सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

देहाद्यात्मत्वविभ्रान्तौ जागृत्यां न हठात्पुमान् ।
ब्रह्मात्मत्वेन विज्ञातुं क्षमते मन्दधीत्वतः ॥ २१ ॥
गुरु – जरी शास्त्राचे ठायीं महावाक्यांनीं ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्याजोगें वर्णन केलें आहे, तरी त्याचा अर्थ मूढास समजत नाहीं. कारण कीं, देहादिकाला मी म्हणणें अशी जी भ्रांति ती सतत असल्यामुळें पुरुषास मी ब्रह्म आहें असें ज्ञान मंदबुद्धीमुळें होत नाहीं. ॥ २१ ॥

ब्रह्ममात्रं सुविज्ञेयं श्रद्धालोः शास्त्रदर्शिनः ।
अपरोक्षद्वैतबुद्धिः परोक्षद्वैतबुद्ध्यनुत् ॥ २२ ॥
शि० -बुद्धिमांद्यामुळें ज्याला अपरोक्ष ज्ञान होत नाहीं त्याला परोक्ष ज्ञान तरी कसें होईल ? गु० – शास्त्रावर जर मनुष्याची श्रद्धा असेल तर तेवढ्याने त्यास ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होतें. कारण, प्रत्यक्ष देहादिकांचा भ्रम जसा अपरोक्ष ज्ञानाच्या आड येतो तसा परोक्ष ज्ञानाच्या आड येत नाहीं. ॥ २२॥

अपरोक्षशिलाबुद्धिर्न परोक्षेशतां नुदेत् ।
प्रतिमादिषु विष्णुत्वे को वा विप्रतिपद्यते ॥ २३ ॥
प्रतिमेचे ठायीं प्रत्यक्ष जी शिला बुद्धि ती परोक्ष ईश बुद्धीस आड येत नाहीं. विष्णुचे प्रतिमेंत विष्युत्वाविषयीं संशय नाहीं. ॥ २३ ॥

अश्रद्धालोरविश्वासोः नोदाहरणमर्हति ।
श्रद्धालोरेव सर्वत्र वैदिकेष्वधिकारतः ॥ २४ ॥
शिष्य – कित्येकांना त्याविषयी शंका येते. गुरु- ज्याना श्रद्धा नाहीं त्यांना संशय येत असेल, परंतु तो -आम्ही जमेत धरीत नाहीं. कारण, सर्व वैदिक विषयामध्यें श्रद्धाळू पुरुषच अधिकारी आहेत.॥ २४॥

सकृदाप्तोपदेशेन परोक्षज्ञानमुद्‌भवेत् ।
विष्णुमूर्त्युपदेशो हि न मीमांसामपेक्षते ॥ २५ ॥
आप्ताच्या सकृदुपदेज्ञाने जर परोक्षज्ञान होते तर विष्णूमूर्तीच्या शास्त्रोक्त उपदेशाशापासून परोक्ष ज्ञान कां न व्हावें. याविषयी फारसा विचार नलगे. ॥ २५ ॥

कर्मोपास्ती विचार्येतेऽनुष्ठेयाविनिर्णयात् ।
बहुशाखाविप्रकीर्णं निर्णेतुं कः प्रभुर्नरः ॥ २६ ॥
शि० -मग शास्त्रानें तरी त्याचा विचार कां केला ? गु० -ज्या कर्माचे किंवा उपासनेचे अनुष्ठान करावयाचें तें वेदाच्या अनेक शाखांमध्यें निरनिराळ्या रीतीनें सांगितलें आहे. त्याची एकवाक्यता शास्त्रविचारावाचून मनुष्यास होणें कठिण आहे. म्हणून तो विचार अवश्य आहे. याकरिता तसा शास्त्रानें विचार केला. ॥ २६ ॥

निर्णितोऽर्थः कल्पसूत्रैर्ग्रथितस्तावतास्तिकः ।
विचारमन्तरेणापि शक्तोऽनुष्ठातुमञ्जसा ॥ २७ ॥
एरव्ही जो श्रद्धाळू पुरुष आहे त्याला विचाराची गरज नाही. कारण, जैमिन्यादिक आचार्यांनी कल्पसूत्रांही करून ज्या उपासनेचा निर्णय केला आहे तेवढा त्याच्या अनुष्ठानास बस आहे. ॥ २७ ॥

उपास्तीनामनुष्ठानमार्षग्रन्थेषु वर्णितम् ।
विचाराक्षममर्त्याश्च तत्श्रुत्वोपासते गुरोः ॥ २८ ॥
शि० – उपासना करणारास विचारावाचून तिचा प्रकार समजण्यास मार्ग कोणता ? गु० -उपासनेचे अनष्ठान वसिष्ठादि ऋषिप्रणीत ग्रंथामध्यें चांगले सांगितलें आहे. तो प्रकार गुरुमुखापासून ऐकून घेऊन मंद बुद्धीच्या लोकांनी उपासना करावी. ॥ २८ ॥

वेदवाक्यानि निर्णेतुमिच्छन्मीमांसतां जनः ।
आप्तोपदेशमन्त्रेण ह्यनुष्ठानं तु सम्भवेत् ॥ २९ ॥
शि० -तर हलींचेही ग्रंथकार उपासनेचा विचार कां करतात ? गु० -ते केवळ आपल्या संतोषाकरतां करितात. वेदवाक्यांचा निर्णय करावा असें ज्याच्या मनांत आहे त्यानें हवी तर त्यांची मीमांसा करावी. पण अनुष्ठान जर म्हणशील तर तें केवळ गुरूच्या उपदेशमात्रानेच होतें. ॥ २९ ॥

ब्रह्मसाक्षात्कृतिस्त्वेवं विचारेण विना नृणाम् ।
आप्तोपदेशमात्रेण न सम्भवति कुत्रचित् ॥ ३० ॥
पण ब्रह्मसाक्षात्काराची गोष्ट तशी नाहीं. तो होण्यास विचार मनुष्यांनी केलाच पाहिजे. केवळ गुरूच्या उपदेशमात्रेकरूनच तो होईल असें कधीं कोणी समजू नये. ॥ ३० ॥

परोक्षज्ञानमश्रद्धा प्रतिबध्नाति नेतरत् ।
अविचारोऽपरोक्षस्य ज्ञानस्य प्रतिबन्धकः ॥ ३१ ॥
याचे कारण असें आहे कीं, परोक्ष ज्ञानाला प्रतिबंध काय तो अश्रद्धेचा अविचार हा त्याच्या आड मुळींच येत नाहीं. पण अपरोक्ष-ज्ञानाला प्रतिबंध करणारा अविचारच आहे. ॥ ३१ ॥

विचाराप्यपरोक्षेण ब्रह्मात्मानं न वेत्ति चेत् ।
आपरोक्ष्यावसानत्वाद्‌भूयोभूयो विचारयेत् ॥ ३२ ॥
शि० -विचार करूनही अपरोक्ष ज्ञान झालें नाहीं तर कसे करावे. गु० – तसें ज्ञान होईपर्यंत पुनः पुनः विचारच करावा. दुसरा मार्ग नाही’. ॥ ३२ ॥

विचारयन्नामरणं नैवात्मानं लभेत चेत् ।
जन्मान्तरे लभेतैव प्रतिबन्धक्षये सति ॥ ३३ ॥
शि० -पुनः पुनः मरेपर्यंतही विचार करून साक्षात्कार झाला नाहीं तर कसें करावे ? गु० -कांहीं प्रतिबंध असतात ते ह्या जन्मी नष्ट न झाले तर पुढील जन्मी त्यांचा नाश होऊन आत्मप्राप्ति होईल. ॥ ३३ ॥

इह वामुत्र वा विद्येत्येवं सूत्रकृतोदितम् ।
शृण्वन्तोऽप्यत्र बहवो यन्न विद्युरिति श्रुतिः ॥ ३४ ॥
शि० -असें कोठे सांगितलं आहे ? गु० – “इहवाऽमुत्रवाविद्या” असें व्यासाचे सूत्र आहे; तसेंच ” शृण्वंतोप्यत्रबहवो यन्न विद्युः ” असें श्रुतिप्रमाणही आहे. ॥ ३४ ॥

गर्भ एव शयानः सन्वामदेवोऽवबुद्धवान् ।
पूर्वाभ्यस्तविचारेण यद्वदध्ययनादिषु ॥ ३५ ॥
शि० -असा साक्षात्कार कोणाला झाला ? श्रुतीमध्यें वामदेवाची कथा तूं ऐकलीच असेल. त्याला पूर्वाभ्यासामुळे गर्भांतच असतांना साक्षात्कार झाला, कीं जसे आज पाठ केलेले उद्या आठवते. ॥ ३५ ॥

बहुवारमधीतेऽपि तदा नायाति चेत्पुनः ।
दिनान्तरेऽनधीत्यैव पूर्वाधीतं स्मरेत्पुमान् ॥ ३६ ॥
पुष्कळदा एकच लोक पाठ करूनही जर त्याच दिवशीं तो न आला तरी दुसरे दिवशीं तो आपोआप आठवतो. ॥ ३६ ॥

कालेन परिपच्यन्ते कृषिदर्भादयो यथा ।
तद्वदात्मविचारोऽपि शनैः कालेन पच्यते ॥ ३७ ॥
ज्याप्रमाणें कृषि, गर्भ इत्यादिक पक्व होण्यास काळ लागतो त्याप्रमाणें आत्मविचारही हळू हळूच पक्व होतो. ॥ ३७ ॥

पुनः पुनर्विचारोऽपि त्रिविधप्रतिबन्धतः ।
न वेत्ति तत्त्वमित्येतद्वार्तिके सम्यगीरितम् ॥ ३८ ॥
शि० -पुन; पुनः विचार करूनही ज्ञान होत नाहीं असें कोठे सांगितलें आहे. गु० -तत्त्वज्ञानास अडथळा करणारे तीन प्रकारचे प्रतिबंध आचार्यांनी आपल्या वार्तिकांत चांगल्या रीतीनें सांगितले आहेत. ॥ ३८ ॥

कुतस्तज्ज्ञानमिति चेत्तद्धि बन्ध परिक्षयात् ।
असावपि च भूतो वा भावी वा वर्तते ताथा ॥ ३९ ॥
तेथें ज्ञानाची प्राप्ति कज्ञाने होतें अशा शिष्यप्रश्नावर गुरूंनी उत्तर दिलें आहे कीं, बाबारे ज्ञान होण्यास तीन प्रतिबंध आहेत. एक भावी, दुसरा भूत, तिसरा वर्तमान ॥ ३९ ॥

अधीतवेदवेदार्थोऽप्यत एव न मुच्यते ।
हिरण्यनिधिदृष्टान्तादिदमेव हि दर्शितम् ॥ ४० ॥
मनुष्य वेद पढला तरी मुक्त होत नाहीं. जशाचा तसा कोरडा राहतो. ज्याप्रमाणें धन पुरलेली जागा न समजल्यामुळें त्याला तो ठेवा सांपडत नाहीं. ॥ ४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *