आत्म्याचा प्रवास, भाग 5, दिवा दहा दिवस अखंड तेवत ठेवावा, विझु देवु नये. संन्यासाला समाधी कशी देतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Atmyacha Prawas 2
Dehaci Mr̥tyupurva Avastha,
Marana Javal Alayavaraci Tayari.

The pre-death state of the body, preparation for approaching death.
|| मृत्यू नंतर आत्म्याचा प्रवास ||

*|| मृत्यू नंतर आत्म्याचा प्रवास ||*
|| लेखांक ५ वा ||

*कालच्या लेखात आपण पाहीले की, प्रेताला अग्नी न देणाऱ्या समाजानी प्रेताला मुठ माती कशी द्यावी याची माहिती सविस्तर पाहिली. पुढे… *

*एक वर्षाच्या आतील बालक मृत झाले तर, मग ते कोणत्याही जातीचे असो त्याचे जमिनीत दफन करावे. *

*सन्याशी गेल्यावर त्याला मखरातुन न्यावे, जर खोल आणि वाहते पाणी असेल तर जल समाधी द्यावी अन्यथा जमिनीत खोल खड्डा करून भूसमाधी द्यावी व नंतर त्यावर समाधी बांधावी. *

*वरिल पैकी कुठलाही विधि केलातरी स्मशानात आलेल्या लोकांनी जवळील जलाशयावर स्नान करावे,
अश्म्याला तिलांजली द्यावी व मृतव्यक्तीच्या घरी जावे,
घरी जाताना कडुनिंबाचे पान चावुन कडु तोंड करावे. *

*मृत व्यक्तीच्या घरात तो पर्यंत घरातील महिलांनी घर स्वच्छ झाडुन पुसुन घ्यावे,
स्मशानातून माणसं घरी येण्या आधी डोक्यावरून अंघोळ करावी व हाॕलमधील एका कोपऱ्यात दक्षिणेकडे तोंड करून खापराच्या पणतीत दिवा लावावा,दिव्याखाली पीठ किंवा राख टाकावी.
आलेल्या मंडळिंनी दिव्याला नमस्कार करून निघुन जावे.
हा दिवा दहा दिवस अखंड तेवत ठेवावा, विझु देवु नये. *


*अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात.

त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात कारण त्या दिव्याखालील पिठावर किंवा राखेवर,
गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्याची पावलं उमटतात असा सर्वदूर समज आहे,
पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे.
लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही त्याचि प्रक्रिया आहे ती आपण पुढे पहाणार आहोत. *

*आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतिक आहे,
आत्ता फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो,
पण
पुरातन काळी फोटो काढायची सोय नव्हती म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक म्हणुन आत्मज्योत अर्थात दिवा लावतात,
आत्मज्योत म्हणुन पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात.
कारण
दहा दिवस आत्मा घराबाहेच्या अश्म्यावर असतो
आणि
दहा दिवसा नंतरच त्याच्यावर संस्कार होतात.

बाराव्या दिवसानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. *

*त्या दहा दिवसांत अनेक नातेवाईक, मित्र मैत्रीणी, परिवार भेटायला येतात,
घरातील मंडळी रडत असतात, आलेली मंडळी गेलेल्या व्यक्ती बद्दल घरात चांगलं बोलतात बाहेर पडले की नको ते बोलतात हे सगळं तो आत्मा पहात असतो,
ऐकत असतो. आपल्या बद्दल कोण खरंखोटं बोलतो, कोण खरंखोटं रडतो हे सगळं त्याला कळत आसतं त्यामुळे त्याला खुप दुःख होतं व रडायला येतं. *

*या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्थी संचय तिसऱ्या दिवशी करावा.
तो कसा करावा ते पुढील लेखात पहाणार आहोत. *
*जीव हा शरीरापेक्षा वेगळा आहे. जीव हा प्रत्येक शरीरातही भिन्न आहे.
एका देहाचा आधार गेला तर जीव कालांतराने दुसरा देह धारण करतो. *

*वासांसि जीर्णानि यथा विहाय ||
नवानि गृण्हाति नरोSपराणि ||
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देहि

|| भगवत्गीता अ. ||२||श्लोक ||२२||*

*( ज्या प्रमाणे मनुष्य जुने फाटलेले वस्त्र काढुन नविन वस्त्र परिधान करतो,
त्या प्रमाणे जीवात्मा जीर्न झालेले शरीर सोडुन नविन शरीरात प्रवेशकरतो. )*

*आणि आपल्या वासनांना अनुसरून जन्म मरणाच्या चक्रात फिरत असतो.
त्या अवस्थेत त्या प्रेतरूप जीवाला मार्गदर्शन करण्या करिता सविस्तर अंतेष्टी संस्कार प्राचीन काळापासून धर्मशास्त्रानुसार चालत आला आहे.
आणि
तो करणे अत्यंत महत्वाचे व गरजेचे आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. *
*क्रमशः -*

WARKARI ROJNISHI
वारकरी रोजनिशी
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
www.warkarirojnishi.in
www.96kulimaratha.com
96 कुली मराठा
९६ कुळी मराठा

आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *