सार्थ पंचदशी मराठी द्वादशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे आत्मानन्दः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

अथ केयं भवेत्प्रीतिः श्रूयते या निजात्मनि ।
रागो वध्वादि विषये श्रद्धा यागादि कर्मणि ॥ २१ ॥

भक्तिः स्याद्गुरुदेवादाविच्छा त्वप्राप्तवस्तुनि ।
तर्ह्यस्तु सात्विकी वृत्तिः सुखमात्रानुवर्तिनी ॥ २२ ॥

प्राप्ते नष्टेऽपि सद्‌भावादिच्छतो व्यतिरिच्यते ।
सुखसाधनतोपाधेरन्नपानादयः प्रियाः ॥ २३ ॥

आत्मानुकुल्यादन्नादिसमश्चेदमुनात्र कः ।
अनुकूलयितव्यः स्यान्नेकस्मिन्कर्मकर्तृता ॥ २४ ॥

सुखे वैषयिके प्रीतिमात्रमात्मा त्वतिप्रियः ।
सुखे व्यभिचरत्येषा नात्मनि व्यभिचारिणी ॥ २५ ॥

एकं त्यक्त्वाऽन्यदादत्ते सुखं वैषयिकं सदा ।
नात्मा त्याज्यो न चादेयस्तस्मिन्व्यभिचरेत्कथम् ॥ २६ ॥
हानादानविहीनेस्मिन्नुपेक्षा चेत्तृणादिवत् ।
उपेक्षितुः स्वरूपत्वान्नोपेक्ष्यत्वं निजात्मनः ॥ २७ ॥

रोगक्रोधाभिभूतानां मुमूर्षा वीक्ष्यते क्वचित् ।
ततो द्वेषाद्‌भवेत्त्याज्य आत्मेति यदि तन्न हि ॥ २८ ॥
त्यक्तुं योग्यस्य देहस्य नात्मता त्यक्तुरेव सा ।
न त्यक्तर्यस्ति स द्वेषस्त्याज्ये द्वेषे तु का क्षतिः ॥ २९ ॥

आत्मार्थत्वेन सर्वस्य प्रीतेश्चात्मा ह्यतिप्रियः ।
सिद्धो यथा पुत्रमित्रात्पुत्रः प्रियतरस्तथा ॥ ३० ॥

शिष्य -आत्म्याविषयी अनिमित्त प्रीति जी आपण सांगितली ती कोणची म्हणून समजावी ? जगामध्ये प्रीतीची चार स्वरूपे राग, श्रद्धा, भक्ति आणि इच्छा ( आवड) आतां दृष्टीस पडतात. राग हीच आपण सांगितलेली प्रीति म्हणावी तर ती केवळ स्त्री पुत्र धन इत्यादिकांच्याठायीं, श्रद्धा यज्ञयागादि कर्माविषयीच आहे. ॥ २१ ॥
भक्ति म्हणावी तर ती केवळ गुरुदेवतेविषयीच आणि इच्छा म्हणजे आवड म्हणावी तर ती केवळ अप्राप्य वस्तूविषयींच. तर तुम्ही सांगितलेली जी एक सारखी असणारी प्रीति ती यांपैकी कोणती ? गु० -तूं ज्या चार प्रकारच्या प्रीति सांगितल्यास त्यांना व्यभिचार घडतो तसा आमच्या आत्मप्रीतीस व्यभिचार मुळीच नाहीं. तर त्या प्रीतीचे स्वरूप तुला आतां सांगतो. सर्वदा सुखावरच जडलेली अशी अंतःकरणाची सात्विकवृत्ति तीच आमची आत्मप्रीति. ॥ २२॥
शि० -मग ती इच्छा म्हणावी. आत्मप्रीति कसची ? गु० -ती इच्छा होऊं शकत नाहीं. कारण इच्छा ही वस्तु प्राप्त होण्यापूर्वी मात्र असते. परंतु या प्रीतीची गोष्ट तशी नाहीं. वस्तु प्राप्त होवो किंवा नष्ट हो, ती जशाची तशी असते. म्हणून ही आत्मप्रीतीच आहे. इच्छा नव्हे.॥ २३ ॥
शि० -अन्नपानादि पदार्थ सुखास साधनीभूत आहेत म्हणून ते प्रिय झाले आहेत. यावरून असें अनुमान होतें कीं, ज्या ज्या म्हणून प्रिय वस्तु त्या त्या सुखाची साधने आहेत. आतां आपण म्हणतां कीं, आत्मा प्रिय आहे. त्यावरून त्यालाही सुखसाधनत्व आलें. मग बाकीच्या अन्नपानादिकांत व आत्म्यांत भेद तो काय ? गु० -आत्मा हा अन्नपानादिकांप्रमाणें सुखसाधन म्हणतां येत नाहीं. कारण अन्नपानादिकांपासून असें निराळें एक सुख प्राप्त होण्याचें असतें, तसें आत्मरूप साधनाने सुख घेणारा कोण; शि० -आत्म्यापासून सुख आत्म्यानेच घ्यावे गु० -तसें मानल्यास एकाला कर्मता आणि कर्तृता येऊन विरोध येईल. ॥ २४॥
शि० – वैषयिक सुखावरही तशीच प्रीति असते. तेव्हां तुमचा आत्मा आणि विषयसुख यांत भेद काय ? गु० -भेद आहे; नाहीं कसा ! विषयसुखावर प्रीति जरी असली तरी ती केवळ प्रीति होय. ती निरतिशय नव्हे म्हणजे एकसारखी नसते. ती एका विषयसुखास सोडून दुसऱ्यावर जाते. म्हणून ती व्यभिचारिणी होय. तशी आत्मप्रीति नव्हे. या प्रीतीस कधीं व्यभिचारच नाहीं. म्हणून आत्मा अतिप्रिय आहे. ॥ २५ ॥
ती जशी एका विषयसुखास सोडून दुसऱ्यावर जाते तशी ही आत्मप्रीति नव्हे. कारण, आत्म्याचा त्यागही घडत नाहीं आणि ग्रहणही घडत नाहीं. तेव्हां त्या प्रीतीस व्यभिचार कसा येईल ? ॥ २६ ॥
शि० -ज्या वस्तूस त्याग आणि ग्रहण नाही ती तृणासारखी उपेक्षेस पात्र आहे; म्हणून तुमचा आत्माही तसा उपेक्ष्य म्हणजे तुच्छ झाला कीं ? गु० -तुच्छ कसा होईल, अरे जो त्याग ग्रहणास विषय नाहीं तो उपेक्षेस तरी कसा विषय होईल. उपेक्षा करणारा आणि आत्मा यामध्ये मुळीं भेदच नाहीं. तेव्हां याची उपेक्षा कोण करणार ? ॥ २७॥
शि० – मनुष्याला रोगाने फार ग्रासले असतां किंवा अतिसंताप आला असतां, त्यास मरणाची इच्छा झालेली जगांत दृष्टीस पडते, यावरून आत्मा द्वेषामुळे त्याज्य आहे असें होते. ॥२८॥
गु० -होय मरणाची इच्छा मनुष्यास होते. पण ती देहत्यागाची इच्छा. देह कांहीं आत्मा नव्हे. देहाचा त्याग करणारा जो कोणी निराळा आहे तो आत्मा आणि त्याविषयी कांहीं त्याचा द्वेष नसतो. शि० -देहाविषयी तरी असतो ना ? गु० -देहाविषयी असेना बापडा. तेणेकरून आमचे सिद्धांतास काय हानी. ॥ २९ ॥
याकरिता सर्व पदार्थांवरील प्रीति आत्मार्थच असल्यामुळें तो ज्याप्रमाणें पुत्रास्तव पुत्राचा मित्र झाल्यामुळे पुत्रच मित्रापेक्षां अधिक प्रिय असला पाहिजे, त्याप्रमाणें आत्माही सर्वांमध्ये प्रिय आहे हें सिद्ध झालें. ॥ ३० ॥

मा न भूवमहं किं तु भूयासं सर्वदेत्यसौ ।
आशीः सर्वस्य दृष्टेति प्रत्यक्षा प्रीतिरात्मनि ॥ ३१ ॥
इत्यादिभिस्त्रिभिः प्रीतो सिद्धायामेवमात्मनि ।
पुत्रभार्यादिशेषत्वमात्मनः कैश्चिदिरितम् ॥ ३२ ॥
एतद्विवक्षया पुत्रे मुख्यात्मत्वं श्रुतीरितम् ।
आत्मा वै पुत्रनामेति तच्चोपनिषदि स्फुटम् ॥ ३३ ॥
सोऽस्यायमात्मा पुण्येभ्यः कर्मेभ्यः प्रतिधीयते ।
अथास्येतर आत्मायं कृतकृत्यः प्रमीयते ॥ ३४ ॥
सत्यप्यात्मनि लोकोऽस्ति नापुत्रस्यात एव हि ।
अनुशिष्टं पुत्रमेव लोक्यमाहुर्मनीषिणः ॥ ३५ ॥
मनुष्यलोको जय्यः स्यात्पुत्रेणैवेतरेण नो ।
मुमूर्षुर्मन्त्रयेत्पुत्रं त्वं ब्रह्मेत्यादिमन्त्रकैः ॥ ३६ ॥

इत्यादिश्रुतयः प्राहुः पुत्रभार्यादिशेषताम् ।
लौकिका अपि पुत्रस्य प्राधान्यमनुमन्यते ॥ ३७ ॥
स्वस्मिन्मृतेऽपि पुत्रादिर्जीवेद्वित्तादिना यथा ।
तथैव यत्‍नं कुरुते मुख्याः पुत्रादयस्ततः ॥ ३८ ॥
बाधमेतावता नात्मा शेषो भवति कस्यचित् ।
गौणमिथ्यामुख्यभेदैरात्मायं भवति त्रिधा ॥ ३९ ॥
देवदत्तस्तु सिंहोऽयमित्यैक्यं गौणमेतयोः ।
भेदस्य भासमानत्वात्पुत्रादेरात्मता तथा ॥ ४० ॥

शि० -युक्तीनें तसें सिद्ध पण अनुभव कुठे तसा आहे. गु० – अनुभवही तसाच आहे. मीं सदा सर्वदा असावे कधींच नष्ट होऊं नये. अशी आत्मप्रीतिदर्शक इच्छा कोणास बरें नाहीं ? तस्मात् अनुभवावरूनही सिद्ध झालें. ॥ ३१ ॥
शि० -याप्रमाणें अनुभव, युक्ति आणि श्रुति या तीन प्रमाणांनीं आत्म्यावरील अति प्रति सिद्ध केली. पण कित्यकांचे मत असें आहे कीं, पुत्रभार्यादिकाकरिताच आपण आहो. ॥ ३२ ॥
तीं कांहीं आपणाकरिता नव्हेत. म्हणूनच तींच अतिप्रीतीस पात्र आहेत. व याविषयी श्रुतीमध्ये प्रमाणही आढळतें. “आत्मा वै पुत्रनामासि” असें उपनिषदामध्यें पुत्राला मुख्यत्व दिले आहे. ॥ ३३ ॥
श्रुतींत असें म्हटले आहे कीं, “बाप आपल्या मुलाला पुण्यकर्मानुष्ठानाकरितां आपल्या जागी प्रतिनिधी नेमून आपण जराग्रस्त होऊन कृतकृत्य बुद्धीने देह ठेवितो.” ॥ ३४ ॥
याप्रमाणें पुत्राला मुख्यात्मत्व सिद्ध होतें म्हणून पित्याचा आत्मा जरी असला, तरी “अपुत्राला लोक नाहीं” असें पुराणांतच सांगितलें आहे. याकरिताच पित्याने ज्यास पुढील मंत्राचा उपदेश केला असा पुत्रच परलोकास साधन आहे असें पंडित म्हणतात. ॥ ३५ ॥
इतकेंच नव्हे तर ऐहिक सुखास देखील मुलाचीच गरज आहे. याविषयी श्रुतिप्रमाण असें आहे की, हा मनुष्यलोक पुत्रानेंच जिंकण्यास योग्य आहे. इतर कोणच्याही कर्मीनें तो जिंकता येत नाहीं. कारण निपुत्रिकांस कितीही संपत्ति असली तरी तिजपासून त्यांस सुख होत नाही. वर जो उपदेश म्हणून सांगितला तो मरणाच्या वेळीं बाप मुलाला करतो तो असा – “तूंच ब्रह्म, तच लोक आणि तच यज्ञ. “॥ ३६ ॥
या सर्व श्रुतींमध्ये आत्म्यापेक्षा पुत्रभार्यादिकानांच महत्त्व दिलें आहे इतकेंच नव्हे, तर पुत्राला या रीतींचे प्राधान्य जगांत सर्व लोक देतात. ॥ ३७ ॥
आपण मेलो तरी बायकामुलांनीं सुखाने रहावे म्हणून मनुष्य पैसा जमीन इत्यादिकांची तजवीज होईल तितकी आपण स्वत: दुःख भोगूनही करतो. याकरिता पुत्रादिकच मुख्य आहेत असें ठरतें. ॥ ३८ ॥
गु० -तं म्हणतोस तें खरे आहे. परंतु एवढ्यावरूनच पुत्रदारांपेक्षा आत्मा कमी प्रिय ठरतो असें समजू नको. कारण आत्म्याचे प्रकार तीन आहेत. एक गौणात्मा दुसरा मिथ्यात्मा आणि तिसरा मुख्यात्मा. ॥ ३९॥
हा देवदत्त सिंह आहे असें म्हणून आम्हीं जेव्हां दोघांचे ऐक्य करतो, तेव्हां उभयतांमध्ये भेद असल्यामुळें तें ऐक्य खेर नव्हे. केवळ औपचारिक आहे. तसाच पुत्रत्माही गौणच समजला पाहिजे. ॥ ४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *