कार्तिकस्नान महात्म्य विधी फळ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

कार्तिकस्नान* 🌹

आश्विनशुद्धातल्या दशमी, एकादशी अथवा पौर्णिमा यांपैकी कोणत्या तरी एका तिथीवर आरंभ करून, दोन घटका रात्र शिल्लक राहिली असता, कोणच्या तरी तीर्थावर जाऊन, एक महिनाभर दररोज कार्तिकस्नान करावे. स्नानाचा प्रकार असाः –
प्रथम विष्णूचे स्मरण करून, देशकालादिकांचा उच्चार केल्यावर,

नमो कमलनाथाय नमस्ते जलशायिने ।
नमस्तेस्तु ह्रषीकेश गृहाणार्घ्यं नमोस्तुते ॥’


या मंत्राने अर्घ्य देऊन,
‘कार्तिकेऽहं करिष्यामि प्रातःस्नानं जनार्दन ।
प्रीत्यर्थं तव देवेश दामोदर मयासह ॥
ध्यात्वाहं त्वांच देवेश जलेऽस्मिन्स्नातुमुद्यतः ।
तव प्रसादात्पापंमे दामोदर विनश्यतु ॥’

या मंत्रांनी स्नान करावे आणि

‘नित्ये नैमित्तिके कृष्ण कार्तिके पापनाशने ।
गृहाणार्घ्यं मया दत्तं राधयासहितो हरे ॥
व्रतिनः कार्तिके मासि स्नातस्य विधिवन्मम ।
गृहाणार्घ्यं मया दत्तं राधयासहितो हरे ॥’

या मंत्रांनी पुन्हा दोन वेळा अर्घ्य द्यावे.
कुरुक्षेत्र,
गंगा,
पुष्कर
वगैरे विशेष तीर्थांच्या ठिकाणी या (स्नाना) चे विशेष फळ जाणावे. ह्या कार्तिकस्नानाच्या बाबतीत आणखी जो एक विशेष आहे, तो असा जो कोणी सर्व कार्तिक महिनाभर जितेंद्रिय राहून, रोज स्नान, जप, हविष्यान्न भक्षण करून राहतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो. भागीरथी, शिव आणि सूर्य यांचे स्मरण करून, पाण्यात शिरावे. बेंबीपर्यंत पाण्यात उभे राहून व व्रती होऊन यथाविधि स्नान करावे.

हे कार्तिकस्नान, प्रातःस्नान व प्रातःसंध्या केल्यावर करावे; कारण ती कर्मे केल्यावाचून इतर कर्मे करण्यास अधिकार नाही. प्रातःसंध्या जरी सूर्योदयी संपवावी असे आहे तरी या संबंधाने विशेष वचन असल्याने, सूर्योदयापूर्वीच संध्या आटपून कार्तिकस्नान करावे, असे निर्णयसिंधूत सांगितले आहे. ही गोष्ट इतर ग्रंथात सांगितलेली नाही. अशा प्रकारचे स्नान अशक्ताने तीन दिवस करावे.

कार्तिकातल्या इतर व्रतांनाही याच वेळी आरंभ करावा. ती व्रते येणेप्रमाणे-
कार्तिकात एकलक्ष तुळशी पानांनी जो हरीचे अर्चन करतो, त्याला प्रत्येक पानाबद्दल मुक्तीसारखे फळ मिळते. तुळशीच्या मंजिर्‍यांनी जर हरि व हर यांचे अर्चन केले तर मुक्ति मिळते. तुळस लावणे तिचे पालन करणे व तिला स्पर्श करणे या गोष्टी केल्यास पापाचा नाश होतो. तुळशीच्या सावलीत श्राद्ध केल्याने पितरांची तृप्ति होते. ज्या घरात तुळस असते ते घर तीर्थाप्रमाणेच होय; त्या घरात यमदूत येत नाहीत. असे तुळशीचे माहात्म्य आहे.

आवळीचेही जे असेच माहात्म्य

आवळीचेही जे असेच माहात्म्य आहे, ते असेः – कार्तिकात आवळीखाली निरनिराळ्या अन्नांनी हरीचा संतोष करावा, भक्तीने ब्राह्मणाला जेवू घालावे व आपण बांधावांसह भोजन करावे. आवळीच्या छायेत श्राद्ध आणि आवळीच्या पानाफलांनी हरिपूजन या गोष्टी केल्याने मोठे फळ मिळते; कारण देव, ऋषी व यज्ञांना योग्य अशी तीर्थे यांची वरती आवळीत असते, असे वचन आहे.

या महिन्यांत हरिजागरविधि करावा. ‘कार्तिकात दामोदराच्या सन्निध जो अरुणोदयापर्यंत जागरण करतो, त्याला हे षडानना, हजार गाईंच्या दानाचे फळ मिळते. शिव अथवा विष्णु यांची देवळे नसल्यास इतर कोणत्याही देवळात अथवा पिंपळाच्या मुळापाशी, अगर तुळशीच्या वनात जो विष्णूच्या नामप्रबंधाचे गायन विष्णूच्या समीप करतो, त्यास सहस्त्र गोदानाचे फळ मिळते.

(विष्णूजवळ) वाद्य वाजविणारालाही वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. नाचणारालाही सर्व तीर्थात स्नान केल्याचे फळ मिळते. या गोष्टी करणाराला जो द्रव्य देतो त्यालाही सर्व फळे मिळतात. अर्चन किंवा दर्शन ही केल्याने षष्ठांश फळ मिळते; असे कौस्तुभात सांगितले आहे.

वरच्या सासर्‍यांचा जर अभाव असेल तर विष्णुभक्त ब्राह्मण, पिंपळ किंवा वड यांची सेवा करावी असेही कौस्तुबात म्हटले आहे. कार्तिकात कमळे, तुळशी, जाई अगस्त्याची फुले ह्यांनी पूजा करून दीपदान देणे योग्य आहे. कार्तिक महिन्याचा उपास-वानप्रस्थ, संन्यासी, विधवा व गृहस्थ यांनी करू नये. जे व्रती असतील त्यांनी कार्तिकांत कृच्छ्र, अतिकृच्छ्र अथवा एकरात्र किंवा त्रिरात्र प्राजापत्य करावे. शाकाहार, दुग्धाहार, फलाहार किंवा यवान्नाहार करावा.

कार्तिक स्नान 🌹

इदंचप्रातः स्नानंसंध्यांचकृत्वाकार्यम् ‍ तेनविनेतरकर्मानधिकारादितिवर्धमानः यद्यपिप्रातः संध्यायाः सूर्योदयेसमाप्तिस्तथापिवचनबलादनुदितहोमवद्भविष्यति स्नानमंत्रश्चतत्रैव कार्तिकेऽहंकरिष्यामिप्रातः स्नानंजनार्दन प्रीत्यर्थंतवदेवेशदामोदरमयासह इमंमंत्रंसमुच्चार्यमौनीस्नायाद्व्रतीनर इति अर्घ्यमंत्रोपितत्रैव व्रतिनः कार्तिकेमासिस्नातस्यविधिवन्मम गृहाणार्घ्यंमयादत्तंदनुजेंद्रनिषूदन नित्यनैमित्तिकेकृष्णकर्तिकेपापनाशने गृहाणार्घ्यंमयादत्तंराधयासहितोहरे इमौमंत्रौसमुच्चार्ययोऽर्घ्यंमह्यंप्रयच्छति सुवर्णरत्नपुष्पांबुपूर्णशंखेनपुण्यवान् ‍ सुवर्णपूर्णापृथिवीतेनदत्तानसंशय इति एवंसंपूर्णस्नानाशक्तौत्र्यहंस्नायात् ‍ वाराणस्यांपंचनदेत्र्यहंस्नातास्तुकार्तिके अमीतेपुण्यवपुषः पुण्यभाजोऽतिनिर्मलाइतिकाशीखंडोक्तेः ॥

हें कार्तिकस्नान प्रातःस्नान व संध्या हीं करुन करावें . कारण , प्रातःस्नान व संध्या हीं केल्यावांचून इतर कर्मांस अधिकार नाहीं , असें वर्धमान सांगतो . जरी प्रातः संध्येची समाप्ति सूर्योदयकालीं होते असें आहे , तथापि वचनबलानें जसा सूर्योदयाच्या पूर्वीं अग्निहोत्रहोम होतो तसें सूर्योदयाच्या पूर्वीं प्रातः संध्या समाप्त करुन हें कार्तिकस्नान होतें . स्नानाचा मंत्र तेथेंच सांगतो –


” कार्तिकेऽहं करिष्यामिउ प्रातःस्नानं जनार्दन ॥ प्रीत्यर्थं तव देवेश दामोदर मया सह ॥
 हा मंत्र म्हणून व्रती मनुष्यानें मौन धारण करुन स्नान करावें . ” अर्घ्याचा मंत्रही तेथेंच सांगतो –
” व्रतिनः कार्तिके मासि स्नातस्य विधिवन्मम ॥ गृहाणार्घ्यं मया दत्तं दनुजेंद्रनिषूदन ॥ नित्यनैमित्तिके कृष्ण कार्तिके पापनाशने ॥ गृहाणार्घ्यं मया दत्तं राधया सहितो हरे ॥


 हे दोन मंत्र म्हणून सुवर्ण , रत्न , पुष्प , उदक हीं शंखांत घालून शंखानें जो पुण्यवान् ‍ भगवंताला अर्घ्य देतो त्यानें सुवर्णपूर्ण पृथिवी दिली यांत संशय नाहीं . ” याप्रकारें सर्व महिना स्नान करण्याला शक्ति नसेल तर तीन दिवस करावें . कारण , ” वाराणसीमध्यें पंचनदतीर्थांत कार्तिकमासीं तीन दिवस ज्यांनीं स्नान केलें ते हे पुण्यात्मे , पुण्य भोगणारे अतिनिर्मल होतात ” असें काशीखंडवचन आहे.

कार्तिकस्नान, त्रिपुरारी पौर्णिमा, हरिहर मिलन महात्म्य विधी फळ

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

3 Comments

  1. […] कार्तिक माहात्म्य पहा आद्याक्षर सूची सर्व सॉफ्टवेअर युट्युब व्हिडीओ नमन-प्रारंभीचे दिपोत्सव ओव्या अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा ईतर सर्व ग्रंथ पहा […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *