सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

251-17
एऱ्हवीं तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी । तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे? ॥ 251 ॥
अभ्रांनी एकदम आकाश व्यापून फार गडगडाट उडवून दिला तरी असा अकालीं येणारा मेष काय फार काळ टिकतो? 51
252-17
तैसें राजस तप जें होये । तें फळीं कीर वांझ जाये । परी आचरणींही नोहे । निर्वाहतें गा ॥ 252 ॥
त्याप्रमाणे हे राजस तप त्याला फल तर येत नाहीच, पण, ते अखेरपर्यंत पुरे होण्याचीच मारामार असते. 52
253-17
आतां तेंचि तप पुढती । तामसाचिये रीती । पैं परत्रा आणि कीर्ती । मुकोनि कीजे ॥ 253 ॥
आतां याच्यापुढे वर्णिले जाणारे जे तामस तप त्याला स्वर्गफल तर नाहीच, पण राजसा सारखी कीर्ती मिळण्याचाही संभव नाहीं. 53
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥17. 19॥

254-17
केवळ मूर्खपणाचा वारा । जीवीं घेऊनि धनुर्धरा । नाम ठेविजे शरीरा । वैरियाचें ॥ 254 ॥
अर्जुना, केवळ मूर्खपणाच्या भरी भरून शरीर हा जणू आपला वैरी आहे अशा जीवाची समजूत करून घेतो. 54
255-17
पंचाग्नीची दडगी । खोलवीजती शरीरालागीं । का इंधन कीजे हें आगी । आंतु लावी ॥ 255 ॥
तें शरीर म्हणजे जसें कांहीं काष्ठ आहे असे मानून त्याला सर्व बाजूनीं पंचाग्नीची धग लावतो. 55

256-17
माथां जाळिजती गुगुळु । पाठीं घालिजती गळु । आंग जाळिती इंगळु । जळतभीतां ॥ 256 ॥
माथ्यावर गुगुळ जाळतात, पाठीला गळ टोचतात व भोवताली अग्नि पेटवून मध्ये आपले शरीर जाळतात. 56
257-17
दवडोनि श्वासोच्छ्वास । कीजती वायांचि उपवास । कां घेपती धूमाचें घांस । अधोमुखें ॥ 257 ॥
श्वासोछवास बंद करून व्यर्थ उपवास करितात अथवा उलटे टांगून घेऊन धूम्रपान करतात 57
258-17
हिमोदकें आकंठें । खडकें सेविजती तटें । जितया मांसाचे चिमुटे । तोडिती जेथ ॥ 258 ॥
थंडीत गळयाइतक्या थंडगार पाण्यांत उभे राहतात,तटावरील कातळावर बसतात व जिवंत मांस चिमट्यानें तोडतात ! 58
259-17
ऐसी नानापरी हे काया । घाय सूतां पैं धनंजया । तप कीजे नाशावया । पुढिलातें ॥ 259 ॥
असे नानाप्रकारचे क्लेश शरीराल देऊन दुसऱ्याचा घात व्हावा हा हेतु बाळगून तप करितात. 59
260-17
आंगभारें सुटला धोंडा । आपण फुटोनि होय खंडखंडा । कां आड जालियातें रगडा । करी जैसा ॥ 260 ॥
भारानेच स्वतःच्या कडयाचा सुटणारा धोंडा खलीं पडून स्वतःचे शतशः तुकडे तर करून घेतोच, पण पडतांना मध्ये येणाऱ्या वस्तूही रगडून जसा चूर करितो ! 260

261-17
तेवीं आपलिया आटणिया । सुखें असतया प्राणिया । जिणावया शिराणिया । कीजती गा ॥ 261 ॥
त्याप्रमाणे स्वतःचा नाश करून घेऊन जे सुखी अथवा श्रेष्ठ प्राणी असतील त्यांना खालीं ओढण्याची उत्कट इच्छा बाळगतात. 61
262-17
किंबहुना हे वोखटी । घेऊनि क्लेशाची हातवटी । तप निफजे तें किरीटी । तामस होय ॥ 262 ॥
अर्जुना, ह्याप्रमाणे व्यर्थ व दुष्ट तपाचरण ज केले जाते हे तामस तप होय. 62
263-17
एवं सत्त्वादिकांच्या आंगीं । पाडिलें तप तिहीं भागीं । जालें तेंही तुज चांगी । दाविलें व्यक्ती ॥ 263 ॥
एवं, सत्वादिक तीन जातींचें जें तप तें तुला । स्पष्टपणे सांगितले. 63
264-17
आतां बोलतां प्रसंगा । आलें म्हणौनि पैं गा । करूं रूप दानलिंगा । त्रिविधा तया ॥ 264 ॥
आत – ओघानेच आलें म्हणून त्रिविध दानाचे लक्षण सांगू. 64
265-17
येथ गुणाचेनि बोलें । दानही त्रिविध असे जालें । तेंचि आइक पहिलें । सात्त्विक ऐसें ॥ 265 ॥
तीन गुणांच्या योगे ह्या दानाचेही तीन प्रकार होतात त्यांतील सात्विक प्रकार प्रथम श्रवण कर. 65
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ॥
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥17. 20॥

266-17
तरी स्वधर्मा आंतौतें । जें जें मिळे आपणयातें । तें तें दीजे बहुतें । सन्मानयोगें ॥ 266 ॥
तर स्वधर्माचरणाने आपल्याला जें धन मिळेल तें जो सम्मान पूर्वक दुसऱ्याला अर्पण करतो. 66
267-17
जालया सुबीजप्रसंगु । पडे क्षेत्रवाफेचा पांगु । तैसाचि दानाचा हा लागु । देखतसें ॥ 267 ॥
दैवयोगाने उत्तम व बियाणे मिळाले तरी जसे उत्तम क्षेत्र (शेत ) व वाफसा ह्यांची उणीव भासते, तशाच अडचणी दानांतही आहेत असे दिसून येते. 67
268-17
अनर्घ्य रत्न हातां चढे । तैं भांगाराची वोढी पडे । दोनी जालीं तरी न जोडे । लेतें आंग ॥ 268 ॥
अमूल्य रत्न प्राप्त झाले तरी सोन्याची गरज असते ( कोंदण वगैरेसाठीं ) व सोनेही प्राप्त झाले तरी तो रत्नालंकार शोभावा असे सुंदर शरीर मिळणे कठीण. 68
269-17
परी सण सुहृद संपत्ती । हे तिन्ही येकीं मिळती । जे भाग्य धरी उन्नती । आपुल्याविषयीं ॥ 269 ॥
परंतु आपल्या भाग्याचा उत्कर्ष असतो तेव्हांच सणासारखा दिवस, जीवाचे आप्तेष्ट व द्रव्यानुकूलता असा एकत्र योग येतो. 69
270-17
तैसें निफजावया दान । जैं सत्त्वासि ये संवाहन । तैं देश काळ भाजन । द्रव्यही मिळे ॥ 270 ॥
त्याप्रमाणे हातून सात्विक दान घडण्याचा योग असेल तेव्हांच योग्य देश, काल व सत्पात्र व द्रव्यानुकूलता ह्यांची जोड लाभते. 270

271-17
तरी आधीं तंव प्रयत्नेंसीं । होआवें कुरुक्षेत्र का काशी । नातरी तुके जो इहींसीं । तो देशुही हो ॥ 271 ॥
म्हणून दानार्थ प्रथम प्रयत्ने करून, कुरुक्षेत्र किंवा काशी अथवा ह्यांच्या तोडीचे एखादें क्षेत्र असा देश पहावा. 71
272-17
तेथ रविचंद्रराहुमेळु । होतां पाहे पुण्यकाळु । का तयासारिखा निर्मळु । आनुही जाला ॥ 272 ॥
तेथे सूर्यग्रहण वा चंद्रग्रहणासारखा पुण्यकाल अथवा तत्सम दुसरा पुण्यकाल असावा, 72
273-17
तैशा काळीं तिये देशीं । होआवी पात्र संपत्ती ऐसी । मूर्ति आहे धरिली जैसी । शुचित्वेंचि कां ॥ 273 ॥
तशा मुहूर्तावर या देशात असे सत्पात्र मिळावें कीं, जो शुचित्वाचा मूर्तीमंत अवतार होय. 73
274-17
आचाराचें मूळपीळ । वेदांची उतारपेठ । तैसें द्विजरत्न चोखट । पावोनियां ॥ 274 ॥
तो ब्राह्मण म्हणजे आचाराचे आद्यस्थान, वेदाचे वसतिस्थान,शुद्ध विद्वद्रत्न असा असावा. 74
275-17
मग तयाच्या ठाईं वित्ता । निवर्तवावी स्वसत्ता । परी प्रियापुढें कांता । रिगे जैसी ॥ 275 ॥
मग त्याला आपले द्रव्य अर्पण करून त्यावरील आपली सत्ता निवृत्त करावी; पण तीही, पतीपुढे कांता जशी लीन असते तशा लीनतेने व संतोषावै करावी. 75

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *