स्‍वत:विषयी स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग १२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

भाग १२
स्‍वत:संबंधी – भाग १

१. आपण हीन कुलामध्‍ये जन्‍मास आलो असे स्‍वप्‍न पाहिले तर लाभ,
२. आपण आंधळा झालो असे दिसले तर स्‍नेही मनुष्‍यापासून नाश, शिवाय बायको जारिणी होऊन अपकीर्ती करील.
३. आपण बहिरे झालो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास आपल्‍यास कपटी स्‍नेही मिळतील.
४. आपणास वेड लागलेले आहे किंवा आपण वेड्याजवळ उभा आहो असे पाहिल्‍यास संतती प्राप्‍त होईल.
५. स्‍वप्‍नात आपण लंगडे झालो असे पाहिल्‍यास कष्‍टकारक.

६. आपण पळत आहो असे पाहिल्‍यास आपल्‍यावर कितीही संकटे आली तरी ती दूर होऊन कार्यसिद्धी होईल.
७. स्‍वप्‍नात आपला पाय मोडला असे पाहिल्‍यास मित्रबुद्धीने अगर स्‍त्रीबुद्धीने कार्यनाश.
८. आपण पायाला लाकडाचा कोवाडा बांधून चालत आहो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास दारिद्र्य.
९. आपले हात पूर्वी पेक्षा फार लठ्ठ झाले आहेत असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास मोठी नोकरी मिळेल.
१०. आपले हात मोडल्‍यासारखे अगर जळल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिले तर गरीबी येईल.

११. हेच स्‍वप्‍न बायकांनी पाहिले तर मुलगा किंवा नवरा मृत्‍यू पावेल.
१२. आपण उजव्‍या हाताने काही काम करीत आहो असे पाहिल्‍यास शुभ.
१३. हातावर केश वाढले आहेत असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास कारागृहास प्राप्‍ती होईल.
१४. स्‍वप्‍नात टाळूपासून रक्‍त वाहात आहे असे दिसल्‍यास दु:ख होईल.
१५. आपणाला शिंगे आहेत असे स्‍वप्‍न पडल्‍यास धनलाभ होईल असे जाणावे.

१६. आपले डोके उंच व मोठे आहे असे पाहिल्‍यास मोठा अधिकार मिळेल.
१७. आपले डोके कोणी परक्‍याने कातरले असे पाहिल्‍यास बायकोला किंवा मुलाला वाईट.
१८. आपले डोके सिंह, लांडगा, वाघ, इत्‍यादी क्रूर जनावरासारखे आहे असे पाहिल्‍यास जय.
१९. घोडा, क्रुत्रा गाढव यांच्‍यासारखे आपले डोके आहे असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास कार्यविमुखता.
२० पक्ष्‍यासारखे आपले डोके आहे असे स्‍वप्‍न पाहिले तर त्‍याचे फळ देशाटन करावे लागेल.

२१. आपले डोके विंचरलेले आहे असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास आरंभीलेली कामे सुयंत्रपणे तडीस जातील.
२२. डोके पाण्‍याने धूत आहो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास नाशकारक.
२३. गर्भपात झाल्‍यासारखे वाटल्‍यास लवकरच दु:खमुक्‍तता होईल.
२४. आपली दाढी लांब आहे असे पाहिल्‍यास अभिवृद्धी.
२५. आपले मुख कोमेजलेले आहे असे दिसले तर द्रव्‍यलाभ,

२६. आपले दात दुखत आहेत असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास काही तरी उद्योग मिळाल्‍याबद्दल वर्तमान येईल.
२७. दात पडल्‍यासारखे किंवा डोक्‍याचे केस गुंतल्‍यासारखे दिसल्‍यास द्रव्‍यनाश. आणि दूर देशी प्रयाण,
२८. वांती झाल्‍यासारखे किंवा शोचाला झाल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर गरीबाला धनलाभ आणि श्रीमंताना दारिद्रता प्राप्‍त होईल.
२९. उताणे निजून मोठ्याने हासल्‍यासारखे स्‍वप्‍न पाहिल्‍यास दु:खप्राप्‍ती.
३०. निद्रा, आहार सोडून आणि पर्जन्‍य, ऊन काही न जुमानता आपण तपश्‍चर्या करतो आहो असे पाहिल्‍यास आपले हातून परोपकार घडेल.

३१. आपण एखाद्यावर रागावलो आहो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास तो आपला स्‍नेही होईल.
३२. आपण दुस-याला मारिले असे स्‍वप्‍न पाहिले तर आपली स्‍तुती दुसरे करतील.
३३. हत्‍यारे इत्‍यादिकांपासून आपण मार खाल्‍ला असे स्‍वप्‍न पाहिले तर अपकीर्ती होईल.
३५. विपत्तीकाल प्राप्‍त झाला असे पाहिल्‍यास अभिवृद्धी.
३६. आपण परक्‍याचा विपत्तीकाल पाहिला तर आपले स्‍नेही कुत्सित आहेत समजावे.

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *