श्रीगणेश भाग २ गाणपत्य पंथ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

श्रीगणेश भाग २

गणेश गीता नावाचाही एक ग्रंथ आहे. पण तो जवळजवळ भगवद्गीतेसारखाच आहे. फक्त ‘ कृष्णाऐवजी गणेश ‘ नाव घालण्यात आलं आहे याखेरीज ‘ गणपती कवच ‘, ‘ गणपती पंचरत्न ‘, ‘ गणपति पंचांग ‘, ‘ गणपति पंचावरण स्तोत्र ‘ ( शंकराचार्यकृत) , ‘ गणपतीपुराश्चरणाविधी ‘, ‘ गणपति पूजा ‘, ‘ गणपती पंत्र विधान ‘, ‘ गणपति मानसपूजा ‘, ‘ गणपति रत्नप्रदीप ‘, ‘ गणपति रहस्य ‘, ‘ गणपति सूक्त ‘, ‘ गणपति स्तवराज ‘, ‘ गणेश महात्म ‘ इत्यादी अनेक गणेश पूजनाचे ग्रंथ आहेत.
आनंदतीर्थांनी लिहिलेल्या ‘ शंकर दिग्विजया ‘ मध्ये भया गणपत्यासंबंधीचा व त्यांच्या तत्त्वांचा उल्लेख आला आहे. हा ग्रंथ दहाव्या शतकांमध्ये लिहिला गेला असावा. या ग्रंथामध्ये गाणपत्यांचे सहा पोटभेद होते. हे पोटभेद म्हणजे ‘ महागणपति पंथ ‘, ‘ हरिदागणपति पंथ ‘, ‘ उच्छिद गणपति पंथ ‘, ‘ नवनीत गणपति पंथ ‘, ‘ स्वर्गगणपति पंथ ‘ व ‘ सनातन गणपति पंथ ‘ हे आहेत.


या पंथांपैकी ‘ उच्छिष्टा गणपति पंथ ‘ थोडासा चमत्कारिक आहे. या पंथाचे अनुयायी गणपतीची डाव्या हाताने पूजा करतात. हे लोक गणपतीला ‘ ऐरंब ‘ हे नाव देतात. या पंथात जातीभेद पाळण्यात येत नाही. सर्व विवाहविषयक निबंधिंना या पंथात थारा नाही. चंदकृति तांबडे गंध लावणे ही गाणपत्यांची मुख्य खूण होय.
भादपद शुद्ध चतुर्थीस (गणेश जन्मदिवसापासून) या सणाला आरंभ होतो. गणेशदेवता व शेतीचा हंगाम यांचा अन्योन्य संबंध असावा. कारण पावसाला उशीर झाल्यामुळे आगामी पीकपाण्याबद्दल अनिश्चितता वाटू लागल्यावर ‘ विघ्नहर्ता ‘ गणेशाचं पूजन करणं हे प्रसंगोचित व जरूरी आहे.
‘ व्रतराज ‘ ग्रंथात या व्रताचा उल्लेख येते. भादपद शुद्ध चतुथीर्स गणेशाची सुवर्णाची मूतीर् करून तिची प्राणप्रतिष्ठेपासून पूजा करून हवनादि विधी करावे व नंतर ती मूतीर् ब्राह्माणास दान करावी इत्यादी विधी सांगितला आहे.


थ्वनायकी व संकष्टी चतुर्थी या व्रतांचा संबंध चंदाकडे नसून , गणेशाकडेच आहे. परंतु गणेश व चंद यांचाही अन्योन्य संबंध आहे , ही गोष्ट गणेशचतुर्थीस दिसून येते. कारण त्या दिवशी चंद पाहणं अशुभ मानतात. कोणी चुकून चंद पाहिलाच तर त्याला शेजारच्या घरावर दगड फेकून व चार शिव्या खाऊन ते अशुभ टाळता येतं. चतुर्थीचा चंद पाहणं व विपद्ग्रस्त होणं या गोष्टी मराठीत समानार्थी मानल्या जातात.
पेशव्यांच्या राजवाड्यात प्रतिवर्षी भादपद शुद्ध चतुर्थी ते दशमीपर्यंत गणेशोत्सव होत असे. त्याप्रसंगी गणपती रंग महालात मोठी आरास केली जाई. सर्व कार्यक्रम तिथेच होत. स्वच्छ हंडे , झुंबरे , मोठाले आरसे व विविध चित्रं यामुळे त्या महालाचं सौंदर्य द्विगुणित होत असे. मध्यावर सोन्याच्या भरजरीचं काम जिच्यावर केलं आहे अशी पेशव्यांची ‘ मनसद ‘ उर्फ गादी मांडलेली असे. दोन्ही बाजूला मुख्य मराठे सरदार , शिलेदार व दरबारी हे भरजरी पोशाख घालून आपापल्या दर्जाप्रमाणे रांगेने बसलेले असत. भालदार , चोपदार यांच्या ललकारीत स्वारी दरबारात प्रवेश करून मोठ्या ऐटीने सिंहासनारूढ होत असे. गणपती रंग महालात त्यावेळी गाणं , नाच , कथा-कीर्तनं वगैरे कार्यक्रम होत.


या उत्सवात सर्व नोकर- चाकर मोठ्या हौसेने मिसळत. त्यांना पेशव्यांकडून मिठाई वाटण्यात येई. ब्राह्माणभोजनं बरीच होत. विसर्जनाच्या दिवशी पुष्पांनी शृंगारलेल्या पालखीतून थाटाची मिरवणूक काढून गणपती विसर्जन होई. त्यावेळी पेशवे जातीने हजर असत.
गणपती उपासनेचं महात्म्य महाराष्ट्रात व दक्षिण भारतात आढळून येते. दविड लोकांचा हा मूळचा देव असावा. या देवाचं वाहन उंदीर आहे. दविड लोकांची ‘ औरौन ‘ म्हणून जी एक जात आहे त्या जातीचे उंदीर हे प्रमुख दैवत आहे. श्रावणकोरमध्ये ‘ होमपुरे ‘ उर्फ गणपतीची देवळं पुष्कळ ठिकाणी असून त्या ठिकाणी दररोज होम केला जातो. काही ठिकाणी क्वचित प्रसंगी ‘ महागणपति होम ‘ नावाचा खर्चिक होमही करण्यात येतो.
पुण्याजवळ चिंचवडला गणपतीची स्वयंभू मूतीर् असून त्या ठिकाणी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मोठा उत्सव करण्यात येतो. इथल्या मोरया गोसावी नावाच्या साधूने गणपतीला प्रसन्न करून घेतले. ‘ मी तुझ्या शरीरात व तुझ्यामागून होणाऱ्या सहा पुरुषांत अंश रूपाने वास करेन ,’ असा गणपतीने त्याला वर दिला. त्याप्रमाणे मोरया व त्याचे सहा वंशज यांच्यामध्ये गणपती वास करतो , अशी समजूत असून या सात जणांच्या समाधीची गणपती या नात्याने दररोज पूजा करण्यात येते. या गणपती संस्थानला अनेक भाविकांनी देणग्या दिल्या असून , खुद्द औरंगजेब बादशहानेदेखील त्या संस्थानला आठ खेडी इनाम दिल्याचा उल्लेख आढळतो.
डॉ. वसंत ज. डोळस

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *