला किंवा एखाद्या कोणत्‍याही वस्‍तूस अपाय झालेला पाहणे वाईट, विपत्तिकाल प्राप्‍त होईल. स्‍वप्‍नामध्‍ये आपणावर वीज पडेत होती परंतु काही कारणामुळे ती चुकली असे पाहणे चांगले.

विपत्तिकाल असल्‍यास निघून जाईल. वीज आपल्‍या अंगाला न लागता बाजूला अगदी जवळ पडली असे जो पाहतो त्‍याला दूरदेशी प्रयाण होऊन सौख्‍य होईल. हेच स्‍वप्‍न प्रवाशांना वाईट, आकाशात अभ्‍र आहे असे असून विजेची गर्जना अगर चमक होत असणे हे चांगले. व्‍यापारी, शेतकरी आणि नोकरी करणारे लोक यांना ज्‍यांच्‍या त्‍यांच्‍या कामात लाभ होईल. तंट्यात यश होईल. इतरांनी पाहिले तर आप्‍त लोकांकडून काहीतरी लाभ होईल असे जाणावे.

स्वप्न सूची पहा


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

  1. […] आकाशाचे स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ६जीव-जंतु स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ७पशु स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ८पक्षी स्वप्नाचे फळ स्वप्नशास्र भाग ९धातु-अलंकार स्वप्न फळ स्वप्नशास्र १० […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *