दीक्षा घेतल्यावर श्री सद्गुरूंजवळ कसे वागावे?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

दीक्षा घेतल्यावर श्री सद्गुरूंजवळ कसे वागावे?

1) सद्गुरूंशी खोटे बोलू नये.
फार बोलू नये.

2) सद्गुरूंची निंदा करू नये.

3) आपले बोलणे बरोबर नाही, असत्य आहे, या स्वरूपाचे शब्द तोंडात येऊ नये.

4) गुरूंसमोर वेगळी पूजा करू नये.

5) मर्यादा सोडून वागू नये.

6) दीक्षा वगैरे विषयावर आपले प्रभुत्व दाखवणारे भाषण करू नये.

7) सद्गुरूंचे आसन, अंथरुण, वस्त्रादि-कपडे, अलंकार, पादुका, चित्र इ. ना स्पर्श करून वंदन करावे.

8) गुरू आज्ञा मोडू नये.

9) सद्गुरूंना प्रत्युत्तर देऊ नये.

10) दिवसा, रात्री, सदैव सेवकाप्रमाणे त्यांची आज्ञा पाळली पाहिजे.

11) असत्य, अशुभ, वादविवाद इ. टाळावे.

12) सद्गुरूंना न आवडेल असे करू नये.

13) सद्गुरू कार्यातआळस करू नये.

14) सद्गुरू कार्यात लौकिक इच्छा नसाव्यात.

15) सद्गुरू कार्यात राग नसावा.

16) सद्गुरूंच्या डोळ्याला डोळा भिडवून कधीही बोलू नये.

17) सद्गुरूंना नमस्कार केल्याशिवाय ओलांडून वा समोरून जाऊ नये.

18) संपत्ती, जात किंवा आश्रम इ. चा अभिमान नको.

19) सद्गुरूंसमोर अद्वैताची भाषा करू नये.

20) सद्गुरूंसमोर देवपूजाही करू नये.

21) सद्गुरूंसमोर पलंगावर निजू नये व तसेच समोर हात पाय पसऱून बसू वये.

22) आळस, अंगविक्षेप समोर करू नये.

23) जाता-येता सद्गुरूंच्या पादुकांना वंदन करावे.

24) त्यांचे काम प्रसन्नतेने करावे.

25) सद्गुरूंची सावली ओलांडू नये.

26) त्यांचे पुढून तसेच जाऊ नये.
अनवाणी जाऊन आधी गुरुगृहाला वंदन करावे.

27) सद्गुरूंसमोर आपला शिष्य-संप्रदाय मिरवू नये.

28) अहंकार करू नये.

29) आपल्या गुरूंना त्यांच्या गुरूंसमोर नमस्कार करू नये.

30) सद्गुरूंशी ‘तुम्ही’ सर्वनामान न बोलता ‘आपण’ सर्वनाम वापरून बोलावे.

31) सद्गुरूंना वंदन करून त्यांचेजवळ बसावे.

32) सद्गुरूंच्या आज्ञा घेऊन त्यांच्या जवळून जावे.

33) सद्गुरूंसमोर काम, क्रोध, लोभ, मान घेणे, हसणे, स्तुती करणे, कुटिलता दाखविणे, ओरडणे, रडणे या गोष्टी करू नये.

34) सद्गुरूंना ऋण देणे किंवा त्यांच्याकडून ऋण घेणे, त्यांना वस्तू विकत देणे या गोष्टी करू नये.

35) सद्गुरूंच्या समाधानातून शिष्याला पूर्णत्व प्राप्त होते.

36) सद्गुरूंच्या आठवणीत सर्व देवतांचे स्मरण अंतर्भूत आहे.

37) गुरू, गुरू-मंत्र आणि इष्टदेवता या तीन वेगवेगळ्या गोष्टी नसून एकच आहे असे समजावे.

  • योगिराज श्री वामनराव गुळवणी महाराज

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *