सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ४२६ ते ४३३ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

426-17
ऐसिया समयीं कर्कशें । भोगीजत स्वानंदराज्य कैसें । आजि भाग्योदयो हा नसे । आनी ठाईं ॥ 426 ॥
अहो, अशा घोर प्रसगी हा स्वानंदसाम्राज्य कसें भोगीत आहे पहा! आज ह्याच्यासारखा भाग्याचा पुतळा दुसरा कोणीही दिसत नाही ! 26
427-17
संजयो म्हणे कौरवराया । गुणा रिझों ये रिपूचिया । आणि गुरुही हा आमुचिया । सुखाचा येथ ॥ 427 ॥
संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, शत्रुपक्षाचा खरा, पण ह्या अर्जुनाच्या गुणाचे कौतुक वाटते, इतकेच नव्हे तर हा आम्हासही सुख देणारा गुरूच जणु भेटला आहे. 27
428-17
हा न पुसता हे गोठी । तरी देवो कां सोडिते गांठी । तरी कैसेंनि आम्हां भेटी । परमार्थेंसीं ॥ 428 ॥
ह्याने देवांना ह्या गोष्टी विचारल्या नसत्या तर देवांना हें रहस्य सांगण्याचे काय कारण पडलें होतें? व मग आमच्यासारख्यांना तरी परमार्थाच्या भेटीचा योग कसा येता? 28
429-17
होतों अज्ञानाच्या आंधारां । वोसंतीत जन्मवाहरा । तों आत्मप्रकाशमंदिरा-/। आंतु आणिलें ॥ 429 ॥
अज्ञानांधकारांत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात होतो, त्या मला ह्याने आत्मप्रकाशमंदिरामध्ये आणून सोडले. 29
430-17
एवढा आम्हां तुम्हां थोरु । केला येणें उपकारु । म्हणौनि हा व्याससहोदरु । गुरुत्वें होय ॥ 430 ॥
तुमच्या आमच्यावर इतका मोठा उपकार अर्जुनाने केला आहे, म्हणून हा जणु श्रीव्यासांचा सहोदरच (बंधु) गुरुरूपाने अवतरलासा वाटतो. 430

431-17
तेवींचि संजयो म्हणे चित्तीं । हा अतिशयो या नृपती । खुपेल म्हणौनि किती । बोलत असों ॥ 431 ॥
त्याचप्रमाणे संजयाला मनांत असेही वाटलें कीं, राजाला ही अर्जुनाची स्तुति खूपेल म्हणून किती बोलावी? आतां पुरे. 31
432-17
ऐसी हे बोली सांडिली । मग येरीचि गोठी आदरिली । जे पार्थें कां पुसिली । श्रीकृष्णातें ॥ 432 ॥
म्हणून हा स्तुतिवाद सोडून, पार्थाने देवांना विचारलेल्या अन्य प्रश्नाकडे संजय वळला.32
433-17
याचें जैसें कां करणें । तैसें मीही करीन बोलणें । ऐकिजो ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥ 433 ॥
श्रीनिवृत्तिदास ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, अर्जुनाच्या गोड प्रश्नाचे मीही गोड व्याख्यान करितों. श्रवण करावें. 433
॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां श्रद्धात्रयविभागयोग योगोनाम सप्तदशोऽध्यायः॥17॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :-28 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 433 ॥

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *