पत्नीला लौकिककर्मात व दैवीक कर्मात कोणत्या बाजूला पूजेला बसवतात?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , ,

पत्नीला वामांगी का म्हणतात? 💎⚜️🌹🚩

१. :- शास्त्रात पत्नीला वामांगी म्हणजेच डाव्या अंगाची अधिकारी म्हणतात. म्हणून, पुरुषाच्या शरीराची डावी बाजू स्त्रीची मानली जाते.
२. :- याचे कारण असे की भगवान शिवाच्या डाव्या अंगातून स्त्रीची उत्पत्ती झाली आहे, जी शिवाच्या अर्धनारीश्वर शरीराचे प्रतीक आहे.
३. :- हस्तरेषाशास्त्राच्या पुस्तकांमध्ये ह्याच कारणांमुळे, पुरुषाच्या उजव्या हाताने पुरुषाची स्थिती आणि डाव्या हाताने स्त्रीची स्थिती पाहण्यास सांगितले आहे.


४. :- स्त्रीने आशीर्वाद घेताना आणि भोजनाच्या वेळी पतीच्या डाव्या बाजूला असावे, असे शास्त्रात सांगितले आहे. यामुळे शुभ परिणाम मिळतात.
५. :- वामांगी असूनही काही कामांमध्ये स्त्रीला उजव्या बाजूला राहण्यास शास्त्र सांगते. कन्यादान, विवाह, यज्ञकर्म, जातकर्म, नामकरण आणि अन्नदानाच्या वेळी पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसावे, असे शास्त्रात सांगितले आहे.

६. :- पत्नी पतीच्या उजवीकडे किंवा डावीकडे बसते या श्रद्धेमागील तर्क असा आहे की, ज्या कृती सांसारिक असतात त्यामध्ये पत्नी पतीच्या डाव्या बाजूला बसते. कारण हे कर्म स्त्रीभिमुख कर्म मानले जाते.
७. :- यज्ञ, कन्यादान, विवाह ही सर्व कामे अतींद्रिय मानली जातात आणि ती पुरुषप्रधान मानली जातात. म्हणून, या कृतींमध्ये, पत्नीच्या उजव्या बाजूला बसण्याचे नियम आहेत.


🚩⚜️🌹तुम्हाला माहित आहे का??????

८. :- सनातन धर्मात पत्नीला पतीची वामांगी, म्हणजेच पतीच्या शरीराची डावी बाजू असे म्हटले जाते, याशिवाय पत्नीला पतीची अर्धांगिनी असेही म्हटले जाते, म्हणजे पत्नी ही पतीच्या शरीराचा अर्धा भाग असते. दोन्ही शब्दाचे सार म्हणजे, पती पत्नीशिवाय अपूर्ण आहे.
९. :- पत्नी पतीचे जीवन पूर्ण करते, त्याला आनंद देते, त्याच्या कुटुंबाची काळजी घेते, आणि त्याला हव्या त्या सर्व आनंद देते. समाज कोणताही असो, लोक कितीही आधुनिक असोत, पण नात्याचे स्वरूप प्रेम आणि परस्पर समंजसपणाने बनलेले पती-पत्नीसारखेच राहतात.


१०. :- प्रसिद्ध हिंदू धर्मग्रंथ महाभारतात पती-पत्नीच्या महत्त्वाच्या नातेसंबंधाबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे, भीष्म पितामह म्हणाले होते की पत्नीने नेहमी आनंदी राहावे, कारण तिच्या वंशाच्या वाढ होते, ती घराची लक्ष्मी आहे. लक्ष्मी प्रसन्न झाली तरच घरात सुख-समृद्धी येते, याशिवाय अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये पत्नीचे गुण सविस्तरपणे सांगितले आहेत.
११. :- गरुड पुराणात सांगितलेल्या पत्नीच्या काही गुणांची माहिती दिली आहे.

सा भार्या या गृहे दक्षा सा भार्या या प्रियंवदा।
सा भार्या या पतिप्राणा सा भार्या या पतिव्रता।।

🚩 गरुण पुराणात पत्नीचे गुण समजून घेण्यासाठी हा एक श्लोक आढळतो, तो म्हणजे, जी पत्नी गृहकार्यात निपुण आहे, जी प्रियवादिनी आहे, जिचा पती तिचा जीव आहे आणि जो पती आहे, ती खरी पत्नी होय.
🚩 सद्गुणी पत्नी, जी घरातील कामात तरबेज असते. घरातील कामे सांभाळणारी, घरातील सदस्यांचा आदर करणारी, वडीलधाऱ्यांची आणि लहानांची काळजी घेणारी पत्नी होय.


🚩 जी पत्नी घरातील सर्व कामे जसे की स्वयंपाक करणे, साफसफाई करणे, घराची सजावट करणे, कपडे आणि भांडी साफ करणे इत्यादी करते. गरूण पुराणानुसार, कमी साधनातही घर चांगले सांभाळणारी पत्नी सद्गुणी म्हटली जाते, अशी पत्नी तिच्या पतीला नेहमीच प्रिय असते .


🚩”प्रियवदिनी” म्हणजे गोड बोलणारी पत्नी, आजच्या युगात जिथे स्वतंत्र स्वभावाच्या आणि पटकन बोलणाऱ्या बायकाही आहेत, ज्यांना कोणत्या वेळी कोणाशी कसे बोलावे हेच कळत नाही, म्हणून गरुड पुराणात दिलेल्या सूचनेनुसार, नवऱ्याशी नेहमी संयमी भाषेत बोलते, हळू बोलते आणि प्रेमाने बोलते तीलाच एक सद्गुणी पत्नी म्हंटले आहे.

🚩 पत्नी जेव्हा अशा प्रकारे बोलते तेव्हा पती सुद्धा तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो, आणि तिच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु केवळ पतीच नाही तर घरातील इतर सर्व सदस्य किंवा कुटुंबाशी संयमित बोलते ती सद्गुणी पत्नी असते. ज्या घरात अशी गुणी स्त्री असेल त्या घरात कधीही कलह होत नाहीत आणिदुर्भाग्य राहत नसते.


🚩 “पतिपरायण” म्हणजे जी पत्नी आपल्या पतीचे शब्दाचे पालन करते ती देखील गरुण पुराणानुसार सद्गुणी पत्नी असते, जी पत्नी आपल्या पतीला सर्वस्व मानते, त्याला देवता मानते आणि आपल्या पतीबद्दल कधीही वाईट विचार करत नाही, पत्नी सद्गुणी असते.

🚩 लग्नानंतर फक्त स्त्री म्हणून नाही, तर पुरुषाची बायको बनूनच नवीन घरात प्रवेश करते, तिला त्या नव्या घराची सूनही म्हणतात, तिचं त्या घरातील लोकांशी आणि संस्कारांशी घट्ट नातं बनतं.


🚩 त्यामुळे लग्नानंतर नवीन घरच्या लोकांशी संबंधित चालीरीती स्वीकारणे ही स्त्रीची जबाबदारी असते, याशिवाय पत्नीला एक विशेष धर्म पाळावा लागतो, लग्नानंतर तिचा पहिला धर्म म्हणजे पती आणि कुटुंबाच्या हिताचा विचार करणे आणि पती किंवा कुटुंबाचे नुकसान होईल असे कोणतेही काम न करणे.


🚩 गरुण पुराणानुसार जी पत्नी रोज शुचिर्भूत होऊन, पतीसाठी साजशृंगार कराते, कमी शब्दात बोलते आणि सर्व शुभ लक्षणांनी परिपूर्ण असते, जी सतत आपल्या धर्माचे पालन करते आणि केवळ आपल्या पतीचाच विचार करते, तिलाच खर्‍या अर्थाने पत्नी असे म्हंटले आहे. ज्या पुरुषाच्या पत्नीमध्ये हे सर्व गुण आहेत, त्याने स्वतःला देवराज इंद्रच समजायला पाहिजे.

, , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *