सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक ६१ ते १००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

वालाग्रशतभागस्य शतधा कल्पितस्य च ।
भागो जीवः स विज्ञेय इति चाहपरा श्रुतिः ॥ ८१ ॥
दुसरी श्रुति असें सांगते कीं, बालाग्राच्या शंभराव्या हिश्शाच्या शंभराव्या हिश्शाएवढा जीव आहे असें समजावे. ॥ ८१ ॥

दिगम्बरा मध्यमत्वमाहुरापादमस्तकम् ।
चैतन्यव्याप्तिसंदृष्टेरानखाग्रश्रुतेरपि ॥ ८२ ॥
दिगंबरवादी आत्मा मध्यम असें म्हणतात. कारण चैतन्याची व्याप्ति आपादमस्तकपर्यंत आहे, व “आनखाग्रं प्रविष्टः” असें श्रुतिप्रमाणही आहे. ॥ ८२ ॥

सूक्ष्मनाडी प्रचारस्तु सूक्ष्मैरवयवैर्भवेत् ।
स्थूलदेहस्य हस्ताभ्यां कञ्चुकप्रतिमोकवत् ॥ ८३ ॥
वरील श्रुतिसिद्ध जो नाडीप्रचार तो येथें लागू पडत नाहीं असें समजू नये. जसा देहाचा अंगरख्यांत प्रवेश हस्तद्वारा होतो, त्याप्रमाणें येथेही सूक्ष्म अवयवाने आत्म्याचा प्रवेश कां म्हणूं नये ॥ ८३ ॥

न्यूनाधिकशरीरेषु प्रवेशोऽपि गमाअगमैः ।
आत्मांशानां भवेत्तेन मध्यमत्वं सुनिश्चितम् ॥ ८४ ॥
लहान मोठ्या देहांत याचा प्रवेश होणार नाहीं असें समजू नये. कारण, आत्म्याचे अंशही त्या त्या देहाप्रमाणें कमी जास्त होतात. तेव्हां तसें होण्यास कांहीं चिंता नाहीं. ॥ ८४ ॥

संशस्य घटवन्नाशो भवत्येव तथा सति ।
कृतनाशाकृताभ्यागमयोः को वारको भवेत् ॥ ८५ ॥
परंतु ज्याला अंश आहेत त्याचा नाश झालाच पाहिजे. म्हणून आत्मा सांश मानल्यास घटासारखा तोही नाशवंत होईल. आत्मा अनित्य झाल्यास कृतप्रणाश आणि अकृताभ्यागम हे दोष कसे निवारता येतील ? ॥ ८५ ॥

तस्मादात्मा महानेव नैवाणुर्नापि मध्यमः ।
आकाशवत्सर्वगतो निरंशः श्रुतिसंमतः ॥ ८६ ॥
म्हणून ज्या अर्थां आत्मा अणुही म्हणतां येत नाहीं आणि मध्यमही म्हणता येत नाहीं, त्या अर्थांं तो आकाशाप्रमाणें व्यापकच असला पाहिजे. त्याचें निरंशत्व तर श्रुतिसिद्धच आहे. ॥ ८६ ॥

इत्युक्त्वा तद्विशेषेऽपि बहुधा कलहं ययुः ।
अचिद्रूपोऽथ चिद्रूपाश्चिदचिद्रूप इत्यपि ॥ ८७ ॥
अशीं आत्म्याच्या पीरमाणाविषयी निरनिराळी मतें सांगून शेवटीं आत्म्याचे विभुत्व ठरविलें. आतां त्याच्या विशेष स्वरूपाविषयी निरनिराळ्या वाद्यांचे मत सांगतो. कोणी आत्मा चैतन्यरूप असें म्हणतात; कोणी जड असें म्हणतात; आणि कित्येक तो चिज्जड असें म्हणतात. ॥ ८७ ॥

प्राभाकरास्तार्किकाश्च प्राहुरस्याचिदात्मताम् ।
आकाशवद्द्रव्यमात्मा शब्दवत्तद्गुणश्चितिः ॥ ८८ ॥
प्रभाकरमताचे लोक आणि तार्किक लोक आत्मा जड असें म्हणतात. आकाश द्रव्य असून त्याचा गुण जसा शब्द त्याप्रमाणें आत्मा द्रव्य असून चैतन्य हा त्याचा गुण आहे. ॥ ८८ ॥

इच्छाद्वेषप्रयत्नाश्च धर्माधर्मौ सुखासुखे ।
तत्संस्काराश्च तस्यैते गुणाश्चितिवदीरिताः ॥ ८९ ॥
इच्छा, द्वेष, प्रयत्‍न, धर्म, अधर्म, सुख, दुःख आणि त्यांचे संस्कार हे चैतन्याप्रमाणें आत्म्याचेच गुण आहेत असें ते सांगतात. ॥ ८९ ॥

आत्मनो मनसा योगे स्वादृष्टवशतो गुणाः ।
जायन्तेऽथ प्रलीयन्ते सुषुप्तेऽदृष्टसंक्षयात् ॥ ९० ॥
आत्म्याचा आणि मनाचा संयोग झाला असतां आपल्या अदृष्ट कर्माच्या योगाने वरील गुण उत्पन्न होतात; आणि अदृष्टाचा क्षय झाला असतां सुषुप्तींत लीन होतात. ॥ ९० ॥

चितिमत्त्वाच्चेतनोऽयमिच्छाद्वेषप्रयत्नवान् ।
स्याद्धर्माधर्मयोः कर्ता भोक्ता दुःखादिमत्त्वतः ॥ ९१ ॥
असें असून तो सचेतन कसा भासतो या शंकेचे ते असें समाधान करतात कीं, तो स्वतः जड आहे तरी चैतन्यगुण त्याचे अंगीं आहे, आणि इच्छा, द्वेष, प्रयत्‍न हेही पण गुण त्याचे अंगीं आहेत, म्हणून तो चैतन्यरूप भासतो. तो धर्माधर्माचा कर्ता आणि सुखदुःखाचा भोक्ता आहे. ॥ ९१ ॥

यथाअत्र कर्मवशतः कादादिकं मुखादिकम् ।
तथा लोकान्तरे देहे कर्मणेच्छादि जन्यते ॥ ९२ ॥
ज्याप्रमाणें कर्मवशेंकरून या देहाचेठायी केव्हां केव्हां प्राप्त होणारी जी सुखदुःखे त्यांच्या भोगाकरितां आत्मा रहातो असें म्हणतात, त्याप्रमाणें अन्यलोकीही कर्मवशें देहधारण करण्याची इच्छा वगैरे होते. असा आत्म्याविषयी औपचारिक व्यवहार आहे. ॥ ९२ ॥

एवं च सर्वगस्यापि सम्भवेतां गमागमौ ।
कर्मकाण्डः समग्रोऽत्र प्रमाणमिति तेऽवदन् ॥ ९३ ॥
या दृष्टीने सर्वव्यापी जो आत्मा त्याला जाणें येणे संभवते, एतद्विषयीं सर्व कर्मकांड प्रमाण आहे असें ते म्हणतात. ॥ ९३ ॥

आनन्दमयकोषो यः सुषुप्तौ परिशिष्यते ।
अस्पष्टचित्स आत्मैषां पूर्वकोशोऽस्य ते गुणाः ॥ ९४ ॥
आनंदमयकोश जो, सुष्प्तिकाळी रहातो त्यांत चैतन्य स्पष्ट नाहीं तोच आमचा आत्मा. तो पंचकोशात पहिला आहे. आणि पूर्वोक्त जे ज्ञानादिक ते त्याचे गुण आहेत. ॥ ९४ ॥

गूढं चैतन्यमुत्प्रेक्ष्य बोधाबोधस्वरूपताम् ।
आत्मनो ब्रुवते भाट्टाश्चिदुत्प्रेक्ष्योत्थितस्मृतेः ॥ ९५ ॥
आत्म्याचेठायी अस्पष्ट चैतन्याचे अनुमान करून आत्मा चिज्जड आहे असें भाट्ट म्हणतात. कारण निजून उठलेल्याला जडत्वाची जी आठवण होते. ती पूर्वींच्या अनुभवावांचून होणार नाहीं. म्हणून आत्मा उभयात्मक आहे असें ते म्हणतात. ॥ ९५ ॥

जडो भूत्वा तदास्वाप्समिति जाड्यस्मृतिस्तदा ।
विना जाड्यानुभूतिं न कथंचिदुपपद्यते ॥ ९६ ॥
निजून उठलेला असें म्हणतो कीं, मी इतका वेळ जड होऊन निजलो होतों. ही जाड्यस्मृति जाड्यांच्या अनुभवावांचून कशी होईल. ॥ ९६ ॥

द्रष्टुर्दृष्टेरलोपश्च श्रुतः सुप्तौ ततस्त्वयम् ।
अप्रकाशप्रकाशाभ्यामात्मा खद्योतवद्युतः ॥ ९७ ॥
द्रष्ट्याच्या दृष्टीचा लोप सुषुप्तींत होत नाहीं असें श्रुतीत सांगितलें आहे. म्हणून आत्मा काजव्याप्रमाणे प्रकाश व अप्रकाश या दोहोंनी युक्त आहे. ॥ ९७ ॥

निरंशस्योभयात्मत्वं न कथंचिद्घटिष्यते ।
तेन चिद्रूप एवात्मेत्याहुः सांख्या विवेकिनः ॥ ९८ ॥
याजवर सांख्यवादी असें म्हणतात कीं, ज्याला अंश नाहीं त्याला उभयात्मकत्व कधींही संभवणार नाहीं, यास्तव आत्मा चिद्‌रूप आहे. ॥ ९८ ॥

जाड्यांशः प्रकृतेरूपं विकारि त्रिगुणं च तत् ।
चितो भोगापवर्गार्थं प्रकृतिः सा प्रवर्तते ॥ ९९ ॥
जाड्यांशाची व्यवस्था कशी या प्रश्नाचें उत्तर ते असें देतात कीं, तो जाड्यांश प्रकृतीचे रूप आहे. तें रूप विकारी असून त्रिगुणात्मक आहे. चैतन्याला जे बंधमोक्ष भासतात त्यास कांहीं तरी कारण पाहिजे म्हणूनू प्रकृतीची कल्पना त्यांनी केली. ॥ ९९ ॥

असङ्गायाश्चितेर्बन्धमोक्षौ भेदाग्रहान्मतौ ।
बन्धमोक्षव्यवस्थार्थं पूर्वेषामिव चिद्‌भिदा ॥ १०० ॥
प्रकृति आणि पुरुष अत्यंत भिन्न असतां असंग चैतन्याला बंधमोक्ष कसे ? या शंकेचे समाधान ते असें करतात कीं, तो भेद न समजल्यामळें बंधमोक्षांचा व्यवहार चालला आहे. आणि या व्यवस्थेकरिताच तार्किकांप्रमाणें सांख्यांनीही आत्मभेद मानला आहे. ॥ १०० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *