दत्तात्रयांचे २४ गुण – गुरु श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

दत्त जन्माचे अभंग आरतीसह
श्री दत्त जन्माख्यान अध्याय
दत्त चरित्र, ओवीबद्ध सूची
दत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहिती
दत्तात्रयांचे सोळा अवतार
दत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहिती
गिरनार माहात्म्य

, , , , , ,

२४ गुण – गुरु
|| श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि|| अवधूत यांचा संवाद आहे. `आपण कोणते गुरु केले

|| आणि त्यांपासून काय बोध घेतला’, हे यात अवधूत

|| सांगतो. { येथे ‘गुरु’ हा शब्द वापरला असला, तरी तो
|| ‘शिक्षक’ या अर्थाने वापरला आहे } अवधूत म्हणतो,

|| जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे; कारण प्रत्येक
|| गोष्टीपासून काहीना काही शिकता येते. वाईट गोष्टींपासून
|| कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून
|| कोणते सद्गुण घ्यायचे, हे शिकायला मिळते.
|| वानगीदाखल पुढे दिलेल्या चोवीस गुरूंपासून
|| थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्याचा समुद्र बनवला
|| आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे क्षालन केले.

१ } पृथ्वी 🔸:————

|| पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहिष्णू असावे.

२ } वायू 🔹:————

|| सुमन गंध वेचणें | दशदिशास वाटणें |
|| अनिल-नीती मधुरतरा | मानवे न तुज कशी ||

-:♦ भावार्थ 🔸:————

|| वारा सुगंधी फुलावरून वहातांना सुगंधाने आसक्त
|| होऊन तो तेथे थांबत नाही, त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या
|| वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत

३ } आकाश 🔹:————

|| आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चराचर वस्तूंना व्यापून
|| राहिला आहे, तरी निर्विकार, एक, सर्वांशी समत्व
|| राखणारा, निःसंग, अभेद, निर्मळ, निर्वैर, अलिप्त
|| आणि अचल आहे.

४ } पाणी 🔸:————

|| मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे.
|| कोणाचाही पक्षपात करू नये.
|| { पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते.
|| त्याप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी }

५ } अग्नि 🔹:————

मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि
|| जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषांचे आचरण
|| न करता आपले गुण कार्यकारणप्रसंगीच योग्य ठिकाणी
|| वापरावे.


६ } चंद्र 🔸:————

|| अमावास्येची सूक्ष्म कला आणि पंधरवड्याच्या पंधरा
|| कला मिळून चंद्राच्या सोळा कला मोजण्यात येतात.
|| ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे-अधिकपणा असून
|| त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तद्वत् आत्म्यास
|| देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत.
|| { आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही,
|| तर वाढतो किंवा मरतो, तो आपला देह }


७ } सूर्य 🔹:————

|| सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो.
|| आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव
|| करतो. त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय
|| करून, देश, काल, वर्तमानस्थिती लक्षात आणून
|| निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्यांस त्यांचा लाभ द्यावा
|| पण त्याचा अभिमान बाळगू नये.


८ } कपोत 🔸:————

|| जसा बहिरीससाणा कपोताला { कबुतराला }
|| परिवारासहित भक्षण करतो, तसे जो मनुष्य
|| स्त्री-पुत्रादिकांचे ठायी आसक्त राहून संसार सुखमय
|| मानून वागतो, त्याला काळ भक्षण करतो. यास्तव
|| मुमुक्षूने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे.

९ } अजगर 🔹:————

|| जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर
|| विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून रहातो आणि
|| ज्या ज्या वेळी जे जे मिळेल ते ते भक्षण करून संतोष
|| पावतो, त्यात अल्प-अधिक किंवा कडू-गोड असा
|| विचार करत नाही, काही काळ खावयास मुळीच
|| मिळाले नाही, तरी घाबरत नाही आणि अंगात शक्ती
|| असतांनाही तिचा उपयोग करावयास जात नाही, तद्वत्
|| मुमुक्षूंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही
|| मिळेल, ते भक्षण करून, प्रसंगी काही मिळाले नाही,
|| तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे.


१० } समुद्र 🔸:————

|| जसा समुद्र वर्षाकालात अनेक नद्यांनी अपरिमित
|| जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न आणल्यास
|| दुःखी होत नाही आणि त्यामुळे वर्धमान किंवा क्षीणतनू
|| { कृश } होत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने
|| स्वधर्माधीन राहून सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी
|| होऊ नये किंवा दुःखपरंपरा कोसळल्याने दुःखी होऊ
|| नये, सदैव आनंदभरित असावे.

११ } पतंग 🔹:————

|| पेटवलेल्या दिव्याचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग
|| मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मरतो.
|| त्याचप्रमाणे जो मनुष्य स्त्रीविलासाकरता, स्त्रीची
|| लावण्यता आणि युवावस्था पाहून मोहित होतो,
|| तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो.


१२ } मधमाशी आणि मधुहा 🔸:————

अ } मधमाशी 🔹:————

|| मधमाशी पुष्कळ कष्ट करून अडचणीच्या ठिकाणी,
|| उंच वृक्षावर पोळे बनवून त्यात मध साठवते. तो ती
|| स्वतःही खात नाही आणि दुसर्‍या कोणास खाऊ देत
|| नाही. शेवटी मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन,
|| तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जातात.
|| त्याप्रमाणे जो कृपण महत्प्रयत्न करून द्रव्यार्जन
|| करून त्याचा संग्रह करतो, तो ते द्रव्य अग्नी, चोर
|| किंवा राजा यांनी एकाएकी हरण करून नेल्यामुळे


|| शेवटी दुःख पावतो किंवा त्यास अनीतीमान संतती
|| प्राप्त होऊन ती त्या द्रव्याचा अपव्यय करते किंवा तो
|| निपुत्रिक मरण पावतो. याप्रमाणे तो कालवश झाल्यावर
|| ते द्रव्य जेथल्या तेथे रहाते अगर भलत्याला प्राप्त होते.”
|| मरते वेळी त्याची त्या द्रव्यावर इच्छा राहिल्यास तो
|| पिशाच किंवा सर्प होऊन ते द्रव्य वापरणार्‍याला
|| उपद्रव देतो. याप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक
|| मरणाची प्राप्ती होते, हा उपदेश मधमाशीपासून घेऊन
|| द्रव्यसंचय करण्याचे सोडून द्यावे.

आ } मधुहा 🔸:————

|| ज्याप्रमाणे मधुहा काही उद्योग केल्यावाचून मधाची
|| प्राप्ती करून घेतो, त्याचप्रमाणे साधक पुरुषाने चूल,
|| भांडीकुंडी, अग्नी, लाकूड इत्यादी जमवाजमव
|| करण्याची खटपट न करता गृहस्थाश्रम्याच्या घरचे
|| सुसज्ज अन्न मिळवून भक्षण करावे आणि ईश्वरप्राप्तीच्या
|| उद्योगाकडे त्या वेळेचा उपयोग करावा. असे मुमुक्षू
|| गृहस्थाश्रमीजनांचे अन्न खाऊन त्यांचे कल्याणच करतात.


१३ } गजेंद्र { हत्ती } 🔹:————

|| हत्ती बलवान असला, तरी त्यास वश करण्यासाठी
|| माणसे भूमीत खड्डा खणून त्यावर गवत पसरतात.
|| त्यावर काष्ठाची एक हत्तीण करून तिला गजचर्म
|| पांघरतात आणि त्या खड्ड्यावर उभी करतात. तिला
|| पाहून हत्ती विषयसुखलालसेने लुब्ध होऊन शीघ्र गतीने
|| त्या काष्ठाच्या हत्तिणीसन्निध येतो आणि त्या खड्ड्यात
|| पडतो. त्यामुळे सहजी मनुष्याच्या हातात सापडतो.
|| त्याप्रमाणे जो पुरुष स्त्रीसुखास भुलतो, तो त्वरित
|| बंधनात येऊन पडतो.

१४ } भ्रमर 🔸:————

|| सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा
|| वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या
|| पोटात बंधन पावतो. यावरून ‘विषयासक्तीने बंधन
|| प्राप्त होते’, हे जाणून विषयांत आसक्ती बाळगू नये.



१५ } मृग 🔹:————

|| पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती
|| लागत नाही, असा कस्तुरीमृग मधुर गायनाला लुब्ध
|| होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून
|| कोणत्याही मोहात अडकू नये.

१६ } मत्स्य 🔸:————

|| लोखंडाच्या गळाला मांस बांधून पाण्यात सोडल्यावर
|| ते मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळतात
|| आणि गळ तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात.
|| त्याप्रमाणे मनुष्य जिव्हेच्या स्वादात बद्ध झाल्याने
|| जन्म-मरणरूपी भोवर्‍यात गोते खात रहातो.


१७ } पिंगला वेश्या 🔹:————

|| एके रात्री बराच काळ वाट पाहूनही एकही पुरुष पिंगला
|| वेश्येकडे आला नाही. वाट बघून आणि आशेने एकसारखे
|| आत-बाहेर येऊन ती कंटाळली आणि तिला अचानक
|| वैराग्य आले. जोपर्यंत मनुष्याच्या अंगी आशा प्रबल
|| असते, तोपर्यंत त्याला सुखनिद्रा लागत नाही. ज्या
|| पुरुषाने आशेचा त्याग केला, त्याला या संसारात एकही
|| दुःख बाधत नाही.

१८ } टिटवी 🔸:————

|| एकदा एक टिटवी चोचीत मासा धरून चालली आहे,
|| हे पाहून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागले
|| आणि तिला टोचा मारून, हतबल करून तो मासा
|| हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले. ती जिथे जिथे
|| जाई, तिथे तिथे हे सैन्य तिचा पाठलाग करी.
|| शेवटी ‘दे माय धरणी ठाय’ होऊन तिने एकदाचा तो
|| मासा टाकून दिला. तोच एका घारीने त्याला पकडले.
|| हे बघण्याचाच उशीर, टिटवीला सोडून सारे कावळे
|| आणि घारी त्या मासा उचलणार्‍या घारीचा पिच्छा पुरवू
|| लागले. त्यामुळे ती टिटवी निश्चिंत होऊन एका झाडाच्या
|| फांदीवर जाऊन शांतपणे बसली.
|| या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे,
|| नाहीतर घोर विपत्ती.


१९ } बालक 🔹:————

|| मानापमानाचा विचार न करता जगतास प्रारब्धाधीन
|| समजून, सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे रहावे
|| आणि आनंद भोगावा.


२० } कंकण 🔸:————

|| दोन कंकणे { बांगड्या } एकावर एक आपटून त्यांचा
|| आवाज होतो. अनेक कंकणे असली, तर जास्त आवाज
|| होतो. त्याप्रमाणे दोन माणसे एकत्र राहिल्यास वार्तालाप
|| होतो आणि ज्या ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र वास
|| करत असतील तेथे कलह होतो. दोन्हीमुळे मनोवृत्ती
|| शांत होत नाही. याकरता ध्यानयोगादी करणार्‍याने
|| निर्जन प्रदेश शोधून काढून त्या ठिकाणी एकटे रहावे.



२१ } शरकर्ता : { शरकार, शरकट, कारागीर } 🔹:———

|| एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते
|| सिद्ध करत बसला होता. त्याच्याजवळून राजाची स्वारी
|| वाजतगाजत थाटात गेली. मागाहून एक मनुष्य आला
|| आणि त्याने त्याला विचारले, ‘‘या वाटेने राजाची स्वारी
|| गेली, तिचे तुम्ही अवलोकन केले काय ?’’ त्यावर
|| कारागीर उत्तरला, ‘‘मी आपल्या कामात गर्क
|| असल्यामुळे मला ते कळले नाही.’’ या कारागिराप्रमाणे
|| मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान
|| धरावे.

२२ } सर्प 🔸:————

|| दोन सर्प कधीही एकत्र रहात नाहीत किंवा समागमे
|| फिरत नाहीत. ते आवाज न करता सावधपणे फिरतात,
|| आपल्याकरता रहाण्यास घर न करता वाटेल त्याच्या
|| घरात जाऊन रहातात. ते उघड रितीने फिरत नाहीत,
|| प्रमाद { दोष } नसता निंदाही करत नाहीत आणि
|| अपकार केल्यावाचून कोणावर कोप करत नाहीत.
|| त्याप्रमाणे दोन बुद्धीमंतांनी कधी एकत्र फिरू नये,
|| परिमित भाषण करावे, कोणाशी भांडण-तंटा करू नये,
|| विचाराने वागावे, सभा करून भाषण करू नये आणि
|| स्वतःच्या रहाण्यासाठी मठ न बांधता वाटेल तेथे राहून
|| आयुष्य घालवावे. रहाण्यासाठी घर बांधल्यास अभिमान
|| उत्पन्न होतो आणि त्यामुळे लोभ जडतो.


२३ } कोळी : { कांतीण } 🔹:————

|| कोळी आपल्या नाभीतून तंतू काढून त्यांचे घर बनवतो.
|| आणि त्यात अहोरात्र क्रीडा करतो. पुढे मनास वाटेल,
|| तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून कोळी स्वतंत्र होतो.
|| तसाच ईश्वर इच्छामात्रेकरून जग उत्पन्न करून
|| त्याच्याशी नाना खेळ करतो आणि मनास येईल,
|| तेव्हा त्याचा इच्छामात्रेच नाश करून आपण एकटा
|| रहातो. जसा कोळी पुनःपुन्हा तंतू काढून घर करू
|| शकतो, त्याप्रमाणे ईश्वर इच्छामात्रे चराचर जग उत्पन्न
|| करून त्याचा आपल्याच अंगी लय करून पुन्हा मनास
|| येईल, तेव्हा पूर्ववत ते निर्माण करतो. असे असल्याने
|| जगातील घटनांना महत्त्व देऊ नये.

२४ } पेशकार : { भ्रमरकीट, कुंभारीणमाशी } 🔸:———-

|| सति सक्तो नरो याति सद्भावं ह्येकनिष्ठया |
|| कीटको भ्रमरं ध्यायन् भ्रमरत्वाय कल्पते ||
|| विवेकचूडामणि, श्लोक ३५८

-:♦ अर्थ 🔹:————

|| भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला
|| पावतो तद्वत् एकनिष्ठपणाने परमात्वतत्वाचे चिंतन
|| करणारा योगी परमात्मरूपास पावतो.


-:♦ विश्लेषण 🔸:————

|| जो प्राणी सदैव ज्याचे ध्यान करतो, तो त्या ध्यानामुळे
|| परिणामी तदाकार होऊन जातो. कुंभारीणमाशी मातीचे
|| घर करून त्यात एक किडा आणून ठेवते आणि त्यास
|| वरचेवर येऊन फुंकर मारत रहाते. त्यामुळे त्या किड्याला
|| माशीचे ध्यान लागून रहाते आणि तो शेवटी कुंभारीणमाशी
|| बनतो. त्याप्रमाणे मुमुक्षूने गुरूपदिष्ट मार्गाने ईश्वराचेh ध्यान
|| धरावे, म्हणजे तो ईश्वरस्वरूप होतो.

🚩🕉🚩🕉🚩

भ. दत्तात्रय संपूर्ण माहिती

श्रीमद् भागवत महापूराण संबंधित संकलन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *