सुसंगती सदा घडो

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

प्रख्यात विद्वान आइनस्टाइनच्या ड्रायव्हरने एकदा आइनस्टाइन यांना म्हटले की, “सर मी आत्तापर्यंत आपल्या प्रत्येक सभेत बसून आपली सगळी भाषणं पाठ केली आहेत”… हे ऐकून आइनस्टाइन हैराण झाले!… ते म्हणाले ठीक आहे… आता आपण ज्या सभेसाठी जात आहोत, तेथील आयोजक मला ओळखत नाहीत… तेथे माझ्या ऐवजी तू बोल… मी तुझा ड्राइव्हर म्हणुन बसतो… झाले, सभेमध्ये ड्राइव्हर स्टेजवर गेला आणि त्याने भाषणाला सुरुवात केली… उपस्थित सर्वांनी खूप टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला… पण त्याच वेळेस तेथे उपस्थित असलेल्या एका प्रोफेसरने त्याला विचारले की, सर आपण आत्ता सापेक्षताची जी परिभाषा सांगितली, ती परत एकदा व्यवस्थित समजून सांगता का?…

खाली ड्राइव्हर म्हणून जे खरे आइनस्टाइन बसले होते, त्यांना वाटले आता आपली चोरी पकडली जाणार… परंतु स्टेजवरील ड्राइव्हरचे उत्तर ऐकून ते एकदम हैराण झाले… ड्राइव्हरने त्या प्रोफेसरला उत्तर दिले की, इतकी सोपी गोष्ट आपल्याला कळाली नाही?… काही हरकत नाही, ही गोष्ट तुम्ही माझ्या ड्राइव्हरला विचारा… तो पण तुम्हाला समजून सांगेल… तात्पर्य : जर आपण नेहमी बुद्धिमान लोकांच्या संपर्कात राहिलो, तर आपणही निश्चितच बुद्धिमान होऊ शकतो… पण आपली उठबस जर मुर्ख लोकांसोबत असेल, तर आपली बुद्धी सुद्धा त्यांच्यासारखी होऊ शकते…

बाळासाहेब हांडे संग्रहित सर्व साहित्य पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *