नित्योपासना संस्कार

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नित्योपासना संस्कार*

सूर्यनमस्कार

आचम्य । प्राणायमं कृत्वा । अद्य पूर्वच्चरितर्वमान एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभुपुण्य़तिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृति पुराणोत्कफलप्राप्त्यर्थं श्रीसवितृसूर्यनारायणप्रीत्यर्थं नमस्काराख्यं कर्म करिष्ये ।

॥ अथ ध्यानम् ॥

ध्येय: सदा सवितृमण्डल मध्यवर्ती नारायण: सरसिजासनसन्निविष्ट: । केयूरवान् मकरकुण्डलवान किरीटी । हारी हिरण्यमय वपुर्धृतशड्‍खचक्र: ।
ॐ मित्राय नम:
ॐ रवये नम:
ॐ सुर्याय नम:
ॐ भानवे नम:
ॐ खगाय नम:
ॐ पूष्णे नम:
ॐ हिरण्यगर्भाय नम:
ॐ मरिचीये नम :
ॐ आदित्याय नम:
ॐ सवित्रे नम:
ॐ अर्काय नम:
ॐ भास्कराय नम:

मित्ररविसूर्यभानुखगपुष्णहिरण्यगर्भमरीच्यादित्यसवित्र अर्कभास्करेभ्यो नमो नम: ॥

नमस्कार घालुन झाल्यावर खालील श्र्लोक म्हणुन मग
तीर्थ प्राशन करावे .

आदित्यस्य नमस्कारन् ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मांतरसहस्त्रेषु दारिद्र्यं नोपजायते ॥१॥
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् ।
सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ॥२॥

नित्योपसना संस्कार* 🌹

शुभं करोति

शुंभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते ।
दिव्या दिव्या दिपोत्कार कानी कुंडले मोतीहार
दिव्याला देखून नमस्कार ॥१॥
ये गे लक्ष्मी बैस गे बाजे , आमुचे घर तुला सारे ।
तिळाचे तेल , कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हरात ।
दिवा लावला देवांपाशी , उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार गोपाळकृष्णापाशी ॥२॥
दीपज्योति: परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापं
संध्यादीप नमोऽस्तु ते ॥३॥
अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति ।
इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणां च पराभवम् ।
मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: ।
अग्रत: शिवरुपाय अश्‍वत्थाय नमो नम: ॥४॥

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

नित्योपसना संस्कार* 🌹

झोपताना करावयाचे स्मरण

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम: ॥
करचरणकृतं वाक‍कायजं कर्मजं वा ।
श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम् ॥
त्वमेव माता च पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्र्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

नित्योपसना संस्कार* 🌹

मोरोपंताची आर्या

सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो ।
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो ।
सदंघ्रिकमळी दडो मुरडिता हटाने अडो ।
वियोग घडता रडो मन भवच्चरित्री जडो ॥१॥
न निश्‍चय कधी ढळो कुजनविघ्नबाधा टळो ।
न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो ।
स्वतत्त्व हृदयां कळो दुरभिमान सारा गळो ।
पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो ॥२॥

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

नित्योपसना संस्कार 🌹

इतर श्लोक

श्रीराम प्रार्थना

पावन भिक्षा दे रामा । दीनद्‍याळा दे रामा ।
अभेदभक्ति दे रामा । अर्थारोहण दे रामा ।
तद्रुपता मज दे रामा । आत्मनिवेदन दे रामा ।
सज्जनसंगति दे रामा । अलिप्तपण मज दे रामा ।
ब्रह्मानुभव मज दे रामा । अनन्य सेवा दे रामा ।
कोमल वाचा दे रामा । विमल करणी दे रामा ।
प्रसंगवोळखी दे रामा । धूर्तकळा मज दे रामा ।
अंतरपारख दे रामा । बहुजनमैत्री दे रामा ।
विद्यावैभव दे रामा । उदासीनता दे रामा ।
मागो नेणे दे रामा । मज न कळे ते दे रामा ।
सावधपणा मज दे रामा । बहु पाठांतर दे रामा ।
दास म्हणे रे गुणधामा । उत्तमगुण मज दे रामा ।

ॐ असतो मा सद्‍गमय । तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्यो र्मा अमृतं गमय । अभयमस्तु । सिद्धिरस्तु । स्वानुभूतिरस्तु ॥

ॐ पश्‍येम शरद: शतम् ॥ जीवेम शरद: शतम् ॥
प्रब्रवाम शरद: शतम् ॥ आदीना: स्याम शरद: शतम: ॥
भूयश्‍च शरद: शतात् ॥
बुद्धेम शरद:शतम् । रोहेम शरद:शतम् ।
भूयसी: शरद:शतम।
नन्दाम शरद: शतम् । मोदाम शरद: शतम् ।
भवाम शरद: शतम् । अजिता: स्याम शरद: शतम् ॥

उठा उठा सकळिक , वाचे स्मरावा गजमुख ।
ऋद्धिसिद्धिचा नायक , सुखदायक भक्तांसी ॥१॥
अंगी शेंदुराची उटी , माथा शोभतसे किरीटी ।
केशर कस्तुरी लल्लाटी, कंठी हार साजिरा ॥२॥
कानी कुंडलाची प्रभा , चंद्रसूर्य जैसे नभा ।
माजी नागबंदी शोभा , स्मरता उभा जवळी तो ॥३॥
कांसे पिंताबराची घटी, हाती मोदकाचि वाटी ।

रामानंद स्मरता कंठी, तो संकटी पावतो ॥४॥

श्री रामाची प्रार्थना


कल्याण करी रामराया । जनहित विवरी ॥धृ॥
तळमळ तळमळ होताचि आहे । हे जन हाति धरी ॥१॥
अपराधी जन चुकतचि गेले । तुझ्या तूचि सावरी ॥२॥
कठीण त्यावारि कठिण आले । आतां न दिसे उरी ॥३॥
कोठे जावे काय करावे । आरंभिली बाहेरी ॥४॥
दास म्हणे आम्ही केले पावलो । दयेसि नाही सरी ॥५॥

श्र्लोक

शुकासरिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।
वशिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे ॥
कवी वाल्मिकासारिख मान्य ऎसा ।
नमस्कार माझा सद्‍गुरु रामदासा ॥
जय जय रघुवीर समर्थ ॥
सद्‍गुरु समर्थ रामदासस्वामी महाराजकी जय ।
महारुद्र हनुमानकी जय ।

जय जय रघुवीर समर्थ ॥

उपदेश

बरे सत्य बोला । यशातथ्य चाला ।
बहू मानिती लोक येणे तुम्हाला ॥
धरा बुद्धी पोटी विवेकें तुम्ही हो ।
बरा गुण तो अंतरामाजि राहो ॥१॥
सदा दात घासोनि तोंडा धुवावे ।
कळाहीन घाणेरडे वा नसावे ॥
सदा सर्वदा यन्त सांडु नये रे ।
बहुसाल हा खेळ कामा नये रे ॥२॥
दिसामाजि काही तरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ॥
गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांना करावे ।
बरे बोलणे सत्य जीवी धरावे ॥३॥
बहू खेळ खोटा सदालस्य खोटा ।
समस्तांसि भांडेल तोची करंटा ॥
बहुतां जनालागि जीवी धरावे ।
भल्या संगती न्याय तेथे बसावे ॥४॥
हिशेबी सदा न्याय सांडू नये रे ।
कदाचित अन्याय होता ढका रे ॥
जनी सांडीता न्याय रे दु:ख होते ।
महासौख्य तेही अमस्मात जाते ॥५॥
प्रचीतीविणे बोलणे व्यर्थ वाया ।
विवेकेविणे सर्वहि दंभ जाया ॥
बहू सज्जला नेटका साज केला ।
विचारेविण सर्वही व्यर्थ गेला ॥६॥
वरी चागंला अंतरी गोड नाही ।
तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही ॥
वरी चांगला अंतरी गोड आहे ।
तयालागी कोणीतरी शोधिताहे ॥७॥
सदा अंतरी गोड ते सांडवेना ।
कदा अंतरी ओखटे देखवेना ॥
म्हणुनी भला गूण आधी धरावा ।
महाघोर संसार हा नीरसावा ॥८॥
भला रे भला बोलती ते करावे ।
बहुतां जनांचे मुखे येश घ्यावे ॥
परी शेवटी सर्व सोडुनि द्यावे ।
मरावे परी कीर्ति रुपेउरावे ॥९॥
बरा बोरवटा सर्व संसार झाला ।
अकस्मात येईल रे काळ घाला ॥
म्हणॊनि भले संगती सत्य चाला ।
जनी दास हा बोधिताहे मुलांना ॥१०॥

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *