विनायकव्रत कसे करावे ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

विनायकव्रत

भाद्रपद शु चतुर्थी , या चतुर्थीला जर चंद्रदर्शन घडले तर खोट्या आरोपाचा दोष येतो. चतुर्थीला उगवलेला चंद्र जर पंचमीत दृष्टीस पडेल व तो जर विनायकव्रताचा दिवस असेल, तर दोष नाही. पूर्व दिवशी सायाह्नकाळी आरंभ झालेल्या चतुर्थीला जर विनायकव्रताचा अभाव असेल, तर त्याच दिवशी चंद्रदर्शनाचा दोष आहे असे ठरते. चतुर्थीत उगवलेल्या चंद्राला पाहू नये, असा जर पक्ष घेतला तर दहा बारा घटका चतुर्थीला चंद्र बघण्याच्या निषेधाचा प्रसंग येईल. सध्या कोणच्या तरी एका पक्षाचा अवलंब करून विनायकव्रताच्या दिवशी तेवढे लोक चंद्रदर्शन करीत नाहीत व उदयकाली किंवा दर्शनकाली चतुर्थी आहे अथवा नाही. याबद्दलचा नियम मनात घेत नाहीत. निषिद्ध वेळी जर चंद्रदर्शन घडेल, तर दोष
शान्तीस्तव ‘सिंहःप्रसेनमवधीत्सिंहो जाम्बवता हतः ।
सुकुमारकुमारोदीस्तव ह्येष स्यमन्तकः ।’
या श्लोकाचा जप करावा. या तिथीस मातीच्या वगैरे मूर्तीत प्राण प्रतिष्ठापूर्वक विनायकाची षोडशोपचारे पूजा करून, एका मोदकाचा नैवेद्य द्यावा. गंधासह एकवीस दूर्वा घेऊन,
‘गणाधिपाय, उमापुत्राय, अघनाशनाय, विनायकाय, ईशपुत्राय, सर्वसिद्धिप्रदाय, एकदन्ताय, ईशवक्त्राय, मूषकवाहनाय, कुमारगुरवे’
या दहा नावांनी, प्रत्येक नावाला दोन याप्रमाणे दूर्वा वाहून, शिल्लक एक वरील दहाही नावांचा उच्चार करून वाहावी. ब्राह्मणाला दहा मोदक देऊन आपण दहा खावे. विनायकव्रताचा याप्रमाणे संक्षेप जाणावा.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *