बायको कशी असावी ! वाल्या कोळ्यांच्या बायको सारखी!

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🦜 बायको कशी असावी? 🦜
!वाल्या कोळ्यांच्या बायको सारखी!


वरील नांवाची एक पोस्ट सद्या फेसबुक व व्हाट्स एपवर खुप फिरत आहे.

ज्यांना बायको वाल्या कोळ्याच्या बायको सारखी असावी असे वाटते त्यांची इच्छा प्रभुरामचंद्र पुर्ण करोत ही प्रभु चरणी प्रार्थना!

जी वाल्याची बायको सारे आयुष्यभर नव-याने माणसे मारुन पाप करुन धन जमा करुन आणुन दिले त्या धनाच्या जीवावर आयुष्यभर मजा केली. आयते बसुन खाल्ले अन् पापाचे फळ दु:ख भोगायची वेळ आल्या बरोबर नव-याला म्हणते मी वाटेकरी नाही. तुमचे तुम्ही भोगा.

दुसरीकडे राजा जनकाची मुलगी एक राजकन्या सीता नविन लग्न राजा दशरथाचे घरी त्यांची सुन व प्रभु रामचंद्रांची पत्नी होऊन अयोध्येत सासरी आली. नव नवतीचे नवु दिवसही फिटले नाहीत तर लगेच

नव-याला श्री रामाला १४ वर्षाचा वनवास आला. तेव्हा ती म्हणाली, मी श्री रामा सोबत वनवासात जाईल.जेथे राम तेथेच सीता.

सीतेला वनवास नव्हता.फक्त श्रीरामाला वनवास होता.पतीच्या सुख दु:खात सोबत रहाण्याची शपथ घेतलेली सीता वनवास भोगण्यासाठी पती सोबत वनवासात गेली.वाल्याच्या बायको सारखं म्हणाली नाही ,

” तुम्हांला एकट्याला वनवास आलाय , त्याचा माझा काहीही संबंध नाही . मी येथेच रहाते. तुमचा वनवास तुम्ही एकटेच भोगा.!!

सीता मातेला उगीच श्रेष्ठ म्हणत नाहीत!
ठरवा बायको कशी असावी? सुख दु:खात साथ देणारी माता सीतादेवी सारखी किंवा सुखात सोबत रहाणारी आणि दु:खात नव-याला सोडुन जाणारी वाल्याच्या बायको सारखी !!

जय जय जय श्रीराम

माऊली शिष्य – हंसराज महाराज मिसाळ याज कडुन सविनय 👏

हंसराज महाराज मिसाळ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *