वायूसंबंधी (हवा) त्याचे फळ स्वप्नशास्र भाग ५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

भाग ५
वायूसंबंधी

  • स्‍वप्‍नात सुगंध, शीतल अशा वायूचा स्‍पर्श झाल्‍यास मनातील सर्व हेतू सिद्धीस जाऊन लोकांत मान्‍यता वाढेल;
  • प्रवासात हे स्‍वप्‍न पाहिल्‍यास त्‍याचा मनोरथ पूर्ण होऊन आनंदाने आपल्‍या घरी लवकर परत येईल. व्‍यापा-यांना त्‍यांच्‍या व्‍यापारात विशेष नफा होईल. शेतकरी लोकांस शेतापासून विशेष धान्‍यसमृद्धी होईल.
  • वायुचक्र (भूतभवरी) स्‍वप्‍नात पाहिल्‍याने कष्‍ट होऊन शेवटी अभिवृद्धी इत्‍यादी प्राप्‍त होतील. – झंझावात (मोठा वारा) अगर भयंकर वादळ पाहिल्‍यास आप्‍तांचा नाश आणि आपणास रोग व कष्‍ट होतील.
  • आपण स्‍वप्‍नामध्‍ये पतंग उडवितो असे पाहिल्‍यास विशेष भाग्‍योदय, उद्योगाची वृद्धी होऊन त्‍यांत मोठा लाभ होईल व मान मिळेल.
  • वा-या शिवाय मंद पर्जन्‍य पडताना स्‍वप्‍नामध्‍ये पाहिले तर सुखाने दिवस जातील, हेच स्‍वप्‍न शेतकरी लोकांनी पाहिले तर शेतीपासून लाभ होईल असे जाणावे.
  • पाऊस येऊन पडताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास सर्व देशांस विपत्ती येईल, व स्‍वत:स दु:ख, रोग इत्‍यादी प्राप्‍त होईल.

स्वप्न सूची पहा


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *