श्राद्ध / पितृपाक्षाविषयी महत्वाचे ११ प्रश्नोत्तरे

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

श्राद्ध / पितृपाक्षाविषयी शंका समाधान

१. प्रश्न :-  घरात / कुळात चालू वर्षात मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का ?
उत्तर :-
 नाही. मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही.

२. प्रश्न :-  घरात / कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?
उत्तर :-
  सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एकवर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात “अविधवा नवमी” (भाद्रपद कृष्ण नवमी) या दिवशी श्राद्ध करता येते.

३. प्रश्न :-   ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात ?
उत्तर :-
  पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालतात.

४. प्रश्न :-   ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे. ?
उत्तर :-
  शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे.

५. प्रश्न :-  संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे ?
उत्तर :-
  अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात.

६. प्रश्न :-   पितरांची तिथी माहित नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?
उत्तर :-
  भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या ( सर्वपित्री अमावस्या ) या दिवशी सर्व पितरांचे (ज्ञात-अज्ञात)श्राद्ध घालता येते. तसेच ब्राम्हणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान द्यावे.

७. प्रश्न :-  श्राद्ध घालतांना नैवेद्य मंडल कसे घालावे ?
उत्तर :-
  पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे.

८. प्रश्न :-   अघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी ?
उत्तर :-   पितृस्तुती, बाह्यशांती सुक्त, पितरतुष्टीकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी १२ वाजता एका पोळीवर थोडा भात,तूप,५-७ काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून १ माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे. यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती लाभते.

मंत्र :  मध्व: सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम |

      बहिर्ष्मती रातीर्वीश्रिता गिरीषा यांत नासत्योप वाजै: ||

९. प्रश्न :-   मातामह श्राद्ध म्हणजे काय? त्यचा अधिकार कोणाला असतो?:
उत्तर :-
  नवरात्रच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध (दौहित्र) असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा (आईचे वडील) जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहीत्राचा अधिकार असतो.

ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी) आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरवात करावी. स्वत:चे वडील गेल्यास दौहित्र करू नये. दौहीत्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो. हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय. नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही.

१०. प्रश्न :-   पितृपक्षात पारायण करता येते का ?
उत्तर :-
  हो. पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते.(गुरुचरित्र/नवनाथ/भागवत/श्रीपाद चरित्र इत्यादी) पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते.

११. प्रश्न :-   दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करता येते ?
उत्तर :-
  सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्यसेवा ग्रंथातील पितर तुष्टीकारक स्तोत्र व बाह्यशांती सुक्त वाचावे. रोज पंचमहायज्ञ करावा (नित्यासेवा ग्रंथात विस्तृत माहिती वाचावी) या पंचमहायज्ञासाठी फक्त ५ मिनिटे लागतात.

दर अमावस्येला हिरण्यदान करावे. (१ जाणवे, पेढे, ५ / १० रु. दक्षिणा इत्यादी ब्राम्हणाला दान करावेत) . दर अमावस्येला १किलो कोळसा व ३ नारळ घेऊन त्यावर १ माळ महामृत्युंजय जप करावा व जवळपासच्या जलाशयात सोडून द्यावे.

प्रखर पितृदोष असल्यास श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली किंवा त्रिपिंडी हा विधी करावा. तसेच मातृगया (सिद्धापूर,गुजराथ) येथे जाऊन पिंडदान करावे.

दरमहा किंवा वर्षातून १ पारायण “सुलभ भागवत ग्रंथाचे करावे” यामुळे पितरांना मुक्ती मिळते. भागवत पारायण करतांना “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचे संपुट किंवा पल्लव लावल्यास जन्म-जन्मांतरीचे दोष नाहीसे होतात.

संकलन :- सतीश अलोणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *