सार्थ पंचदशी मराठी त्रयोदशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे अद्वैतानन्दः श्लोक ८१ ते १०४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

यावद्यावदवज्ञा स्यात्तावत्तावत्तदीक्षणम् ।
यावद्यावद्वीक्ष्यते तत्तावत्तावदुभे त्यजेत् ॥ ८१ ॥
तदभ्यासेन विद्यायां सुस्थितायामयं पुमान् ।
जीवन्नेव भवेन्मुक्तो वपुरस्तु यथा तथा ॥ ८२ ॥
तच्चिन्तनं तत्कथनमन्योन्यं तत्प्रबोधनम् ।
एतदेकपरत्वं च तदभ्यासं विदुर्बुधाः ॥ ८३ ॥
वासनानेककालिना दीर्घकालं निरन्तरम् ।
सादरं चाभ्यस्यमाने सर्वथैव निवर्तते ॥ ८४ ॥
मृच्छक्तिवत् ब्रह्मशक्तिरनेकाननृतान्सृजेत् ।
यद्वा जीवगता निद्रा स्वप्नश्चात्र निदर्शनम् ॥ ८५ ॥

निद्राशक्तिर्यथा जीवे दुर्घटस्वप्नकारिणी ।
ब्रह्मण्येषा तथा माया सृष्टिस्थित्यन्तकारिणी ॥ ८६ ॥
स्वप्ने वियद्गतिं पश्येत्स्वमूर्धच्छेदनं यथा ।
मुहूर्ते वत्सरौघं च मृतं पुत्रादिकं पुनः ॥ ८७ ॥
इदं युक्तमिदं नेति व्यवस्था तत्र दुर्लभा ।
यथा यथेक्ष्यते यद्यत्तत्तद्युक्तं तथा तथा ॥ ८८ ॥
ईदृशो महिमा दृष्टो निद्राशक्तेर्यदा तदा ।
मायाशक्तेरचिन्त्योऽयं महिमेति किमद्‌भुतम् ॥ ८९ ॥
शयाने पुरुषे निद्रा स्वप्नं बहुविधं सृजेत् ।
ब्रह्मण्येवं निर्विकारे विकारान्कल्पयत्यसौ ॥ ९० ॥

जसजशी नापरूपाची अवज्ञा होईल तसतसे अद्वैतदर्शन अधिक अधिक होत जाते, आणि जसजसे अद्वैत दर्शन अधिक अधिक स्पष्ट होत जातें, तसतशी नामरूपे भासेनातशी होतात. ॥ ८१॥
या आभ्यासाच्या योगाने ज्ञान दृढ झाले असतां मनुष्य जीवंत असताच मुक्त होतो. मग त्याचा देह असला तरी चिंता नाही. ॥ ८२ ॥

शि० -ब्रह्माभ्यास म्हणजे काय ? गु० -सदासर्वदा ब्रह्मतत्त्वाचेच चिंतन; त्याचेंच कथन; परस्पर त्याचाच बोध; असें जें एकपरत्व त्यास पंडित ब्रह्माध्यास असें म्हणतात. ॥ ८३ ॥
हा द्वैतसंस्कार फार दिवसांपासन चालत असल्यामुळे आस्थेने फार दिवस अभ्यास केला तरच त्याची अगदी निवृत्ति होते. ॥ ८४ ॥

शि० – एका ब्रह्मापासून हे अनेक आकार कसे उत्पन्न झाले ? गु० – एका ब्रह्मापासून जगदुत्पत्ति होणें जरी युक्तीस विरुद्ध आहे तरी मायेसहित ब्रह्मापासून ती होते असें म्हणण्यास कोणची नड आहे. मातीच्या शक्तीने जसे अनेक खोटे पदार्थ उत्पन्न होतात तसे ब्रह्मशक्तीपासून हे अनेक आकार उत्पन्न झाले किंवा यापेक्षाही चांगला दृष्टांत निद्रेचा आहे. ॥ ८५ ॥
जीवाचेठायी असणारी निद्रा जशी अघटित स्वप्नास उत्पन्न करते त्याप्रमाणें ही जगदुत्पत्ति ब्रह्माचेठायीं सृष्टि स्थिति लयरूपानें होते. ॥ ८६ ॥
स्वग्नामध्में मनुष्यास काय काय दिसतें आणि काय काय नाहीं याचा कांहीं नेम आहे काय ? मी आकाशांत उडत आहें. माझा शिरच्छेद केला असें भलतेच दिसते. व एका क्षणांत एक वर्ष गेल्यासारखे वाटतें. पुत्रमित्राचा वियोग होतो. पाहिजे तें दिसते. ॥ ८७ ॥
यांत युक्तायुक्त विचार म्हणून मुळींच नाहीं. अमुक गोष्ट योग्य म्हणता येत नाहीं व अमुक अयोग्यही म्हणता येत नाहीं. जें जें जसे जसें असतें तें तें योग्यच म्हटले पाहिजे. ॥ ८८ ॥
जर एवढ्याशा या निद्राशक्तीचा एवढा मोठा महिमा आहे, तर मायाशक्तीचा महिमा किती अचिंत्य असावा बरें ! ॥ ८९ ॥

पुरुष स्वस्थ निजला असतां निद्राशक्ति नाना प्रकारचे स्वप्न उत्पन्न करते. त्याप्रमाणें निर्विकार ब्रह्माचेठायी ही माया विकाराची कल्पना करते. ॥ ९० ॥

खानिलाग्निजलोर्व्यण्डलोकप्राणिशिलादिकाः ।
विकाराः प्राणिधीष्वन्तश्चिच्छाया प्रतिबिम्बति ॥ ९१ ॥

चेतनाचेतनेष्वेषु सच्चिदानन्दलक्षणम् ।
समानं ब्रह्म भिद्येते नामरूपे पृथक्पृथक् ॥ ९२ ॥
ब्रह्मण्येते नामरूपे पटे चित्रमिव स्थिते ।
उपेक्ष्य नामरूपे द्वे सच्चिदानन्दधीर्भवेत् ॥ ९३ ॥
जलस्थेऽधोमुखे स्वस्य देहे दृष्टेऽप्युपेक्ष्य तम् ।
तीरस्थ एव देहे स्वे तात्पर्यं स्याद्यथा तथा ॥ ९४ ॥
सहस्रशो मनोराज्ये वर्तमाने सदैव तत् ।
सर्वैरूपेक्ष्यते तद्वदुपेक्षा नामरूपयोः ॥ ९५ ॥
क्षणे क्षणे मनोराज्यं भवत्येवान्यथान्यथा ।
गतं गतं पुनर्नास्ति व्यवहारो बहिस्तथा ॥ ९६ ॥

न बाल्यं यौवने लभ्यं यौवनं स्थविरे तथा ।
मृतः पिता पुनर्नास्ति नायात्येव गतं दिनम् ॥ ९७ ॥
मनोराज्याद्विशेषः कः क्षणध्वंसिनि लौकिके ।
अतोऽस्मिन् भासमानेऽपि तत्सत्यत्वधियं त्यजेत् ॥ ९८ ॥
उपेक्षिते लौकिके धीर्निर्विघ्ना ब्रह्मचिन्तने ।
नटवत्कृत्रिमास्थायां निर्वहत्येव लौकिकम् ॥ ९९ ॥
प्रवहत्यपि नीरेऽधः स्थिरा प्रौढ शिला यथा ।
नामरूपान्यथात्वेऽपि कूटस्थं ब्रह्म नान्यथा ॥ १०० ॥
निश्छिद्रे दर्पणे भाति वस्तुगर्भं बृहद्वियत् ।
सच्चिद्‌घने तथा नानाजगद्‌गर्भमिदं वियत् ॥ १०१ ॥
अदृष्ट्वा दर्पणं नैव तदन्तस्थे क्षणं यथा ।
अमत्वा सच्चिदानन्दं नामरूपमतिः कुतः ॥ १०२ ॥

प्रथमं सच्चिदानन्दे भासमानेऽथ तावता ।
बुद्धिं नियम्य नैवोर्ध्वं धारयेन्नामरूपयोः ॥ १०३ ॥

एवं च निर्जगद्‌ब्रह्म सच्चिदानन्दलक्षणम् ।
अद्वैतानन्द एतस्मिन्विश्राम्यन्तु जनाश्चिरम् ॥ १०४ ॥
ब्रह्मानन्दाभिधे ग्रन्थे तृतीयेऽध्याय ईरितः ।
अद्वैतानन्द एव स्याज्जगन्मिथ्यात्वचिन्तया ॥ १०५ ॥
इति ब्रह्मानन्देऽद्वैतानन्दः समाप्तः ॥ १३ ॥

शि० -ते विकार कोणते ? गु० -आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी, ब्रह्मांड, लोक, प्राणी, शिला इत्यादि सष्टि. शि० -माया ही जड असून तिजपासून प्राणी कसे उत्पन्न झाले ? गु० -प्राण्याचे शरीराचेठायी असणारें अंतःकरण स्वच्छ असल्यामुळें त्यामध्यें एक चैतन्याचे प्रतिबिंब पडलें आहे. म्हणन तें चैतन्यासारखे दिसते परंतु ते वस्तुतः जडच आहे. ॥ ९१ ॥
शि० तर मग हा जड चेतन विभाग ब्रह्माचा नव्हे म्हणा. गु०-तो ब्रह्माचा कसा होईल ? सच्चिदानंद लक्षण ब्रह्म हें स्थावरजंगमीं सर्वत्र समान आहे. भेद काय तो नामरूपाचा. ॥ ९२ ॥
ज्याप्रमाणें पटावर चित्र असतें त्याप्रमाणें ब्रह्माचेठायीं ही नामरूपें आहेत. त्यांची उपेक्षा केली असतां तुझी बुद्धि सच्चिदानंदमय होईल. ॥ ९३ ॥
ज्याप्रमाणें पाण्यांत प्रतिबिंबित आपला देह दिसत असूनही त्याची उपेक्षा करून तीरावर असणारा जो खरा आपला देह त्याविषयी मात्र सत्यबुद्धि असते. ॥ ९४ ॥
किंवा नाना प्रकारचें मनोराज्य होत असून त्याची जशी मनुष्य उपेक्षा करतो, त्याप्रमाणें नामरूपाची उपेक्षा करावी. ॥ ९५ ॥

हा व्यवहार असा आहे कीं, आतां जें दृष्टीस पडते तें क्षणांत नाहीसे होते. आमचें मनोराज्य एका क्षणी जसें असतें, तसें दुसऱ्या क्षणी नाहीं. जी कल्पना एकदा झाली ती होऊनच गेली. पुनः ती व्हावयाची नाहीं हा जसा मनांतील व्यवहार तसाच बाह्य जगांतलाही समजावा. ॥ ९६ ॥
तरुणपणी बाळपण नाहीं, म्हातारपणीं तरुणपण नाहीं, गेलेला बाप पुनः येत नाही, आणि गेलेला दिवस गेलाच. ॥ ९७ ॥

ह्या क्षणभंगूर व्यवहारांत व मनोराज्यांत भेद मुळींच नाहीं. याकरितां तो जरी भासला तरी त्याविषयीची सत्य दृष्टि सोडून द्यावी. ॥ ९८ ॥
या व्यवहाराची उपेक्षा केली असतां बुद्धीला निर्विधपणें ब्रह्मचिंतन करतां येतें. शि० -मग ज्ञान्यांचा व्यवहार कसा व्हावा ? गु० -सोंगाड्या जशी वेषाप्रमाणें बतावणी करतो तसा ज्ञानी निर्वाहापुरता कसा तरी व्यवहार करूं शकतो. ॥ ९९ ॥
ज्याप्रमाणें पाण्याचा प्रवाह चालला असताही त्यांतील मोठी शिला स्थिर राहते, त्याप्रमाणें नामरूपांत कितीही भेद झाला तरी कूटस्थ ब्रह्म आहे तसेंच असतें. ॥ १०० ॥
शि० – अखंड ब्रह्माचे ठायीं अगदीं निराळ्या प्रकारचे जग कसें दिसते ? गु० -छिद्ररहित आरशामध्ये सर्व वस्तूस मावून घेणारें आकाश जसे दिसतें तसें, छिद्ररहित अखंड ब्रह्मामध्यें नानाप्रकारचें जगास मावून घेणारे आकाश दिसते. ॥ १०१ ॥
शि० -तर मग ब्रह्म मुळीच दिसत नसून केवळ जग मात्र कसें भासतें ? गु० -दर्पणाचा पृष्ठभाग जसा नजरेतून चुकून त्यांतील पदार्थ मात्र भासतात, त्याप्रमाणें सचिदानंद ब्रह्म भासत असूनही तें अदृश्य होऊन नामरूपाकडेच चित्त जातें; परंतु वास्तविक पाहता ब्रह्म आधीं भासल्यावाचून नामरूपें डोळ्यास भासणारच नाहींत असा नियम आहे. ॥ १०२ ॥
शि० -ती नामरूप पुढें असून ब्रह्म कसें पहावे ? गु० -कोणचाही पदार्थ पाहतांना आदि सच्चिदानंदाचा भास होऊन नंतर तो पदार्थ दृष्टीस पडतो. याकरितां जेव्हां जेव्हां तुझी जगाकडे दृष्टि जाते तेव्हां तेव्हां तो भास होतो न होतो इतक्यांतच बुद्धीस ओढून धरून तिला नामरूपाकडे जाऊं देऊं नये. ॥ १०३ ॥
या प्रकारचे हे सच्चिदानंदरूप जगद्‌रहित एकच ब्रह्म आहे असें सिद्ध झालें. यासच अद्वैतानद म्हणतात. यामध्ये सर्व लोक सर्वदा रममाण होतात. ॥ १०४ ॥
ब्रह्मानंद प्रकरणाच्या या तिसऱ्या अध्यायांत अद्वैतानंद आम्ही सांगितला. तो जगन्मिथ्यात्व चितनानें प्राप्त होतो. ॥ १०५ ॥ इति अद्वैतानंदः समाप्तः

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *