सार्थ पंचदशी मराठी त्रयोदशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे अद्वैतानन्दः श्लोक १ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

योगानन्दः पुरोक्तो यः स आत्मानन्द इष्यताम् ।
कथं ब्रह्मत्वमेतस्य सद्वयस्येति चेच्छृणु ॥ १ ॥

आकाशादिस्वदेहान्तं तैत्तिरीयश्रुतीरितम् ।
जगन्नास्त्यन्यदानन्दादद्वैतब्रह्मता ततः ॥ २ ॥
आनन्दादेव तज्जातं तिष्ठत्यानन्द एव तत् ।
आनन्द एव लीनं चेत्युक्तानन्दात्कथं पृथक् ॥ ३ ॥

कुलालाद्घट उत्पन्नो भिन्नश्चेति न शङ्क्यताम् ।
मृद्वदेषः उपादानं न निमित्तं कुलालवत् ॥ ४ ॥

स्थितिर्लयश्च कुम्भस्य कुलाले स्तो न हि क्वचित् ।
दृष्टौ तौ मृदि तद्वत्स्यादुपादानं तयोः श्रुतेः ॥ ५ ॥

उपादानं त्रिधा भिन्नं विवर्ति परिणामि च ।
आरम्भकं च तत्रान्त्यौ न निरंशेऽवकाशिनौ ॥ ६ ॥
आरम्भवादिनोन्यस्मादन्यस्योत्पत्तिमूचिरे ।
तन्तोः पटस्य निष्पत्तेर्भिन्नौ तन्तुपटौ खलु ॥ ७ ॥
अवस्थान्तरतापत्तिरेकस्य परिणामिता ।
स्यात् क्षीरं दधि मृत्कुम्भः सुवर्णं कुण्डलं यथा ॥ ८ ॥
अवस्थान्तरभानं तु विवर्तो रज्जुसर्पवत् ।
निरंशेऽप्यस्त्यसौ व्योम्नि तलमालिन्यकल्पनात् ॥ ९ ॥

ततो निरंश आनन्दे विवर्तो जगदिष्यताम् ।
मायाशक्तिः कल्पिका स्यादैन्द्र जालिकशक्तिवत् ॥ १० ॥

या प्रकरणांत अद्वैतानंद म्हणजे काय व तो विवकोपासून कसा प्राप्त होतो, तें येथे संवादरूपाने सांगत. शि० -आपण ज्या आत्मानंदाचे विवेचन केलें, तो आणि योगानंद हे एकच म्हणता; परंतु मिथ्यात्मा व गौणात्मा असे त्यास प्रतियोगी असल्यामुळें सजातीयत्वादि भेद येऊ पाहतो. तेव्हां या द्वितीयानंदास ब्रह्मत्व कसें येईल ? ॥ १ ॥
गु० -हा आत्मानंद अद्वितीयच आहे. कारण तैत्तिरीय श्रुध्ये “तस्माद्वा एतस्मात् आत्मन आकाश”या वाक्याने आकाशापासून आमचे देहापर्यंत सर्व जग आत्मानंदातून निराळें नाहीं असें ठरतें. त्यावरून तो अद्वितीय ब्रह्मच म्हटला पाहिजे. ॥ २ ॥
शि० -पण ती श्रुति आत्म्याविषयी आहे अनंदाविषयी नाहीं. गु० -अरे आत्मा आणि आनंद यांत कांहीं भेद नाहीं. आनंदाविषयीचेच प्रमाण पाहिजे तर दुसरे आहे तें तुला सांगतो म्हणजे झाले कश्रुतींत असेही म्हटले आहे कीं, हें जग आनंदापासून झालें आहे, त्यांतच तें राहते व त्यांतच तें लीन होतें. म्हणून तें आनंदापासून भिन्न नाहीं. कारण कार्य हें कारणापासन भिन्न नसतें. ॥ ३ ॥
शि० -कारण कार्यापासन भिन्न नसतें असा जो आपण नियम केला, त्यास अपवाद आहे. कुलालापासून घट उत्पन्न होतो म्हणून कुलाल हा त्याचें कारण झालें पण तो घटापासून भिन्न आहे काय ? गु० – आमचा आनंद घटाचे उपादान कारण जसे माती, तसा जगाला उपदान कारण आहे. कुलालाप्रमाणे निमित्त कारण नव्हे. ॥ ४ ॥
शि० -कुलालच कां उपादान कारण म्हणूं नये. गु० -उपदान कारणाचे लक्षण हेंच कीं, तें स्थिति आणि लय या दोहोंस आधार असतें. घटाच्या स्थितिलयांस कुलाल आधार होत नसल्यामुळें उपादानाचें लक्षण त्यास लागू पडत नाहीं. परंतु घटाचे स्थितिलय मातीत होतात, म्हणून माती हें उपादान कारण घटाचें होय. त्याचपप्रमाणे जगाच्या स्थितिलयांस श्रुतींत सांगितल्याप्रमाणे आनंद हा आधार आहे म्हणून तो जगाचा उपादान म्हटला पाहिजे. ॥ ५ ॥
शि० -उपादान कारणाचें लक्षण समजले मग पुढें काय ? गु० -हे उपादान कारण तीन प्रकारचे आहे. विवर्ति परिणामि आणि आरंभक. यांपैकी शेवटच्या दोन प्रकारांला निरवयव वस्तूंत अवकाशच मिळत नाहीं. ॥ ६ ॥
शि० -त्या तिन्ही प्रकारांचे विवरण कृपा करून सांगा. गु० -आरंभवाद्यांचे मत असें आहे कीं एका कारणापासन निराळ्याच प्रकारचे कार्य उत्पन्न होते. यास उदाहरण तंतूपासून पट उत्पन्न होतो. येथें तंतु आणि पट भिन्न आहेत. ॥ ‘७ ॥
एका पदार्थाचे जे अवस्थांतर होतें, त्याला परिणाम म्हणतात. दूध, दही, माती, घट, सुवर्ण, कुंडल ॥ ८ ॥

आणि वस्तूची पूर्वावस्था न जातां अवस्थांतराचा जो भास होतो तोच विवर्त, जसा रज्जूवर सर्पाचा भास होतो. शि० -पण रज्जू सावयव आहे. गु० -हा विवर्त सावयवावर जसा घडतो, तसा निरवयवावरही घडतो. यास उदाहरण आकाशाचे. आकाशास वस्तुत: रंग कोणचाच नसून तें निळे दिसते. ॥ ९ ॥
शि०- मग तुमच्या आनंदाला कोणचा प्रकार लागू पडतो ? गु० -आनंदास विवर्त लागू पडतो. जसा रज्जूवर सर्प भासतो त्याप्रमाणें आनंदावर हे जग भासत आहे. शि० -तुमचा आनंद अद्वितीय आहे असें म्हणता. त्यावर जगाची कल्पना तरी कशी झाली ? गु० -मायेमुळें झाली. जशी ऐंद्रजालिक शक्तीला गंरधग्वनगरादिकांची कल्पना करतां येते, त्याप्रमाणें मायेमुळे जगाची कल्पना झाली. ॥ १० ॥

शक्तिः शक्तात्पृथङ्नास्ति तद्वद्दृष्टेर्न चाभिदा ।
प्रतिबन्धस्य दृष्टत्वाच्छक्त्यभावे तु कस्य सः ॥ ११ ॥

शक्तेः कार्यानुमेयत्वादकार्ये प्रतिबन्धनम् ।
ज्वलतोऽग्नेरदाहे स्यान्मन्त्रादि प्रतिबन्धता ॥ १२ ॥

देवात्मशक्तिं स्वगुणैर्निगूढां मुनयोऽविदन् ।
परास्य शक्तिर्विविधा क्रियाज्ञानबलात्मिका ॥ १३ ॥
इति वेदवचः प्राह वसिष्ठश्च तथाऽब्रवीत् ।
सर्वशक्तिपरं ब्रह्म नित्यमापूर्णमद्वयम् ॥ १४ ॥
यथोल्लसति शक्त्यासौ प्रकाशमधिगच्छति ।
चिच्छक्तिर्ब्रह्मणो राम शरीरेषूपलभ्यते ॥ १५ ॥
स्पन्दशक्तिश्च वातेषु दार्ढ्यशक्तिस्तथोपले ।
द्रवशक्तिस्तथाम्भःसु दाहशक्तिस्तथानले ॥ १६ ॥
शून्यशक्तिस्तथाकाशे नाशशक्तिर्विनाशिनि ।
यथाण्डान्तर्महासर्पो जगदस्ति तथात्मनि ॥ १७ ॥
फलपत्रलतापुष्पशाखाविटपमूलवान् ।
तनु बीजे यथा वृक्षस्तथेदं ब्रह्मणि स्थितम् ॥ १८ ॥
क्व चित्काश्चित्कदाचिच्च तस्मादुद्यन्ति शक्तयः ।
देशकालविचित्रत्वात्क्ष्मातलादिव शालयः ॥ १९ ॥
स आत्मा सर्वगो राम नित्योदितमहावपुः ।
यन्मनाङ्मननीं शक्तिं धत्ते तन्मन उच्यते ॥ २० ॥

शि० -मायेमुळे जर जगाची कल्पना झाली, तर तुमच्या आनंदाखेरीज दुसरी माया म्हणून एक आहेच, तेव्हां अर्थात द्वैत आलें. गु० -ज्या पदार्थाचे अमुक निरूपणच करतां येत नाहीं, तो मिथ्याच म्हटला पाहिजे. माया ही एक शक्ति आहे. ती जर आनंदापासून निराळी समजावी तर शक्त पदार्थांपासून शक्ति मुळींच निराळी नाहीं, असा आमचा अनुभव आहे. बरे निराळी नाहीं म्हणावी तर काही कारणांनी तिचा प्रतिबंध होतो. शक्ति जर निराळी नसेल तर प्रतिबंध कोणाला होईल. म्हणून ती अनिर्वचनीय आहे. ॥ ११ ॥
शि० -शक्ति मुळी अतींद्रिय पडली मग तिचा प्रतिबंध कसा ओळखावा ? गु० -शक्तीचें अनुमान कार्यावरून करावयाचें. तें कार्य बंद झालें म्हणजे प्रतिबंध झाला अस समजावे. यास उदाहरण अग्नीचे. अग्निशक्ति तिचे जें कार्य दाहकत्व त्यावरून समजावयाची. तें कार्य नाहींसें झालें म्हणजे शक्तीस मंत्रादिकांचा प्रतिबंध झाला असें समजावे. ॥ १२ ॥
याप्रमाणे याविषयीं उपनिषदांत प्रमाण आहे तें असें कीं, मोठमोठे मुनि परमात्म्याची शक्ति तिचे कार्यामध्ये झाकली असें ध्यान करून पाहते झाले. दुसरे एके ठिकाणी म्हटलें आहे कीं, ह्या परमात्मशक्तीचे स्वरूप क्रिया ज्ञान बलरूप आहे. ॥ १३
योगवासिष्ठांतही असेंच सांगितले आहे. वसिष्ठ म्हणतात हे रामा, हें परब्रह्म नित्य पूर्ण अद्वितीय असून सर्व शक्ति त्याच्याच आहेत. ॥ १४ ॥
त्या शक्तीच्या योगाने जेव्हां ब्रह्म प्रफुल्लित होतें, तेव्हां हे जग दिसूं लागतें. ती शक्ति जीवाचे ठायीं चेतनरूप आहे. ॥ १५ ॥

वायूत चलनरूप आहे. दगडांत दार्ढ्यरूप आहे. उदकांत द्रवरूप आहे. अग्नींत दाहरूप आहे. ॥ १६ ॥

आकाशांत शून्यरूप व विनाशी पदार्थात नाशरूप आहे. ज्याप्रमाणें लहानशा अंड्यामध्ये महासर्प गुप्तरूपाने असतो किंवा एका लहनशा बीजामध्ये फलपुष्पशाखामूलयुक्त वृक्ष असतो, त्याप्रमाणें हें सर्व जग ब्रह्माचेठायी मावले आहे. ॥ १७-१८ ॥

पृथ्वीच्या ज्याप्रमाणें अमुकच देशांत अमुक काळीं अमुकच प्रकारची धान्य फळें पिकतात, त्याप्रमाणें या ब्रह्मावर देशकालाप्रमाणें निरनिराळ्या शक्ति उत्पन्न होतात. ॥ १९ ॥
हे रामा, असा जो सर्वव्यापी आत्मा त्यापासून पूर्वी मनन शक्ति जी उत्पन्न झाली त्यास मन असें म्हणतात. ॥ २० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *