26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ❓ सविस्तर माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

-: मूळ लेखिका :-
सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256 बडनेरा,
अमरावती 26/01/2023

गीताचा आशय
या गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.[९]

राष्ट्रगीत म्हणून मान्यता
घटना समितीने २४ जानेवारी १९५० मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून केवळ पहिलेच कडवे भारतात म्हटले जाते.व त्याच दिवशी म्हणजे २४ जानेवारी १९५० भारताचे राष्ट्रगान ही स्विकृत केले.[

जनगणमन अधिनायक जय हे,
भारतभाग्यविधाता.
पंजाब सिंधु गुजरात मराठा,

द्राविड उत्कल बंग.
विंध्य हिमाचल यमुना गंगा,

उच्छल जलधी तरंग.
तव शुभ नामे जागे,

तव शुभ आशिष मागे.
गाहे तव जयगाथा.
जनगणमंगलदायक जय हे,

भारतभाग्यविधाता.
जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय जय हे.

माणूस हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी आहे. सणसमारंभ, धार्मिक उत्सव ह्या मध्ये तो समरसून भाग घेतो. प्रसंगी तन,मन धन ह्या त्रिवेणी संगमातून तो सणसमारंभ, उत्सव साग्रसंगीत यशस्वी करीत असतो.
ह्या सणांमध्ये आपले कौटुंबिक सण, धार्मिक सण ह्यांचा समावेश असतो. ह्या सणांबरोबरच माणसाचा स्वाभिमान जागृत करणारे, आपल्या कुटूंबियांप्रमाणे देशावर पण काकणभर जास्तच प्रेम करणारे राष्ट्रीय सण ही आपण खूप उत्साहाने साजरे करतोच.


त्या सणांपैकी एक सण म्हणजे आपला राष्ट्रीय सण,गणतंत्रदिन.आज 26 जानेवारी. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. अनेक स्वातंत्र्यसेनानी तसेच स्वातंत्र्यासाठी झपाटलेली जनता ह्यांच्यापुढे इंग्रजांनी माघार घेतली आणि अखेर 15 आँगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला.

सर्वत्र आनंदाला उधाण आले होते,जल्लोष सुरू होता तरीही देशातील मातब्बर राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिलेली मंडळी वेगळ्याच विचारात होती. आता त्यांना खरी काळजी होती की हे जे स्वातंत्र्य खूप हालअपेष्टा सहन करून महत्प्रयासाने मिळवले आहे ते आपल्या थोड्या चुकीने, गलथान कारभाराने गमवायला नको.

जनतेला आपल्या कारभाराने स्वातंत्र्याची सुमधुर फळेच चाखायला मिळायला हवीत. हे सगळे जर साध्य करायचे असेल तर आपल्या देशाचा कारभार सुनियंत्रीतच असावयास हवा.
अराजकता, दडपशाही ला येथे थारा नको.
देशाचा कारभार हा लोकांनी निवडलेल्या, त्यांच्या पसंतीच्या माणसांनीच सांभाळायला हवा.
ह्यासाठी आपल्या देशाची एक काटेकोर नियमावली हवी.


..देश स्वतंत्र झाला असला, तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती. 9 डिसेंबर 1946 पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947. अर्थातच हा काही अंतिम मसुदा नव्हता. ह्यात अजून सखोल अभ्यासाने बदल हे होणारच होते.
… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षांत घटना समितीची एकूण 12 सत्रं पार पडली. घटनेतील प्रत्येक शब्द न शब्द हा संपूर्ण अभ्यास करून, कायद्याचा अक्षरशः कीस पाडून, तोलून-मापून आणि प्रत्येक सामान्य नागरीकाचा सारासार हिताचा विचार करुन सर्व विचाराअंती लिहिण्यात आला.
आणि अखेर तो सुदिन उजाडला.तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949,ह्या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.आणि 26 जानेवारी 1950ला ती देशात अंमलात आणल्या गेली, तेव्हापासून आपण आजपर्यंत एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखल्या जातो.प्रजासत्ताक आणि सार्वभौम राष्ट्र ह्या दोन्ही गोष्टी निरनिराळ्या. आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे आपले राष्ट्र प्रजासत्ताक आणि सार्वभौम दोन्हीही आहे


ज्या देशात घटनात्मक प्रमुखाची नियुक्ती निवडणुकीद्वारे होते, तो देश प्रजासत्ताक असतो. जो देश स्वतःच स्वतःला चालवतो आणि बाहेरच्या शक्तींवर अवलंबून नसतो, त्याला सार्वभौम म्हणतात.
पण 1950मध्ये राज्यघटना तयार झाल्यावर गव्हर्नर जनरल हे पदच रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर पहिले राष्ट्रपती, देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताची सुव्यवस्थीत घडी बसविणं हे वाटतं तितकं सोप काम नव्हतं.ते आपल्यापुढील एक आव्हानच होतं. पाकिस्तानमधून येणाऱ्या निर्वासितांचं पुनर्वसन करणं, जवळजवळ साडेपाचशे स्वायत्त संस्थानांना भारतात सामील करून घेणं हे जिकीरीचं काम होतं. यापैकी हैद्राबाद, जुनागढ व काश्मीर वगळता सर्व संस्थानांनी भारतात विलीन होण्यास तात्काळ संमती दिली. 500 पेक्षाजास्त संस्थानांना भारतात सामील करून घेण्याच अतिशय जटील, जिकीरीचं आणि जबाबदारीचं काम सरदार पटेलांनी लिलया आणि योग्य रितीने हाताळलं.

स्वतंत्र भारताच्या पुढील आव्हानं
सर्वप्रथम आपली सापंत्तीक स्थिती बळकट करून जगात आपला आर्थिक स्तर उंचावणे हे प्रमुख आव्हानं होत.
इंग्रज जातांना आपली परिस्थिती अतिशय बिकट आणि विदारक करून गेले होते.देशांत गरिबी होती, निरक्षरता होती, शेती अत्यंत वाईट परिस्थितीत होती. हे सर्वकाही सुस्थितीत आणण्याचं आव्हान स्वतंत्र भारताच्या शासकांपुढे होतं.

घटनेच्या मसुदा समितीचे गठन
………. भारतीय संविधान हे अनेक लोकांच्या परिश्रमातून, अभ्यासातून, आणि संशोधनातून निर्माण झालं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे म्हणजेच घटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख होते. भारतीय संविधानाचं स्वरूप कसं असावं, त्याची चौकट त्यांनी आखली, विविध विषयांवरील तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती, त्यांच्या सूचना ध्यानात घेऊन त्या राज्यघटनेत कशा येतील याचा विचार बाबासाहेबांनी केला. राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी जो मोठा वाटा उचलला आहे त्यामुळे त्यांना राज्यघटनेचा शिल्पकार म्हटलं जातं.


डॉ. आंबेडकरांची घटनेच्या मसुदा समितीवर नियुक्ती 28 ऑगस्ट 1947 रोजी झाली.
141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला.
तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947.
प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी पासून घटना अमलांत आणावयास सुरवात झाली आणि ह्या दिवसापासून आपलं राष्ट्र सुनियंत्रीत पद्धतीने राज्याचा गाडा चालवू लागलं.
इतक्यात 26 जानेवारी च्या निमित्ताने सहजच मनात आलं खरचं किती नागरिकांना. ह्या घटनेविषयी, ह्या चालणाऱ्या कामकाजाची सविस्तर इत्यंभूत माहिती असेल ?
मला स्वतः ला राजकारण ह्या विषयाची मुळातच नावड असल्याने आणि शिक्षण सायन्स फँकल्टी मध्ये झाल्याने ह्याची फारशी माहिती नव्हती.पण आता हा अभ्यास करायचा मानस जोर धरू लागलायं हे पण खरं.

मूळ लेखिका :सौ.कल्याणी केळकर बापट 9604947256 बडनेरा, अमरावती 26/01/2023

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *