पूजेचे अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

वारकरी भजनी मालिका
WARKARI BHAJNI MALAIKA

1.                  पूजेचे अभंग मालिका
पूजेचेवेळी म्हणावयाचे अभंग

अनुक्रमणिका

1.      समिर्पली वाणी

समिर्पली वाणी । पांडुरंग घेते धनी ॥१॥
पूजा होते मुक्ताफळी । रस ओविया मंगळी ॥२॥
धार अखंडित । ओघ चालीयेला नित्य ॥३॥
पूर्णाहुती जीव । तुका घेउनी ठेला भाव ॥४॥

2.      सेवा ते आवडी उच्चारावें नाम

सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेद काम निवारूनि ॥१॥
नलगे हालावें चालावे बाहेरी । अवघेचि घरी बैसलिया ॥२॥
देवाचींच नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारी समावीं ॥३॥
तुका म्हणे होय भावेचि संतोषीं । वसे नामापाशी आपुलिया ॥४॥

3.      कासयाने पूजा करूं केशीराजा

कासयाने पूजा करूं केशीराजा । हाचि संदेह माझा फेडी आतां ॥१॥
उदकें न्हाणूं तरी स्वरूप तें तुझें । तेथें काय माझें वेचें देवा ॥२॥
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥३॥
फळदाता तूंच तांबोल अक्षता । तेथें काय आतां वाहों तुज ॥४॥
वाहूं दक्षिणा तरी धातु नारायण । ब्रह्म तेंचि अन्न दुजें काई ॥५॥
गातां तूं ॐकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥६॥
तुका म्हणे मज अवघे तुझे नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥ ७ ॥

4.      नाम गाऊं नाम ध्याऊं । नाम

नाम गाऊं नाम ध्याऊं । नाम विठोबासी वाहूं ॥१॥
आम्ही दैवाचे दैवाचे ॥ दास पंढरीरायाचे ॥२॥
टाळ दिंडी घेऊनि हातीं । केशवराज गाऊं गीति ॥३॥
नामा म्हणे लाखोली सदा । अनंत नामें वाहूं गोविंदा ॥४॥

5.      अवघ्या उपचारा । एक मनचि

अवघ्या उपचारा । एक मनचि दातारा ॥१॥
घ्यावी घ्यावी माझी सेवा । दीन दुर्बळाची देवा ॥२॥
अवघियाचा ठाव । पायांवरी जीवभाव ॥३॥
चित्ताचे आसन । तुका करितो कीर्तन ॥४॥

पूजेचे अभंग मालिका समाप्त

भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *