सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १८१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

यत्र त्वस्य जगत्स्वात्मा पश्येत्कस्तत्र केन किम् ।
किं जिघ्रेत्किं वदेद्वेति श्रुतौ तु बहु घोषितम् ॥ १८१ ॥
याजवर असा एक पूर्वपक्ष आहे कीं, ” यत्रत्वस्य जगत् स्वात्मा” या श्रुतीचा अर्थ असा आहे की ज्या मोक्षावस्थेच्याठायीं सर्व जग आपण होतो, तेथें कोणी कोणतें रूप पहावें ? कोणी कोणता गंध हुंगावा ? कोणीं कोणचा शब्द बोलावा ? इत्यादिवरून ॥ १८१ ॥

तेन द्वैतमपन्हुत्य विद्योदेति न चान्यथा ।
तथा च विदुषो भोगः कथं स्यादिति चेत् शृणु ॥ १८२ ॥
ज्ञान उत्पन्न झालें म्हणजे द्वैताचा नाश होतो असें ठरतें. मग विद्वानाला भोग आहेत असें तुम्ही कसें म्हणतां ? तर याजवर उत्तर असें कीं, ॥ १८२ ॥

सुषुप्तिविषया मुक्तिविषया वा श्रुतिस्त्विति ।
उक्तं स्वाप्ययसंपत्योरिति सूत्रे ह्यतिस्फुटम् ॥ १८३ ॥
जी श्रुति सुषुप्तीला लागू आहे आणि मुक्तीलाही लागू आहे असा सूत्राचा स्पष्ट अभिप्राय आहे म्हणून येथे सुषुप्तिपरच समजावी. ॥ १८३ ॥

अन्यया याज्ञवल्क्यादेराचार्यत्वं न सम्भवेत् ।
द्वैतदृष्टावविद्वत्ता द्वैतादृष्टौ न वाग्वदेत् ॥ १८४ ॥
या कृतीचा अर्थ सुषुप्तीकडे जर न लावला तर आजपर्यंत जे याज्ञवल्क्यादिक मोठमोठे तत्त्वज्ञ होऊन गेले, त्यांना आचार्यत्व देतां आलें नसतें. कारण, त्यांना द्वैत दिसत होतें असे जर मानलें तर ते अज्ञानी ठरतात. आणि तें त्यांना दिसतच नव्हतें असें जर मानलें तर त्यांच्या तोंडांतून् शिष्यादिकांस पढविण्याकरितां शब्दच निघाले नसते. ॥ १८४ ॥

निर्विकल्पसमाधौ तु द्वैतादर्शनहेतुतः ।
सैवापरोक्षविद्येति चेत्सुषुप्तिस्तथा न किम् ॥ १८५ ॥
याजवर कोणी म्हणेल की, निर्विकल्प समाधीमध्ये द्वैताचे दर्शन मुळींच नाहीं म्हणून तिलाच अपरोक्ष विंद्या म्हणणें योग्य आहे. तर त्याजवर आमचें उत्तर असें कीं, समाधि जर अपरोक्ष विद्या झाली तर निद्रा ही अपरोक्ष विद्या असे कां न म्हणावें ? ॥ १८५ ॥

आत्मतत्त्वं न जानाति सुप्तौ यदि तदा त्वया ।
आत्मधीरेव विद्येति वाच्यं न द्वैतविस्मृतिः ॥ १८६ ॥
आतां तुझी म्हणाल कीं, निद्रेंत आत्मज्ञान नसते म्हणून ती अपरोक्ष विद्या नव्हे तर आत्मज्ञानालाच विद्या म्हणा, द्वैतविस्मुत्ति कशाला पाहिजे ? ॥ १८६ ॥

उभयं मिलितं विद्या यदि तर्हि घटादयः ।
अर्धविद्याभाजिनः स्युः सकलद्वैतविस्मृतेः ॥ १८७ ॥
द्वैतविस्मृति आणि आत्मज्ञान ही दोन्ही मिळून अपरोक्ष विद्या होते असे जर म्हणाल, तर घटादिक जड पदार्थास अर्धी विद्या आहे असें म्हटले पाहिजे. इतकेच नव्हे तर घटादिकांस ती अर्धी विद्या जितकी दृढ आहे तितकी योग्यांना देखील नाहीं. ॥ १८७ ॥

मशकध्वनिमुख्यानां विक्षेपाणां बहुत्वतः ।
तत्त्वविद्या तथा न स्याद्घटादीनां यथा दृढा ॥ १८८ ॥
कारण, त्यांची समाधि मशकध्वनिसारखीं थोडीशी विघ्नें आलीं कीं विघडते. तसा घटादिकांचा नाहीं. ॥ १८८ ॥

आत्मधीरेव विद्येति यदि तर्हि सुखी भव ।
दुष्टचित्तं निरुन्ध्याचेन्निरुन्धि त्वं यथासुखम् ॥ १८९ ॥
तेव्हा आत्मज्ञान हीच अपरोक्ष विद्या आहे. तिला द्वैंतविस्मृतीची गरज नाहीं, असें कबूल करणे भागच आहे. दुसरा मार्ग नाही. आतां चित्तनिरोध केल्यावांचून ज्ञान होतच नाहीं असें असेल तर तो खुशाल करावा ॥ १८९ ॥

तदिष्टमेष्टव्यमायामयत्वस्य समीक्षणात् ।
इच्छन्नप्यज्ञवन्नेच्छेत्किमिच्छन्निति हि श्रुतम् ॥ १९० ॥
तो आम्हास इष्टच आहे. कारण ज्यापासून जगाचे मिथ्यात्वज्ञान चांगलें होतें तें आम्हास आवश्य आहे. याकरितां ‘किमिच्छन्’ या श्रुतीचा अर्थ इतकाच कीं, ज्ञान्याची इच्छा अज्ञान्याच्या इच्छेप्रमाणे प्रबल नसते. ॥ १९० ॥

रागो लिङ्गमबोधस्य सन्तु रागादयो बुधे ।
इति शास्त्रद्वयं सार्थमेवं सत्यविरोधतः ॥ १९१ ॥
शास्त्रांत एके ठिकाणीं असें म्हटलें आहे की, विषयेच्छा असणे हे अज्ञान्याचे लक्षण. आणि दुसरीकडे असें म्हटलें आहे कीं, ज्ञान्याच्याठायी त्या असल्या तरी चिंता नाहीं. ह्या दोन विरुद्ध वाक्यांची व्यवस्था कशी करावी असा कोणी प्रश्न करील तर पहिल्या पक्षी दृढ इच्छा आणि दुसर्‍या वाक्यांत इच्छाभास असा अर्थ केला असतां दोहोंची एकवाक्यता होते. ॥ १९१ ॥

जगन्मिथ्यात्ववत् स्वात्मासङ्गत्वस्य समीक्षणात् ।
कस्य कामायेति वचो भोक्त्रभावविवक्षया ॥ १९२ ॥
जसे जगन्मिध्यात्वज्ञानाने इच्छिण्याचे विषयच नाहींसे झाले असा “किमिच्छन्” पदाचा भाव काढला, त्याप्रमाणें आत्मा असंग आहे म्हणून भोक्ता कोणीच नाहीं. हाच अभिप्राय “कस्य कामाय”क या पदाचा आहे. ॥ १९२ ॥

पतिजायादिकं सर्वं तत्तद्‌भोगाय नेच्छति ।
किन्त्वात्मभोगार्थमिति श्रुतावुद्घोषितं बहु ॥ १९३ ॥
पतिजायादि सर्व विषय आपल्या भोगाकरितां मनुष्य इच्छितो. त्या विषयाकरितां इच्छित नाहीं. असें श्रुतींत पुष्कळ सांगितले आहे. ॥ १९३ ॥

किं कूटस्थश्चिदाभासोऽथ वा किमुभयात्मकः ।
भोक्ता तत्र न कूटस्थोऽसङ्गत्वाद्‌भोक्तृतां व्रजेत् ॥ १९४ ॥
आतां हा भोक्ता कोण आहे याचा विचार करूं. हा भोक्ता कूटस्थ, चिदाभास, किंवा दोन्ही मिळून ? ह्यांपैकी एक असला पाहिजे. आतां कूटस्थ जर भोक्ता म्हणावा, तर तो असंग असल्यामुळें त्यास भोक्तृत्व संभवत नाहीं. ॥ १९४ ॥

सुखदुःखाभिमानाख्यो विकारो भोग उच्यते ।
कूटस्थस्य विकारी चेत्येतन्न व्याहतं कथम् ॥ १९५ ॥
कारण सुख-दुःखाचा अभिमानरूप जो विकार होतो. तोच भोग, आणि कूटस्थ तर अविकारी आहे, मग त्यास भोक्तृत्व कसें येईल ॥ १९५ ॥

विकारिबुद्ध्यधीनत्वादाभासे विकृतावपि ।
निरधिष्ठानविभ्रान्तिः केवला न हि तिष्ठति ॥ १९६ ॥
चिदाभास हा विकार पावणार्‍या बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होतो. म्हणून तोही भ्रांतिरूप विकारी आहे. आता त्यास जर भोक्तृत्व लावावे तर, अधिष्टानावांचून केवळ भ्रांति मुळीच संभवत नाहीं. म्हणून केवळ चिदाभासही भोक्ता म्हणतां येत नाही. ॥ १९६ ॥

उभयात्मक एवातो लोके भोक्ता निगद्यते ।
तादृगात्मानमारभ्य कूटस्थः शेषितः श्रुतौ ॥ १९७ ॥
याकरितां या दोन्हीलाही भोक्तृत्व न लावतां त्या उभयतांच्या सांगडीस लावावे हें बरे. आणि लोकांत भोक्ता भोक्ता जो म्हणतात तो हाच. तशा भोक्त्या आत्म्याचा उपक्रम करून श्रुतीत कूटस्थास शेवटीं सत्यत्व दिलें आहे. ॥ १९७ ॥

आत्मा कतम इत्युक्ते याज्ञवल्क्यो विबोधयन् ।
विज्ञानमयमारभ्यासङ्गं तं पर्यशेषयत् ॥ १९९ ॥
श्रुतीमध्ये याज्ञवल्क्यास आत्मा कोण असा जनक राजानें प्रश्न केला असतां त्यानें विज्ञानमय कोशापासून उपक्रम करून शेवटीं असंग कूटस्थच आत्मा आहे असें सांगितले. ॥ १९८ ॥

कोऽयमात्मेत्येवमादौ सर्वत्रात्मविचारतः ।
उभयात्मकमारभ्य कूटस्थः शेष्यते श्रुतौ ॥ १९९ ॥
“कोऽयमात्मा” इत्यादिक श्रुतीमध्ये आत्म्याचा विचार केला आहे. तेथें उभयात्मक भोक्ता धरूनच शेवटीं कूटस्थाची सिद्धि केली आहे. ॥ १९९ ॥

कूटस्थसत्यतां स्वस्मिन्नध्यस्यात्माऽविवेकतः ।
तात्विकीं भोक्तृतां मत्वा न कदाचिज्जिहासति ॥ २०० ॥
याप्रमाणें भोक्तेपणा मिथ्या असून तें सत्य असें कां वाटतें याचें कारण हेंच कीं, हा उभयात्मक भोक्ता कूटस्थाचे सत्यत्व आपणावर घेऊन आपला भोक्तेपणा खरा आहे. असें मानून त्याला तो सोडूं इच्छित नाहीं. ॥ २०० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *