स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी
भाग ७
जीवासंबंधी
- स्वप्नामध्ये मुंग्या पाहणे चांगले. त्या द्रव्यलाभ सुचवितात.
- मुंग्या एकामागून एक ओळीने चालताना पाहिल्या तर प्रयाण होईल. व्यापा-यांना द्रव्यलाभ.
- मुंग्या जिकडेतिकडे पळत आहेत असे पाहिले असता, शरीर पीडा,
- तोंडात भक्ष्य धरून नेत असलेल्या मुंग्या पाहणे चांगले.
- मुंगीला इतर प्राणी खातात अगर मारतात, असे स्वप्नात पाहिले असता आपणाला विपत्ती प्राप्त होणार असे जाणावे.
- स्वप्नात काळ्या मुंग्या पाहिल्या तर द्रव्यलाभ व लाल मुंग्या पाहिल्या तर धान्यलाभ.
- मुंग्या तोंडामध्ये अंडी धरून नेत आहेत असे पाहिले असता धननाश.
- स्वप्नात मुंगळे (डोंगळे) पाहणे चांगले.
- मुंगळ्यानी आपणला दंश केला असे पाहिले तर द्रव्यलाभ होणार असे समजावे.
- मुंगळे मेलेले पाहिले तर दुष्काळ पडेल.
- मुंगळ्याना कोणी जीव धरून नेत आहेत असे पाहिले तर शत्रुभीती.
- उवा व ढेकूण स्वप्नात पाहिले तर आपल्या उद्योगात विघ्न करण्याविषयी व आपला नाश करण्याविषयी कोणी प्रयत्न करीत आहेत असे समजावे.
- स्वप्नात सरडा पाल वगैरे पाहिली असता अशुभ जाणावे.
- डांस वगैरे जंतू दंश करून आपल्याला त्रास देतात असे पाहिले तर तंटे-भांडणे होऊन पुष्कळांशी शत्रुत्व होईल.
- स्वप्नात गोचिड, वगैरेना पाहिले तर काहीतरी व्याधी होईल.
- हिरवी कीड पाहिली तर भोजनलाभ.
- कांतणीला पाहिली तर दारिद्रय,
- कांतणीचे घर पाहिले तर शुभ.
- चिलटे, माशा, डांस, गांधीलमाश इत्यादी पंख असलेले कीटक पाहिले तर विपत्तिकाळ प्राप्त होईल. रोग्यांनी पाहिले तर रोग दूर होईल.
- आपल्या आंगभर माशा चिकटल्या आहेत असे जो पाहतो त्याला पुष्कळ शत्रु होऊन शिवाय बायको जारिणी होते.
- स्वप्नामध्ये मधमाशी पाहणे चांगले.
- ही मक्षिका चावल्यासारखे स्वप्न पडले तर त्याची वर्तणूक बिघडून तो निंदेस पात्र होतो. आणि त्या मध जमवून ठेवीत असताना पाहिले तर लाभ.
- माशांनी घराच्या कवलाराला पोळे केले असे जो पाहतो त्याला सौख्य प्राप्त होते.
- माशा उडत असताना पाहणे गरिबांना चांगले व श्रीमंतांना वाईट.
- स्वप्नात जळवा अगर वाणी पाहणे सौख्यकारक,
- घोरपड पाहिली असता काहीतरी विघ्न येईल असे जाणावे.
- विंचू पाहणे वाईट,
- विंचूने आपल्याला दंश केला असे जो पाहतो त्याने आपणास शत्रू पुष्कळ आहेत व ते आपला नाश करण्याविषयी प्रयत्न करतात असे जाणावे.
- विंचूना आपण अगर दुसरा कोणी मारीत आहे असे पाहणे चांगले.
- आपण विंचूना मारीत असता जर तो पळून गेला असे पाहिले तर वाईट. कोणाबरोबर तरी शत्रुत्व होईल् असे समजावे.
- सर्प पाहणे चांगले संततीदायक. त्यात पांढ-या सर्पाला पाहिले तर फारच चांगले.
- पांढ-या सर्पाने उजव्या भुजेस दंश केला असे पाहिल्यास दहा दिवसांनी पुष्कळ द्रव्य मिळेल म्हणून समजावे.
- लाल, हिरवे रंगाचे सर्प स्वप्नामध्ये कोणी पाहिले तर धननाश.
- उदकामध्ये उभे असता विंचू, सर्प यांनी दंश केला असे पाहिले तर जय, पुत्र, धन यांची प्राप्ती होते.
- सर्प आपले घरामध्ये प्रवेश करताहेत असे पाहिले तर कोणाबरोबर तरी विरोध होईल.
- ते विळखा घालून पडलेले आहेत किंवा त्यांना कोणी बांधले आहे असे पाहिले तर अती दु:ख,
- त्यांना आपण अगर दुस-यांनी ठार मारिले असे स्वप्न पडले तर जय.
- मासे, बेडूक यांना पाहिले तर चांगले.
- कुजलेले मासे पाहिले तर रोग,
- आपण मासे धरीत आहो असे स्वप्न पडले तर लाभ.
- मासे आनंदाने पोहतात असे स्वप्नात पाहिले तर आनंदाने दिवस जातील.
- कासव पाहिले असता अती श्रम व गमन होऊन यश, धन प्राप्त होईल असे समजावे.
- मगर पाहणे वाईट.
- मगर आपणास धरून नेत आहे असे पाहणे चांगले.
- निरूपद्रवी जंतू पाहिले असता सौख्य व क्रूर उपद्रवी जंतू पाहिले तर कष्टप्राप्ती असे समजावे.
- स्वप्नामध्ये मुंगूस पाहणे चांगले.
- मुंगूस सर्पास मारीत आहे असे पाहिले तर शत्रुनाश.
- उंदरांना पाहणे वाईट.
- उंदीर घरात पोखरतात असे पाहिले तर द्रव्यनाश.
- चावल्यासारखे अगर पाठीस लागल्यासारखे स्वप्न पडले तर रोग आणि विपत्ती प्राप्त होईल असे समजावे.
- उंदीर घरामध्ये फिरत आहेत असे स्वप्न पडले तर आपला नाश करण्याच्या हेतूने पुष्कळ लोक आपल्याशी स्नेह जोडतील असे समजावे.
- ससा पाहिल्यास बंधु-दर्शन व धनलाभ.
[…] स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ६जीव-जंतु स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ७पशु स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ८पक्षी […]
[…] स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ६जीव-जंतु स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ७पशु स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ८पक्षी […]