पशु वनचर,भूचर स्वप्नाचे फळ स्वप्नशास्र भाग ८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

भाग ८
पशूसंबंधी स्वप्ने

  • स्‍वप्‍नामध्‍ये हत्ती पाहणे चांगले. याच्‍या योगाने चिंतिले कार्य सिद्ध होईल.
  • हत्तीवर बसल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर विद्वान व सर्वमान्‍य मुले होतील.
  • उंटाला स्‍वप्‍नामध्‍ये पाहिले तर जलप्रवास व भूमिपर्यटण पुष्‍कळ होऊन त्‍यामुळे जिवाला त्रास होईल. व ती दु:खे न जुमानिता भोगिली तर आरोग्‍य व धन प्राप्‍त होईल घरी लवकर येणे होईल.
  • उंटावर बसलो आहो असे स्‍वप्‍न पाहिले तर व्‍याधी होईल.

  • घोड्याला स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे चांगले. यात्रा घडेल व स्‍नेही मनुष्‍य भेटेल.
  • घोड्यावर बसल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर बायकोपासून किंवा मित्रांपासून द्रव्‍यलाभ व दूरदेशी गमन होऊन तेथे सौख्‍यप्राप्‍ती.
  • घोड्यावरून पडलो अस स्‍वप्‍न पडले तर थोडक्‍याच कालात दु:खे उद्भवतील.
  • गाढव पाहिले असता कष्‍ट, गाढवावर बसलो आहो, अगर गाढव जुंपलेल्‍या रथात बसलो आहो, असे पाहणे मृत्‍युकारक किंवा भयंकर व्‍याधी होईल असे समजावे.
  • आपण गाढवाला मारीत आहो असे स्‍वप्‍न पडले तर आपली दु:ख निवारण होतील.
  • गाढव न डगमगता ओझी वाहून नेत आहे असे पाहिले तर संकटे दूर होतील. शिवाय स्थिरतेने द्रव्‍यलाभही होईल.
  • गाढव आपले मागे येत आहे असे पाहणे वाईट.
  • स्‍वप्‍नात बैल पाहणे चांगले.
  • बैलावर बसलो आहो असे जो पाहतो त्‍याला धनलाभ होतो.
  • बैलाने हरत-हेने आपणास मारले किंवा तुडविले असे पाहून जो जागा होतो, त्‍याला लोक अधिकारहीन करण्‍याचा प्रयत्‍न करितात असे समजावे.
  • बैल आपल्‍या पाठीस लागला आहे असे जर पुरूषाला स्‍वप्‍न पडले तर आपला नाश करण्‍याचा कोणी दीर्घ प्रयत्‍न करीत आहे असे समजावे.
  • हेच स्‍वप्‍न बायकांनी पाहिले तर आपल्‍या वरचे नव-याचे प्रेम कमी झाले असे समजावे.

  • गाईला पाहणे चांगले. त्‍यात पांढ-या गाईला पाहणे फारच चांगले.
  • गाईचे दूध आपण काढतो आहो किंवा दुसरा कोणी काढीत असताना पाहिले तर तंटे-भांडणे होतील.
  • म्‍हशी व रेडे स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे वाईट. त्‍यांच्‍यावर आपण बसलो आहो असे पाहिले तर मृत्‍यु जवळ आहे असे समजावे.
  • पशूंचा समुदाय येत आहे असे जर पुरूषांनी स्‍वप्‍न पाहिले तर ते अपकीर्तीस पात्र होतात. व बायकांनी पाहिले तर आपल्‍या पतीला दुसरी स्‍त्री मोहित करिते आहे असे समजावे.
  • एखाद्या किरव्‍यागार रानामध्‍ये गुरांचा समुदाय चरत असलेला स्‍वप्‍नामध्‍ये दृष्‍टीस पडेल तर चांगले.
  • गुराख्‍याने आपण गुरे हाकून नेतो आहे असे पाहिले तर नाश. इतर लोकांना स्‍वधंद्यात द्रव्‍यलाभ.
  • शेळीला आणि बक-याला स्‍वप्‍नात पाहिले तर धान्‍यसमृद्धी, पण मुले अल्‍पयुषी जन्‍मतील,
  • मांजराला स्‍वप्‍नामध्‍ये पाहिले तर वाईट, तो परनिंदेस पात्र होईल.
  • मांजरे आपले घरामध्‍ये फिरत आहेत असे पाहिले तर मित्रबांधवापैकी कोणी द्रव्‍य चोरून आपला नाश करतील असे समजावे.

  • मांजर उंदराला धरीत आहे असे पाहणे चांगले.
  • मांजराला आपण ठार मारल्‍यासारखे किंवा बांधल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर आपले घरामध्‍ये चोर पकडला जाऊन कारागृहात पाठविला जाईल.
  • बायकांनी मांजरे पाहिली तर नव-यापासून अपमान होईल.
  • कुत्र्याला पाहणे चांगले.
  • कुत्रा आपले जवळ येतो असे स्‍वप्‍न पाहिले तर जीवश्‍च कंठश्‍च असे नवे स्‍नेही होतील.
  • कुत्रा आपल्‍याबरोबर फिरत आहे असे पाहिले तर आपल्‍याला संकटांतून सोडविणार स्‍नेही आहेत. असे समजावे.
  • कुत्रा आपल्‍यास पाहून भुंकत आहे किंवा आपल्‍यास चावत आहे असे पाहिले तर प्रियकर मित्रामध्‍ये देखील शत्रुत्‍व होईल असे समजावे.

  • कोल्‍ही स्‍वप्‍नात पाहणे नाशकारक.
  • माकड पाहिले तर कलह होईल.
  • माकड आपल्‍याला ओरबडतो आहे असे पाहिले तर धननाश. ते आपले घरामध्‍ये आलेले पाहिले तर विश्‍वासघात करावा अशा हेतूने एक मनुष्‍य आपले घरात शिरेल असे समजावे.
  • श्रीमारूतीला स्‍वप्‍नात पाहिले तर जय.
  • बाली, सुग्रीवाला पाहिले तर प्रिय दर्शन.

  • वाघ, सिंह, लांडगा, अस्‍वल, बिवटा इ. घातक पशूंना स्‍वप्‍नात पाहिले तर थोर मनुष्‍याशी द्वेष होईल. आणि ती चावल्‍यासारखी स्‍वप्‍न पडले तर विपत्तिकारक व त्‍यांना ठार मारल्‍यासारखे वाटले तर जय.
  • स्‍वप्‍नात हरण पा‍हणे चांगले,
  • हरणाची पारध करीत असताना पाहिले तर वाईट.
  • अन्‍य पशू सौम्‍य पाहिले तर सौख्‍यकारक व क्रूर पशू पाहिले तर दु:खकारक.

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *