सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक १४१ ते १५८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

सकामो निष्काम इति ह्यशरीरो निरिन्द्रियः ।
अभयं हीति मुक्तत्वं तापनीये फलं श्रुतम् ॥ १४१ ॥
शि० -यास प्रमाण काय ? गु० -“सोऽकामो निष्काम इति” इत्यादिक श्रुतीने तापनीय उपनिषदांत उपासनेचे मोक्षरूप फळ सांगितलें आहे. ॥ १४१ ॥

उपासनस्य सामर्थ्याद्विद्योत्पत्तिर्भवेत्ततः ।
नान्यः पन्था इति ह्येतच्छास्त्रं नैव विरुध्यते ॥ १४२ ॥
शि० -उपासनेपासून मोक्षप्राप्ति होते असें आपण म्हणतां, त्यास “नान्या पंथाः” या श्रुतीचा विरोध येतो. गु० -तसा विरोध येत नाहीं. कारण उपासनेपासून साक्षात् मुक्ति होते, असें आमचे म्हणणें मुळींच नाही. तिचे सामर्थ्याने ज्ञान होऊन ज्ञानापासून मुक्ति होते. मग विरोध कसचा ? ॥ १४२ ॥

निष्कामोपासनान्मुक्तिस्तापनीये समीरिता ।
ब्रह्मलोकः सकामस्य शैब्यप्रश्ने समीरितः ॥ १४३ ॥
निष्काम उपासनेपासून मोक्षप्राप्ति होते असें तापनीय उपनिषदांत सांगितलें आहें. आणि सकामाला ब्रह्मलोक असे शैव्य प्रश्नांत सांगितलें आहे. ॥ १४३ ॥

य उपास्ते त्रिमात्रेण ब्रह्मलोके स नीयते ।
स एतस्माज्जीवघनात्परं पुरुषमीक्षते ॥ १४४ ॥
शैब्य प्रश्नांत असें सांगितलें आहे कीं, जो ‘अँकाराची उपासना करतो तो ब्रह्मलोकास जातो; तो समष्टिरूप उपाधिपासृन मुक्त होऊन परम पुरषाप्रत पावतो. म्हणजे ब्रह्म होतो. ॥ १४४ ॥

अप्रतीकाधिकरणे तत्क्रतुर्न्याय ईरितः ।
ब्रह्मलोकफलं तस्मात्सकामस्येति वर्णितम् ॥ १४५ ॥
“अमतीकालंबनान्नयति” या बादरायणांच्या सूत्रांत क्रतुर्न्याय लाविला आहे. त्याचा अभिप्राय कामानुसारें करून फलप्राप्ति होते असें ठरतें. ॥ १४५ ॥

निर्गुणोपास्तिसामर्थ्यात्तत्र तत्त्वमवेक्षणत् ।
पुनरावर्तते नायं कल्पान्ते तु विमुच्यते ॥ १४६ ॥
शि० -मग त्यांना मुक्ति कशी ? गु० -त्या त्या निर्गुण उपासनेच्या सामर्थ्याने तत्त्वज्ञान होतें. पुनः संसारांत येत नाही. कल्पांती तो मुक्त होतो. ॥ १४६ ॥

प्रणवोपास्तयः प्रायो निर्गुणा एव वेदगाः ।
क्वचित्सगुणता प्रोक्ता प्रणवोपासनस्य हि ॥ १४७ ॥
वेदांमध्ये ज्या प्रणव उपासना सांगितल्या आहेत त्या बहुतेक निर्गुण आहेत. क्वचित् स्थली सगुण सांगितली आहे. ॥ १४७ ॥

परापरब्रह्मरूप ओङ्कार उपवर्णितः ।
पिप्पलादेन मुनिना सत्यकामाय पृच्छते ॥ १४८ ॥
पिप्पलादि मुनीने प्रश्न करणाऱ्या शिष्याला पर आणि अपर ( निर्गुणसगुण) असे दोन प्रकारच ब्रह्मरूप ॐकार वर्णिले आहेत. ॥ १४८ ॥

एतदालम्बनं ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत् ।
इति प्रोक्तं यमेनापि पृच्छते नचिकेतसे ॥ १४९ ॥
“एतदालंबनम्” या वाक्याने जो जें इच्छील तें त्यास मिळतें, असें यमाने नचिकेताला सांगितलें आहे. ॥ १४९ ॥

इह वा मरणे वास्य ब्रह्मलोकेऽथवा भवेत् ।
ब्रह्मसाक्षात्कृतिः सम्यगुपासीनस्य निर्गुणम् ॥ १५० ॥
याकरितां उत्तम प्रकारें निर्गुण उपासना करणारा-ला या जन्मीं किंवा देहांतकाली किंवा ब्रह्मलोकीं ब्रह्मसाक्षात्कार होतो. ॥ १५० ॥

अर्थोऽयमात्मगीतायामपि स्पष्टमुदीरितः ।
विचाराक्षम आत्मानमुपासीतेति सन्ततम् ॥ १५१ ॥
आत्म-गीतेंतही हाच अभिप्राय सांगितला आहे. तेथें असें म्हटलें आहे कीं, विचार करण्यास ज्यांची बुद्धि समर्थ नाहीं, त्यांनीं एकसारखी सतत उपासनाच केली पाहिजे. ॥ १५१ ॥

साक्षात्कर्तुमशक्तोऽपि चिन्तयेन्मामशङ्कितः ।
कालेनानुभवारूढो भवेयं फलतो ध्रुवम् ॥ १५२ ॥
ज्याला साक्षात्कार होत नाहीं त्यानें निःशंकपणे माझें ध्यान केलें असतां काकेकरून त्याच्या अनुभवाला माझें स्वरूप येऊन त्यास खरोखर मोक्षरूप फळ मिळेल. ॥ १५२ ॥

यथागाधनिधेःलब्धौ नोपायः खननं विना ।
मल्लभेऽपि तथा स्वात्मचिन्तां मुक्ता न चापरः ॥ १५३ ॥
ज्याप्रमाणें जमिनींत खोल पुरून ठेवलेला ठेवा मिळण्याला खणण्यावाचून दुसरा उपाय नाही, त्याप्रमाणें माझ्या स्वरूपाची प्राप्ति व्हावी असें ज्याच्या मनांत असेल त्यानें आत्मध्यानच केलें पाहिजे; दुसरा उपाय नाहीं. ॥ १५३ ॥

देहोपलमपाकृत्य बुद्धिकुद्दलकात्पुनः ।
खात्वा मनोभुवं भूयो गृह्णीयान्मां निधिं पुमान् ॥ १५४ ॥
एथे मी हाच कोणी एक ठेवा आहे. त्याजवर बसविलेला देहरूप धोंडा काढून टाकून बुद्धिरूप कुदळीने मनोभूमी पुन: पुन : खणली असतां आत्मठेवा मनुष्यास मिळेलच मिळेल. ॥ १५४ ॥

अनुभूतेरभावेऽपि ब्रह्मास्मीत्येव चिन्त्यताम् ।
अप्यसत् प्राप्यते ध्यानान्नित्याप्तं ब्रह्म किं पुनः ॥ १५५ ॥
दुसरे वाक्याचे याविषयी प्रमाण आहे. तें असें कीं, जरी साक्षात्कार झाला नाहीं तरी ब्रह्मास्मि हें चिंतन सोडू नये. कारण, उपासनेच्या सामर्थ्यानें काष्ठपाषाणांत नसलेले देवपण देखील येतें. मग आयते असले ब्रह्मपण मिळेल हें सांगावयास नको. ॥ १५५ ॥

अनात्मबुद्धिशैथिल्यं फलं ध्यानाद्दिने दिने ।
पश्यन्नपि न चेद्ध्यायेत्कोऽपरोऽस्मात् पशुर्वद ॥ १५६ ॥
ध्यानापासून देहादिकांविषयींचा अभिमान दिवसेंदिवस क्षीण होतो असें प्रत्यक्ष अनुभवास येत असून जो ध्यानाची उपेक्षा करतो त्याहून दुसरा पशु कोणता ? सांग बरे ! ॥ १५६ ॥

देहाभिमानं विध्वस्य ध्यानादात्मानमद्वयम् ।
पश्यन्मर्त्यो मृतो भूत्वा ह्यत्र ब्रह्म समश्नुते ॥ १५७ ॥
ध्यानापासून या मरणशील देहाविषयीचा अभिमान जाऊन मनुष्य अमर होत्साता याच देही ब्रह्मप्राप्तीचा सोहळा भोगतो. ॥ १५७ ॥

ध्यानदीपमिमं सम्यक्परामृषति यो नरः ।
मुक्तसंशय एवायं ध्यायति ब्रह्म सन्ततम् ॥ १५८ ॥
इति ध्यानदीपो नाम नवमः परिच्छेदः ॥ ९ ॥
याप्रमाणे हा ध्यानदीप तुला सांगितला. जो मनुष्य चांगले याचे चिंतन करील तो सर्व संशय जाऊन सदोदित ब्रह्मज्ञानांत त्याचा काल जाईल. ध्यानदीपः समाप्तः ॥ १५ ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *