ज्ञानेश्वरीतील शब्द असे आहेत.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

ज्ञानेश्वरीतील शब्द कसे आहेत. ❓❓

साच आणि मवाळ | मितले आणि रसाळ | शब्द जैसे कल्लोळ अमृताचे |

साच (सत्य) मवाळ (मृदू) मितले (अगदी कमी) रसाळ (रसयुक्त) शब्द जैसे कल्लोळ अमृताचे (शब्द जणूंकाही अमृताच्या लाटाच.

माऊली बोलतात,

तेणें अबालसुबोधें | ओवीयेचेनि प्रबंधे | ब्रह्मरससुस्वादे |अक्षरें गुंथिलीं |

माऊलींनी लहान बालकापासून ते वृद्धापर्यंत अर्थात नेणत्यापासून, जाणत्यापर्यंत सर्वांना सुलभ रीतीने समजेल अशी ब्रह्मरसाने गोड असलेली अक्षरे आपल्यासाठी गुंफलेली आहेत.

बोलण्यामधील 12 दोष माऊलींच्या वाणीत नाहीत.

१) विरोधु-जे बोलणे एखाद्याशी विरोध निर्माण करणारे आहे.

२) वादुबळु-वादाला बळ देणारे, भांडणाला उत्तेजन देणारे.

३) प्राणितापढाळु- प्राण्यांना मानसीक ताप व दुःख देणारे.

४) उपहासु-उपहास करणारे, जे थट्टा, फजिती, निंदा करणारे बोलले.

५) छळु-दुसऱ्याला सताउन सोडणारे बोलणे.

६) वर्मस्पर्शु-वर्मावर स्पर्श करणारे, ऐकल्यानंतर हृदयाला झोंबणारे, अंत:करणात दुःख देणारे.

७)आटु- अटीचे बोलणे, बोलतांना अट टाकून बोलणे.

८) वेगु-वेगाने बोलणे, उच्चार स्पष्ट नसणे. जे वाक्यातील वर्ण,काना ,मात्रा ,अनुस्वार ह-स्व, दीर्घ इत्यादी उच्चारधर्म गळून जातील इतका वेग असलेले.

९) विंदानु-दुराग्रही बोलणे., कपट व कृत्रिमपणा असलेले.

१०) आशा-बोलण्यातून आशा निर्माण करणारे. “तुझे काम मी निश्चित करतो”असे खोटे आश्वासन देऊन दुसऱ्याला आशा निर्माण करणारे.

११) शंका-बोलण्यातील विषयाविषयी शंका निर्माण करणारे

१२) प्रतारणु-फसवणूक करणारे असेच बोलणे.

वरील बारा अवगुण माऊलींच्या वाणीत नाहीत.

ज्ञानेश्वरी ग्रंथातील शब्द हे ब्रह्माचा अंगरखा घालून आले आहेत. ज्ञानेश्वरीच्या शब्दाच्या अंतरंगात गेल्यास स्पष्ट परब्रह्म डोळ्यांनी दाखवेल अशी माऊली प्रतिज्ञा घेतात. 👏👏👏👏

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *