श्रीगणेशास प्रिय असलेल्या वस्तू

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

श्रीगणेशास प्रिय

शस्त्र
शूळ, त्रिशूळ, अंकुश, परशू, पाश, मुद्गल, एकदंत, खट्वांग, खेटक व नागबंद

वाहन
उंदीर, मोर, सिंह, वाघ

फुले व पत्री
गणपतीला तांबडी फुले व दुर्वा विशेष आवडतात

शमी
हा वृक्ष गणपतीस विशेष प्रिय आहे. याला वह्मी वृक्ष असेही म्हणतात

मंदारवृक्ष
मंदारवृक्ष / मुळाच्या काष्ठात श्री गणेशमूर्ती तयार होते, त्याला मंदारगणेश असेही म्हणतात. मंदारवृक्षाच्या काष्टात तयार झालेला नैसर्गिक श्रीगणेश सिद्धीगणेश मानला जातो.

भक्त
गणपती भक्तांना गाणपत्य या नावाने ओळखतात. त्याच्यात महागणपती, हरिद्रा गणपती, उचिष्ट गणपती, नवनीत, स्वर्ण व संतान संप्रदाय असे सहा संप्रदाय निर्माण झाले आहेत.

गणेश आराधना
चतुर्थी, विनायकव्रत, स्तोत्रपठण, गणेशध्यान, गणेशगायत्री मंत्र, गणेशनामजप व गणेशयाग आदी मार्गांनी गणेश आराधना केली जाते. श्रीगणेशाच्या अभिषेकासाठी अथर्वशीर्ष व ऋग्वेदातील ब्रम्हणस्पत सूक्त म्हणण्याची पद्धत आहे.

अथर्वशीर्ष
यात अ +अथर्व +शीर्ष हे तीन शब्द येतात. अ = निषेध करणारा, नाही. अथर्व = चंचल होणे. शीर्ष = अंत. या सर्व शब्दांचा अर्थ = जे चंचल होऊ देत नाही व जे अंतिम साध्य आहे ते अथर्वशीर्ष.

ब्रम्हणस्पत सूक्त
ब्रम्हणस्पती हे गणपतीचे दूसरे नाव आहे. ब्रम्हणस्पत सूक्त म्हणजे श्रीगणेशाचे स्तवण होय.११ अध्याय व ६४ मंत्र असलेले हे ऋग्वेदातील सूक्त ११ ऋषिंनी निर्माण केले.

गायत्री मंत्र
ओ्म भूर्भुव: स्व: । ओ्म गं गणपतये नम: । एकदंताय विघ्नहे । वक्रतुंडाय धीमही ।
तन्नो दन्ति प्रचोदयात् ।।

संकटनिरसन स्तोत्र
हे श्रीनारदांनी रचले आहे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

गणपतीची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी पाहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *