सार्थ पंचदशी मराठी त्रयोदशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे अद्वैतानन्दः श्लोक ६१ ते ८०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

एकमृत्पिण्डविज्ञानात्सर्वमृण्मयधीर्यथा ।
तथैकब्रह्मबोधेन जगद्बुद्धिर्विभाव्यताम् ॥ ६१ ॥
सच्चित्सुखात्मकं ब्रह्म नामरूपात्मकं जगत् ।
तापनीये श्रुतं ब्रह्म सच्चिदानन्दलक्षणम् ॥ ६२ ॥

सद्‌रूपमारुणिः प्राह प्रज्ञानं ब्रह्म बह्वृचाः ।
सनत्कुमार आनन्दमेवमन्यत्र गम्यताम् ॥ ६३ ॥
विचिन्त्य सर्वरूपाणि कृत्वा नामानि तिष्ठति ।
अहं व्याकरवाणीमे नामरूपे इति श्रुतिः ॥ ६४ ॥
अव्याकृतं पुरा सृष्टेरूर्ध्वं व्याक्रीयते द्विधा ।
अचिन्त्यशक्तिर्मायैषा ब्रह्मण्यव्याकृताभिधा ॥ ६५ ॥
अविक्रियब्रह्मनिष्ठा विकारं यात्यनेकधा ।
मायां तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम् ॥ ६६ ॥
आद्यो विकार आकाशः सोऽस्ति भात्यपि च प्रियः ।
अवकाशस्तस्य रूपं तन्मिथ्या न तु तत्त्रयम् ॥ ६७ ॥
न व्यक्तेः पूर्वमस्त्येव न पश्चाच्च विनाशतः ।
आदावन्ते च यन्नास्ति वर्तमानेऽपि तत्तथा ॥ ६८ ॥
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येवेत्याह कृष्णोऽर्जुनं प्रति ॥ ६९ ॥
मृद्वत्ते सच्चिदानन्दा अनुगच्छन्ति सर्वदा ।
निराकाशे सदादीनामनुभूतिर्निजात्मनि ॥ ७० ॥

ज्याप्रमाणें मातीच्या पिंडाचे ज्ञान झाल्यावांचून कोणच्याही मृण्मय पदार्थीचे ज्ञान होत नाही, त्याप्रमाणें ब्रह्म पाहिल्यावांचून जग दिसतच नाहीं. ॥ ६१ ॥
शि० -ब्रह्मज्ञानापासून जगाचे ज्ञान होतें असा सिद्धांत करण्यापूर्वीं ब्रह्माचे व जगाचे स्वरूप समजलें पाहिजे. त्यावाचून तसा सिद्धांत कसा करतां येईल ? गु० -त्याचें स्वरूप तापनीय श्रुतींत वर्णिले आहे. ब्रह्म हें सच्चिदानंदरूप आहे आणि जगत् नामरूपात्मक आहे. ॥ ६२ ॥
आरुणीनें तद्‌रूचे वर्णन केले. बह्वृच यांनी प्रज्ञानं ब्रह्म या वाक्याने चिद्‌रूपाचे वर्णन केलें आहे आणि सनत्कुमारांनी आनंदरूपाचें वर्णन केलें, असेंच अन्य ठिकाणी पहावे. ॥ ६३ ॥
तसेंच जगाचें नामरूपस्वरूपही श्रुतीत वर्णिले आहे. “सर्व रूपाचे चिंतन करून त्यांस नावें ठेवून ईश्वर जगांत रहातो.” अशा अर्थाची व “नामरूपें मींच केली आहेत ” अशा अर्थाची श्रुतिआहे. ॥ ६४ ॥
सृष्टीचे पूर्वी जें अव्याकृत म्हणजे अव्यक्तरूप होतें तेंच सृष्टीनंतर दोन प्रकारांनीं व्यक्त झालें. ही जी अव्याकृत नांवाची अचिंत्य ब्रह्मशक्ति, तीच माया. ॥ ६५ ॥
क्रियारहित ने ब्रह्म त्याचेठायी असणारी शक्ति जी अनेक प्रकारें विकार पावते, त्या शक्तीस माया म्हणतात. तीच मूळ प्रकृति आणि ती ज्याच्या हातीं आहे तो महेश्वर. ॥ ६६ ॥
या मायोपाधिक ब्रह्माचा पहिला विकार आकाश आहे. तो अस्ति, भाति आणि प्रिय असा आहे. अवकाश हे त्याचें रूप आहे. तें मिथ्या आहे; पण पूर्वीची तीन रूपें सत्य आहेत. ॥ ६७ ॥
शि० -अवकाशरूपाला मिथ्यात्व कसें येतें ? गु० -अवकाश व्यक्त होण्यापूर्वी तो नव्हता, व पुढेही नाहीसा होतो. ज्यास शेंडाबुडखा नसून मध्येंच कांहींभासतें तेंही तसेच मिथ्या समनले पाहिजे. ॥ ६८ ॥
यास गीतावाक्य प्रमाण. कृष्णाने अर्जुनास असें सांगितलें आहे कीं, ही भूते जी दिसत आहेत तीं पूर्वींच अव्यक्त होतीं. शेवटीही अव्यक्तच होतात. तीं केवळ मध्यें मात्र व्यक्त आहेत ॥ ६९ ॥
शि० -अवकाशांत सच्चिदानंद खरे आहेत असें तुम्ही म्हणता याला प्रमाण काय ? गु० -घटामध्ये मृत्तिका जशी कालत्रयी असते तसें आकाशामध्यें सच्चिदानंदरूप एकसारखे आहे. ॥ ७० ॥

अवकाशे विस्मृतेऽथ तत्र किं भाति ते वद ।
शून्यमेवेति चेदस्तु नाम तादृग्विभाति हि ॥ ७१ ॥
तादृक्त्वादेव तत्सत्त्वमौदासीन्येन तत्सुखम् ।
आनुकूल्यप्रातिकूल्यहीनं यत्तन्निजं सुखम् ॥ ७२ ॥

आनुकूल्ये हर्षधीः स्यात्प्रातिकूल्ये तु दुःखधीः ।
द्वयाभावे निजानन्दो निजं दुःखं तु न क्वचित् ॥ ७३ ॥
निजानन्दे स्थिते हर्षशोकयोर्व्यत्ययः क्षणात् ।
मनसः क्षणिकत्वेन तयोर्मानसतेष्यताम् ॥ ७४ ॥
आकाशेऽप्येवमानन्दः सत्ताभाने तु संमते ।
वाय्वादिदेहपर्यन्तवस्तुष्वेवं विभाव्यताम् ॥ ७५ ॥
गतिस्पर्शौ वायुरूपं वह्नेर्दाहप्रकाशने ।
जलस्य द्रवता भूमेः काठिन्यं चेति निर्णयः ॥ ७६ ॥
असाधारण आकाशे ओषध्यन्न वपुःष्यपि ।
एवं विभाव्य मनसा तत्तद्‌रूपं यथोचितम् ॥ ७७ ॥
अनेकधा विभिन्नेषु नामरूपेषु चेकधा ।
तिष्ठन्ति सच्चिदानन्दा विसंवादः न कस्यचित् ॥ ७८ ॥
निस्तत्त्वे नामरूपे द्वे जन्मनाशयुते च ते ।
बुद्ध्या ब्रह्मणि वीक्षस्व समुद्रे बुद्बुदादिवत् ॥ ७९ ॥
सच्चिदानन्दरूपेऽस्मिन् पूर्णे ब्रह्मणि वीक्षिते ।
स्वयमेवावजानाति नामरूपे शनैः शनैः ॥ ८० ॥

शि० -आकाश वेगळे करून तें सच्चिदानंदरूप पहावे कोठे ? गु० -निराकाश जें तुझें स्वरूप ते पहा म्हणजे झाले. कारण आकाशाचेंही विस्मरण झालें असता काय भासते तें तूंच सांग. शि० -शून्य भासते. गु० -ते तरी भासतें ना ? जर भासते तर तें शून्य कसें ? ॥ ७१ ॥
ज्या अर्थीं भासते त्या अर्थीं तें आहें म्हटले पाहिजे. आणि ते तत्त्व उदासीन असल्यामुळें तें सुखरूप आहे असें सिद्ध होतें. शि० -सुखाला अनुकूलत्व पाहिजे आणि ते तर उदासीन आहे म्हणता, तेव्हा सुख कसें म्हणता येईल ? गु० -ते सुखच आहे. कारण खऱ्या सुखाचे लक्षण असें आहे कीं, जेथे आनुकूल्यही नाहीं आणि प्रातिकूल्यही नाही तें खरें सुख. ॥ ७२ ॥
अनुकूल गोष्ट झाली म्हणजे सुखरूप बुद्धि होते, आणि प्रतिकूल झाली म्हणजे दुःखरूप बुद्धि होते. ही दोन्हीही नसतांना जी स्थिति तोच निजानंद. शि० -तर मग त्या स्थितीला निजदुःख कां म्हणूं नये; गु० -दुःखाला निजरूपत्व आले असें आम्ही कोठेच ऐकले नाही. ॥ ७३
शि० – निजानंद एकसारखा आहे असें जर तुम्ही म्हणतां तर एकदा हर्ष, आणि एकदा शोक कां होतो १ गु० -हर्ष व शोक मनाचे आहेत आणि मन तर क्षणिक आहे; म्हणून हर्षशोकांनाही क्षणिकत्व आले. ॥ ७४ ॥
याकरितां आकाशाचेठायी आनंद आहे असें सिद्ध झालें. सत्ता आणि भान ही तर तूं कबूलच करितोस. याचप्रमाणे वायूपासून देहापर्यंत सर्व वस्तूंमध्यें आनंदाची व्याप्ति सिद्ध होते. ॥ ७५ ॥
वायूची रूपे दोन गति आणि स्पर्श. दाह आणि प्रकाश हे अग्नीचे रूप. जलाचे द्रवत्व आणि भूमीचे काठिन्य ॥ ७६ ॥

याचप्रमाणें सर्व आकार वनस्पति शरीरें यांची रूपे मनाने पृथक् पृथक् समजावयाची. ॥ ७७ ॥

याचप्रमाणे नामरूपे एकमेकांपासून जरी भिन्न झाली तरी त्यांत सच्चिदानंद रूप एकच आहे यात संशय नाहीं.॥ ७८॥

शि० -तर मग नामरूपे जी भासतात त्यांची व्यवस्था कशी ? गु० -भासेनात बापुडी. त्यांस जन्मनाश असल्यामुळें तीं मिथ्या आहेत असे आम्ही पूर्वीच सांगितलें आहे. समुद्रावर जसे बुडबुडे दिसतास, तशी ब्रह्माचेठायी तीं समजावी. ॥ ७९ ॥
सच्चिदानंदरूप पूर्ण ब्रह्म न्याहाळून पाहिले असतां नामरूपाची अवज्ञा आपोआप हळूहळू होते. ॥ ८० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *