भगवत भक्त कुर्मदास

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आई ये, आई कीर्तनाची वेळ झाली. चल लवकर. कीर्तन कीर्तन रोज कीर्तन. गुडघ्यापासून पाय नाही तुला, कोपरापासून हात नाही तुला. कोण नेईल रोज तुला कीर्तनाला? बर लहान नाहीस, बाविस वर्षाचा मोठा आहेस, नाही उचलत. आई खर आहे तुझं म्हणन. मी बाविस वर्षाचा घोडा झालो, पण तुझ्या काही उपयोगाला आलो नाही. माझ्या पित्यान झुरुण झुरुण प्राण सोडला मी जिवंत आहे. आई मी बिन हाताचा, बिन पायाचा. माझा काय गं दोष? आई….. आई आजच्या दिवस कीर्तनाला मला घेऊन चल. आजच्या दिवस, उद्या नाही म्हणार आई. आईचेच डोळे पाण्याने डबडबले. आईच होती ती. “ऐसी कळवळयाची जात… “आई न पाठिवर घेतल मांडीपासून पाय नाही, कोपरा पासून हात नाही. पुत्र तिचा…. कंबरेला लंगोटी…. गळ्यात तुळशीची माळ… कपाळी टिळा. सातशे वर्षा पूर्वी पैठणात वाळवंटात कीर्तन चालू होत. भानुदास महाराजाचं. भानुदास महाराज नाथ महाराजांचे पणजोबा.

भानुदासाचे चक्रकांत, चक्रकांत चे सूर्यकांत आणि सूर्यकांतचे नाथ महाराज. भानुदास महाराजांनचे कीर्तन चालू आहे. आईने आणून सोडल. वाळवंट माणसांनी भरून गेलाय, चालता येत नाही. माणसांतून रस्ता काढत. पोटावर फरपटत फरपटत समोर आला महाराजांच्या. ज्याला कीर्तन ऐकायच, त्याने अगोदर येत जाव पुढे बसत जाव. कीर्तनाला जावून जागा पकडा कीर्तनाला जागे रहा. बाबा यायच्या अगोदर कीर्तनाला येत जाव, पुढे बसत जाव, हे भानुदास महाराज सांगत होते.
महाराजांच लक्ष गेल, आला का कूर्मदासा? हो बाबा आलो. कुणा बरोबर आलास? आई बरोबर आलो. कशाला आईला त्रास दिलास. कुर्मदासा आता घरी कसा जाशील? नाही बाबा आता मला घरी नाही जायच. आमचं आजचं शेवटच कीर्तन. उद्या काला करुन निघणार आहे पंढरीला. उद्या काल्याचं कीर्तन आहे. हो काल्याच कीर्तन आहे. काला झाला की हाला. साडेतीन वाजेपर्यन्त सुपडा साफ काहीच शिल्लक रहात नाही. आम्ही सगळे पंढरीला जाणार. महाराज मी येऊ का पंढरीला. कीर्तनाला यायला आई च्या पाठकोळी याव लागत तुला. तुला कोण नेईल रे पंढरीला एवढ लांब. महाराज तुम्ही फक्त हो म्हणा. तुम्ही मनापासून हो म्हणा मी येतो का नाही पंढरीला. तुम्ही हो म्हणा महाराज. महाराज विनोदाने म्हणाले हो ये. वारकरी झोपलेले पाहिले आणि हे उठले गोदावरिच स्नान केलं. फरपटत फरपटत लोटांगण घालत पंढरी चा रस्ता धरला, तांबड फुटल लोक उठू लागले. जाणाऱ्यास येणाऱ्याला विचारु लागला. अहो महाराज पंढरी चा रस्ता कोणता हो. पुढ जा, मग पुढ विचार सकाळी दहा वाजेपर्यन्त त्यान बिड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात गेला. मोठ्यान ओरडू लागला “ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरी च्या वाटेवर आहे हो. कोणी कालवण आणवे भाकरी आणाव्या.

भानुदास महाराजांची दिंडी आली, तो पर्यन्त खाण्या पिण्याची सोया केली. बिना हाता पाया चा कुर्मदासाला भानुदास महाराजांनी विचारलं, कुर्मदासा कसा आलास रे. तुमच्या ” हो “ने मला आणलं. भानुदास महाराजांनी सगळ्यांना भाजी भाकरीचे भोजन देऊन दुपारी प्रवचन झालं, हरीपाठ झाला, कीर्तन झाल. महाराज म्हणाले, उद्याचा आपला मुक्काम मांजरसुंबा. रात्री वारकरी झोपले, की कूर्मदास निघाला, खरडत खरडत मांजरसुंबा गाठल. तिथही त्याने हाकारा केला. तिथेही भोजनाची व्यवस्था केली. एक एक मुक्काम माग पडू लागला. येरमाळा बार्शी अस करत करत बार्शी च्या पुढे लहुळ एक गाव आहे. कुर्डुवाडीच्या पुढे जे गाव त्या लहुळ गावात हाकारा दिला. दिंडी मागून आली महाराजाचं प्रवचन झाल. भानुदासाजवळ महाराज आले. कूर्मदासा आता एकच मुक्काम राहिला. नाही महाराज, नाही येऊ शकणार आता मी. इतक्या लांब आला आणि एका मुक्कामासाठी येणार नाही म्हणतो. नाही महाराज….. का? पालथा होता, तो उताणा झाला. सगळं पोट सोलून निघालेलं, प्रचंड जखमा झालेल्या, रक्त वहात होत. जखमात खडे रुतले होते. कूर्मदास थकून गेला होता. बोलण्याचं त्राण राहीलं नव्हतं. निघाल्या पासून पोटात अन्न नाही. सगळ्या साठी अन्न गोळा केलं, पण स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नाही. का???? मल, मूत्र कोण धुईल माझ????? घरी आई धूत होती, इथ कोण धुईल? म्हणून अन्न पाणी सोडल त्यानं. भानुदासांचे डोळे डबडबले. कूर्मदासा काय केल हे?महाराज, घरी राहून काय केल असतं….. निदान पंढरी च्या वाटेवर आलो तरी. आपण एकच करा,

उद्या पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा. सांगा पांडुरंगाला, तुझ्या पायाजवळ यायला कूर्मदासाचं पुण्य कमी पडलं. या जन्मात नाही पहाता आले चरण. पांडुरंगाला एवढा निरोप सांगा. भानुदासाचे पाय जड झाले. तसेच पंढरीला आले. चंद्रभागेच स्नान केलं. पांडुरंगाच्या दर्शनाकरता बारीला उभं राहीले. भानुदासांनी पांडुरंगाकडे पाहिले. पांडुरंगाने भानुदासा कडे पाहिले. अन्तःकरणातलः चिंतन तिथपर्यन्त पोहचल. पांडुरंग रुख्मिणी मातेला म्हणाले. लक्ष राहू दे वारीवर. लहुळला जाऊन येतो. पांडुरंगांनी गरुडाला आज्ञा केली. पांडुरंग कूर्मदासाजवळ आले. त्याच शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं. कूर्मदासाला शुध्द आली. त्याने वर पाहिलं. भगवंताच रूप दिसल 🙏🙏🙏🙏🙏🙏
कूर्मदासा आलो मी तुझ्या साठी. भगवंता माझ्यासाठी ईथपर्यन्त आलात. माझ्यासाठी हीच पंढरी. काळजी करु नको कुर्मदासा. काय हवयं तुला… ? माग. कूर्मदास म्हणतो, मला काही नको. द्यायचच असेल तर जन्मो जन्मी माझे सद्गुरु मला लाभो, बाकी काही नको. आणि
पांडुरंगाच्या मांडीवर कूर्मदासाने शांत डोळे मिटले

अशी ही सातशे वर्षापूर्वी घडलेली संत कथा आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते आणि मोठा संदेश देते. हतबल होऊ नका. भक्तीच्या मार्गाने उपासनेच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर नर जन्माच सार्थक करुन घेता येतं. जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांनी किंवा आत्महत्येचे विचार येतात, त्यांना विचार करायला लावणारी ही संत कथा आहे.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *