धातु-अलंकार स्वप्न फळ स्वप्नशास्र १०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी


भाग १०
धातूसंबंधी व अलंकारासंबंधी

  • सोन्‍याचे नाणे पाहिले तर शुभ कार्यसिद्धी होईल.
  • स्‍वप्‍नात सोन्‍याची अंगठी हातात घातली असे पाहिले तर दांपत्‍यात प्रेमवृद्धी; पण ती हरवली असता कलह उत्‍पन्‍न होईल.
  • मौल्‍यवान दागिना गळ्यात घातला असे स्‍वप्‍न पाहिले तर दूर देशामध्‍ये द्रव्‍य मिळेल.
  • आपण सोन्‍याचे नाणे दुस-या मनुष्‍याला दिल्‍यासारखे वाटले तर पुष्‍कळ स्‍नेही होतील, परंतु ते नाणे आपण फेकून दिल्‍यासारखे वाटले तर आपले घरी चोरी होईल असे समजावे.
  • आपण नाणे वेचून घेतल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर जयप्राप्‍ती.
  • सोन्‍याची रास पाहिली तर दारिद्र्य.

  • स्‍वप्‍नात रूपे पाहिले तर कार्यनाश.
  • रूप्‍याची अंगठी हातात घातली असे पाहिले तर उत्तम.
  • तांबे पाहिले तर शुभ.
  • पितळ पाहिले तर आपला कोणी विश्‍वासघात करण्‍याचे बेतात आहे असे समजावे.
  • कासे पाहिले तर जय.
  • शिसे पाहिले तर कलह होईल.
  • लोखंड पाहिले तर दारिद्र्य.
  • जस्‍त पाहिले तर लाभ.

  • तांब्‍याचे नाणे पाहिले तर देवभक्‍ती घडेल.
  • रूप्‍याचे नाणे पाहिले तर वाईट.
  • द्रव्‍याने भरलेली पिशवी पाहिली तर संतानवृद्धी होईल; ती फेकल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिले तर आपल्‍या एका मित्राला आढ्यता प्राप्‍त होईल असे समजावे.
  • द्रव्‍याची पिशवी आपण घेतली असे पाहिले तर वाईट.

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

  1. […] आकाशाचे स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ६जीव-जंतु स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ७पशु स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ८पक्षी स्वप्नाचे फळ स्वप्नशास्र भाग ९धातु-अलंकार स्वप्न फळ स्वप्नशास्र १० […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *