पितृपक्ष भाग ३ श्राद्ध केल्याने काय होते ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पितृपक्ष भाग ३

श्राद्ध कोणी व का करावे?

सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय व वर्णाच्या लोकांनी करावे.
संतान प्राप्ती व प्रगतीसाठी श्राद्ध करावे. अर्थप्राप्ती, रक्षा व वृद्धीसाठी श्राद्ध करावे.
आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी श्राद्ध करावे. पितृदोष शांती, कालसर्प शांती, ग्रहपीडा शांतीसाठी श्राद्ध करावे.
मनोधैर्य कमी, भीती, प्रेतबाधा निवारण्यासाठी श्राद्ध करावे.

कायदेशीर संकट, सजकीय पीडा निवारणासाठी श्राद्ध करावे.कुटुंबात वादविवाद, दाम्पत्य जीवनात तणाव, शिक्षण समस्या निवारणासाठी श्राद्ध करावे. अस्थिरता, राग, वैमनस्य संपविण्यासाठी श्राद्ध करावे. घर, जमीन, वास्तुदोष निवारणासाठी श्राद्ध करावे.
वैशाख शुक्ल तृतीया, कार्तिक शुक्ल नवमी, अश्विन/भाद्रपद कृष्ण द्वादशी व पौष/मार्गशीर्षातील अमावस्या या चार तिथी आदि तिथी असून या दिवशी श्राध्द कार्य श्रेयस्कर ठरते.


श्राध्द केल्याने पितरांची संतुष्टी व व्यक्तिगत उन्नयनाचे पर्व यामधून बोध संपादन केला जातो. कृतज्ञता व समाधानाचा सुगंध दरवळतो. पितरांची पूजा केल्याने मनुष्य आयु, पुत्र, यश, स्वर्ग, पुष्टि, बल,श्री,पशुधन, सुख, धन , धन्य संपादित करतो. देवकार्यापेक्षा पितृकार्य प्राधान्याने केले पाहिजे. देवतांपेक्षा पितरांची प्रसन्नता अधिक कल्याणकारी आहे. श्रद्धा, निष्ठा व प्रतीकात्मक संकल्प यांचे बीजारोपण व अंकुरण प्रसन्नतेत समाविष्ट आहे. समस्त देव, पितर, महायोगी स्वधा व स्वाहा – आम्ही सर्वांना नमस्कार करतो. हे सर्व नित्य शाश्वत फल प्रदाता आहेत.

गरुड पुराणानुसार समयानुसार श्राध्द केल्याने कुळात कोणीही दु:खी राहत नाही. पितरांची पूजा मनुष्यास आयु, पुत्र, यश , स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, श्री, पशु, सुख, धन धान्य यांनी सम्प्राप्त होतो. देवकार्यापेक्षा पितृकार्याचे विशेष महत्व आहे. देवांपेक्षा पितरांना प्रसन्न करणे अधिक कल्याणकारी आहे.
वैशिष्ठ्यपूर्ण भारतीय संस्कृती जीवनभर विभिन्न संस्कारांनी, धर्मपालनाने स्मुन्नत करतेच, मृत्यु उपरांत

अंत्येष्टी व उत्तम गती साठी योग्यसंस्कारांचे दिग्दर्शन विष्णू, वराह, वायू, मत्स्य या पुराणांमार्फत तसेच महाभारत , मनुस्मृती यामुल्यसंवर्धक ग्रंथा द्वारे करते. यात श्राध्द महिमा वर्णन आढळते. भाद्रपद कृष्ण पक्ष हिंदू धर्म श्राध्द पर्वरूपाने साजरा करतो. दिव्य आत्मा अवतरण यामुळे संभवते. ज्यांनी अष्टौ प्रहरमेहनतीने साधन सामुग्री, संस्कार, सामाजिक कर्तव्याची जाणीव देवून जीवनजगण्याचा विश्वास निर्माण केला त्यांच्या व ईश्वरी प्रसन्नतेसाठी, हृद्यशुद्धीसाठी सकाम-निष्कामतेने श्राध्द केले पाहिजे.

देवताभ्य: पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च । नम: स्वधायै स्वाहायै नित्यमेव भवन्त्युत ।।
विधी विधानाची त्रुटी, मंत्रोच्चार येत नसतांना ४ बीजमंत्रसम्पुठीत मंत्र पितरांची तृप्ती,

मांगल्य-प्रभाव व उत्तम सद्गती करण्यास समर्थ आहे. श्राध्द फलित कर्ता असा मंत्र आहे.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी

पितृकार्य महत्वाची माहिती

अशोक काका कुलकर्णी संकलित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *