भाग २ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🔸गोसावी-बैरागी. भाग 2🔸
———————————————
🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
———————————————

वैशिष्टे १ :
गोसाव्यांचे एक लहानसे स्वतंत्र राज्यच होते
त्यांना समाजात फार मान होता
पौरोहित्य, भविष्यकथन व औषधोपचार करतात
बहुतांश गृहस्थ होते
‘दशनामी’ वा ‘दसनामी’ गोसाव्यांची परंपरा
गोसाव्यांतील ‘घरबारी’ वा ‘गहनबारी’ ह्या भेदाचा अर्थ
वैदिक धर्मप्रसारासाठी गोसाव्यांनी अपार परिश्रम घेतले

वैशिष्टे २ :
गोसाव्यांत प्रामुख्याने शैव आणि वैष्णव असे दोन भेद आहेत
गोसाव्यांना त्या काळी यज्ञ करण्याचा अधिकार होता,
गुरुपुजा हे वैष्णवपंथीय गोसाव्यांचे वैशिष्ट्य होय.
गोसाव्यांनी बंगालमध्ये गौडीय वैष्णव संप्रदाय स्थापिला.
गोसाव्यांची शूर व क्रूर म्हणूनही ख्याती आहे.

वैशिष्टे ३ :
हे राजे गोसावीच होते.
गोसावी व राजपूत यांच्यातील गुरुशिष्यसंबंध आजतागायतही आढळून येतो.
औरंगजेबाने केलेल्या अन्यायांमुळे गोसावी जिवावर उदार होऊन त्याच्याशी लढले.
पूर्वी काही गोसावी मुलांना पळवून नेण्याचे तसेच अन्य क्रूर कर्मे व दुराचार करीत.
प्राचीन काळापासून गोसावी मंत्र, तंत्र, औषधी, चमत्कार इ. गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत.

‘दशनामी’ वा ‘दसनामी’ गोसाव्यांची परंपरा
ह्या दहा उपनामांवरून पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी यांनी ‘दशनामी’ वा ‘दसनामी’ गोसाव्यांची परंपरा वेदकाळापर्यंत नेऊन पोहोचविली आहे व त्यांची गोत्रप्रवरादी माहितीही दिली आहे. गोसाव्यांतील ‘घरबारी’ वा ‘गहनबारी’ ह्या भेदाचा अर्थ ते ‘यज्ञ करणारा गृहस्थ असा देतात आणि गोसाव्यांना त्या काळी यज्ञ करण्याचा अधिकार होता, असे मत मांडतात. ही दहा उपनावे शंकराचार्यांपूर्वीपासून रूढ आहेत. वैदिक धर्मप्रसारासाठी गोसाव्यांनी अपार परिश्रम घेतले.*

गोसाव्यांत शैव आणि वैष्णव दोन भेद
*गोसाव्यांत प्रामुख्याने शैव आणि वैष्णव असे दोन भेद आहेत. शंकरदेवांचे अनुयायी माधवगिरी, ब्रह्मगिरी, गोविंदगिरी आणि कुसुमगिरी ह्या गोसाव्यांनी आसामात ‘महापुरुषिया’ नावाची एक वैष्णव संप्रदाय शाखा स्थापन केली आणि चैतन्याच्या गुरुपरंपरेतील माधवेंद्रपुरी, ईश्वरपुरी ह्या गोसाव्यांनी बंगालमध्ये गौडीय वैष्णव संप्रदाय स्थापिला.

गुरुपुजा हे वैष्णवपंथीय गोसाव्यांचे वैशिष्ट्य होय.
दसनामी गोसावी हे शैवपंथी असून त्यांत मठधारी व घरबारी असे दोन भेद आहेत. मठधारी गोसाव्यांची बरीच संख्या काशी व हरद्वार येथे आहे. गृहस्थ गोसावी व्यापार, शेती वगैरे व्यवसाय करतात. त्यांतील काही फार सधन आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये वैष्णव गोसावी संख्येने अधिक आहेत. गुरुपुजा हे वैष्णवपंथीय गोसाव्यांचे वैशिष्ट्य होय.*

गोसाव्यांची शूर व क्रूर म्हणूनही ख्याती आहे.
*गोसाव्यांची शूर व क्रूर म्हणूनही ख्याती आहे. मौर्य काळात त्यांची लहानलहान राज्ये होती. काश्मीरच्या राजाच्या पदरीही अनेक गोसावी होते असे राजतरंगिणीत म्हटले आहे. इ.स. ३०० च्या सुमारास पंजाबात व बुंदेलखंडात परिव्राजक ब्राह्मण राजांचे राज्य असल्याचा उल्लेख आढळतो. हे राजे गोसावीच होते. बाप्पा रावळ हा गुहिलवंशीय राजाही शैवयती होता आणि तो हरितमुनी नावाच्या गोसाव्याचा शिष्य होता.

गोसावी व गुरुशिष्यसंबंध आजतागायतही आढळून येतो.
गोसावी व राजपूत यांच्यातील गुरुशिष्यसंबंध आजतागायतही आढळून येतो. एकलिंगजीचे पुजारी गोसावीच आहेत. अनेक राजपूत व मराठा राजे-सरदारांच्या सैन्यात गोसाव्यांचा भरणा बराच होता. औरंगजेबाने केलेल्या अन्यायांमुळे गोसावी जिवावर उदार होऊन त्याच्याशी लढले. गोसावी शब्दाने सुरुवात होणारी अनेक गावांची नावेही आढळतात. उदा., गोसाईपूर, गोसाईगंज इत्यादी. या सर्व बाबींवरून क्षात्रवृत्ती असलेल्या गोसाव्यांची एक परंपरा असल्याचे दिसून येते.

गोसावी आला व तो पकडून नेईल
खेड्यात लहान मुलांना ‘गोसावी आला व तो पकडून नेईल’ अशी पालक भीती घालतात. पूर्वी काही गोसावी मुलांना पळवून नेण्याचे तसेच अन्य क्रूर कर्मे व दुराचार करीत अशीच माहिती मिळते. प्राचीन काळापासून गोसावी मंत्र, तंत्र, औषधी, चमत्कार इ. गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत.*

गोसावी संन्याशी बैरागी सर्वमाहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *