सार्थ पंचदशी मराठी द्वादशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे आत्मानन्दः श्लोक ८१ ते ९०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

यद्योगेन तदेवैति वदामो ज्ञानसिद्धये ।
योगः प्रोक्तो विवेकेन ज्ञानं किं नोपजायते ॥ ८१ ॥

यत् साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
इति स्मृतं फलैकत्वं योगिनां च विवेकिनाम् ॥ ८२ ॥
असाध्यः कस्यचिद्योगः कस्यचिज्ज्ञाननिश्चयः ।
इत्थं विचार्यमार्गौ द्वौ जगाद परमेश्वरः ॥ ८३ ॥
योगे कोऽतिशयस्तेऽत्र ज्ञानमुक्तं समं द्वयोः ।
रागद्वेषाद्यभावश्च तुल्यो योगिविवेकिनोः ॥ ८४ ॥
न प्रीतिर्विषयेष्वस्ति प्रेयानात्मेति जानतः ।
कुतो रागः कुतो द्वेषः प्रातिकूल्यमपश्यतः ॥ ८५ ॥
देहादेः प्रतिकूलेषु द्वेषस्तुल्योद्वयोरपि ।
द्वेषं कुर्वन्न योगी चेदविवेक्यपि तादृशः ॥ ८६ ॥
द्वैतस्य प्रतिभानं तु व्यवहारे द्वयोः समम् ।
समाधौ नेति चेत्तद्वन्नाद्वैतत्वविवेकिनः ॥ ८७ ॥

विवक्ष्यते तदस्माभिरद्वैतानन्दनामके ।
अध्याये हि तृतीयेतः सर्वमप्यतिमङ्गलम् ॥ ८८ ॥
सदा पश्यन्निजानन्दमपश्यन्नखिलं जगत् ।
अर्थाद्योगीति चेत्तर्हि सन्तुष्टो वर्धतां भवान् ॥ ८९ ॥

ब्रह्मानन्दाभिधे ग्रन्थे मन्दानुग्रहसिद्धये ।
द्वितीयेऽध्याय एतस्मिन्नात्मानन्दो विवेचितः ॥ ९० ॥
इति ब्रह्मानन्दे आत्मानन्दः समाप्तः ॥ १२ ॥

गुरु – जें योगाने होतें तेंच योगावाचूनही होतें असें आम्ही म्हणतो. शिष्य – तुमचा अभिप्राय, समजला नाही. गुरु – जें योगाने होते तेंच योगावाचूनही होतें. अरे ज्ञानसिद्धीकरितां जसा आम्ही मागील प्रकरणी योग सांगितला तसें विवेकापासूनही ज्ञान होतें असें आम्ही म्हणतो. ॥ ८१ ॥
याविषयी गीतेत प्रमाणही आहे. जें स्थान सांख्यानें मिळतें, तेंच योगानेही मिळतें. असें योगी आणि विवेकी या दोघांनाही ज्ञानद्वारा मोक्षरूपी फळ मिळतें. ॥ ८२ ॥
शिष्य – दोन्हीही मार्गांचे फल एकच असल्यानंतर शास्त्रानें दोन मार्ग कां सांगितले ? गुरु- कित्येकांना योग साध्य होतो, आणि कित्येकांस विवेक करणे सोपे वाटते. अशा अभिप्रायाने भगवंताने दोन मार्ग सांगितले.. ॥ ८३ ॥
शिष्य – तथापि मला योग आणि विवेक दोन्ही भिन्न आहेत असें वाटतें. गुरु – असें तुला कां वाटतें. दोघांना ज्ञान सारखेच हें तर तूं कबूल करतोस ना ? शिष्य – पण योग्याला रागद्वेष मुळींच नसतात. गुरु – ते विवेक्यालाही नसतात. ॥ ८४ ॥
अरे ज्याला आत्माच सर्वांमध्ये प्रिय झाला त्याची प्रीति विषयावर कशी जाईल ? विषय अप्रिय झाल्यावर मग अर्थातच त्याला कोणचीही गोष्ट प्रतिकूल नाहीं. मग राग-द्वेष तरी. कोठून येणार ? ॥ ८५ ॥
शि० -विवेक्याला देहादिकांस ज्या प्रतिकूल वस्तू असतात त्यांविषयीं द्वेष असतो. गु – तसा योग्यालाही असतो. शि० -तसा द्वेष करीत असतांना तो योगीच नव्हे. गु०- तशा वेळीं तो विवेकी नव्हे. ॥ ८६ ॥
शि० -पण तुमच्या विवेक्याला देहाचे भान असतें. गु० -भान असतें परंतु तें व्यवहारकालीं की विवेककाली ? शि० -व्यवहारकाली. गु० -तशा वेळीं योग्यालाही द्वैतभान आहे. शि० -पण समाधिमध्ये कुठे आहे ? गु०-त्याप्रमाणें विवेक्यालाही विवेकदशेत द्वैतदर्शन नाहीं. ॥ ८७ ॥
याचे प्रतिपादन पुढील प्रकरणी म्हणजे पुढील अद्वैतानंद नामक तिसऱ्या अध्यायांत आम्ही करूं. ॥ ८८ ॥

शि० – तुमच्या विवेक्याला जगाचे भान मुळींच नमून सर्वदा निजानंदच जर भासला तर तो योगीच म्हटला पाहिजे, विवेकी कसला ? गु० -तसें म्हणतो कोण ? आमच्या मते योगी आणि विवेकी एकच. ते तुझ्या समजुतीस पक्के यावें असें आमच्या मनांत होतें तसें झालें. आतां स्वस्थ ऐस. ॥ ८९ ॥
याप्रमाणे आम्ही ब्रह्मानंद प्रकरणाच्या या दुसऱ्या अध्यायी मंदबुद्धीच्या लोकांकरिता आत्मानंदाचें विवेचन करून हें प्रकरण आटपतो. ॥ ९० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *