स्वप्नातील अग्नीचे फळ स्वप्नशास्र भाग ४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अग्निसंबंधी

स्वप्न सूची पहा

1, अग्नि स्‍वप्‍नात पाहणे चांगले.
2, वारंवार अग्नि पाहणाराचा स्‍वभाव रागीट असतो.
3, दुखणेकरी मनुष्‍याने धुराशिवाय अग्नि पाहिल्‍यास तो लवकर बरा होऊन त्‍याची शरीरसंपत्ती चांगली होईल.
4, निरोगी मनुष्‍याने पाहिल्‍यास द्रव्‍यलाभ व आप्‍तांची भेट होईल.
5, अतिशयीत धूम्‍रयुक्‍त आणि ज्‍वालायुक्‍त अग्नि-कुंडात अगर कुंडाशिवाय पाहिल्‍यास वैमनस्‍य उत्‍पन्‍न होईल; अगर दु:खकारक बातमी ऐकण्‍यात येईल.

6, कोळसे अगर राख पाहिली तर दारिद्रय येईल, अगर कोणाबरोबर तरी वाकडे होईल. हे स्‍वप्‍न दुखणेक-याने पाहिल्‍यास व्‍याधि निवारण होईल.-
7, जहाजात आपण असताना लांबच्‍या गावात दिवे लागलेले स्‍वप्‍नात दिसल्‍यास आपल्‍या आयुष्‍याचे दिवस सुखाने जातील, असे समजावे.
8, दिवे, मशाल आणि दिवट्या वगैरे चांगल्‍या जळताना पाहणे फारच चांगले. कार्यसिद्धी, द्रव्‍यलाभ आणि संतानवृद्धी होईल.


9, अविवाहित मनुष्‍याचे लग्‍न लवकर होईल आणि आयुष्‍यमान् संतती होईल.
10, दिवे, मशाली आणि दिवट्या वगैरे अंधूक जळताना पाहिल्‍यास किंचित् दुखणे येऊन लागलेच बरे होईल. त्‍याच आपण धरताना पाहिल्‍यास संकटे निवारण होतील, आपले हातून आप्‍त लोकांचे पोषण होईल व मित्रांमध्‍ये आणि लोकांमध्‍ये मान मिळेल.

11, आपण दुस-यांना दिवे वगैरे धरताना पाहिल्‍यास आपणास त्रास देणारे जे असतील त्‍यास पकडले. जाऊन त्‍यास शिक्षा होईल. तेच दिवे अंधुक असल्‍यास त्‍यास देणारे धरले न जाता उलट जास्‍त कष्‍ट प्राप्‍त होतील.
12, दिवा अगर दिवटी आपण लावून त्‍यांचा प्रकाश चांगला पडलेला दिसल्‍यास कुलदीपक मुलगा होऊन वंशाची हळूहळू भरभराट होत जाईल असे समजावे. हेच स्‍वप्‍न स्‍त्रीने पाहिल्‍यास ती लवकरच गरोदर होऊन तिला कुलदीपक मुलगा होईल.


13, आपण दिवा लावण्‍याचा प्रयत्‍न करताना मध्‍यंतरीच वारंवार गेलेला स्‍वप्‍नात पाहिल्‍यास अनेक संकटे येऊन पुत्रशोक होईल.
14, सभेमध्‍ये स्‍वत: दिवा नेत आहे असे पाहिल्‍यास जगामध्‍ये आपली कीर्ती होईल.
15, आसन, बिछाना, पालखी व गाडी इत्‍यादी वाहने, शरीर गृह इत्‍यादिकांना आग लागली असे पाहून जो जागा होईल, त्‍यास लक्ष्‍मी सदासर्वकाळ प्रसन्‍न राहील.-

16, दिवाणखान्‍यातील खांब आणि पलंगाचे खूर याशिवाल सर्व जळताना पाहिल्‍यास मोठा प्रख्‍यात मुलगा होईल. परंतु खांब व खूर जळताना पाहिल्‍यास आपला मुलगा वाईट चालीचा निघून त्‍याचा नाश होईल. –
17, आपल्‍या आप्‍तांचे अगर मित्रांचे वापरण्‍याचे कपडे जळताना पाहिल्‍यास त्‍यांना रोग प्राप्‍त होईल असे समजावे.
18, आपला निजावयाचा पलंग जळताना पुरूषांनी पाहिल्‍यास त्‍याचे बायकोस आणि स्‍त्रीने पाहिल्‍यास तिचे नव-यास दु:ख होईल. ज्‍वाला पेट न घेत असलेला अग्नि पा‍हणे चांगले.


19, आपले शरीर जळून काळे झाले अगर त्‍याला चट्टे पडले व आपण घाबरे झालो, असे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास दु:ख प्राप्‍त होईल व लोकांत मत्‍सर जास्‍त वाढेल.
20, आपले बोट अगर पाय जळताना पाहिल्‍यास आपली कृत्‍यचे आणि उद्देश हे वाईट आणि घातक आहेत असे समजावे.-

21, रासीला आग लागली आहे; परंतु धान्‍य सुरक्षित आहे असे पाहिल्‍यास पुष्‍कळ पीक येईल.-
22, सर्व प्रदेश जळताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास दुष्‍काळ पडेल अगर स्‍वर्श अन्‍य रोगाने प्रजेचा म्‍हणजे लोकांचा नाश होईल असे जाणावे.

स्वप्न सूची पहा

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *