गुप्त नवरात्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

गुप्त नवरात्र*

चार नवरात्री प्रामुख्याने मानल्या जातात. सर्व नवरात्रीत देवी प्रमुख देवता असते.

१. शारदीय नवरात्र

शरद ऋतूत येते म्हणून शारदीय नवरात्र. शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते.हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे.

दुर्गापूजा

बंगाल आणि त्याच्या आसपासच्या राज्यांत साजरे होणारे हे सहा दिवसांचे नवरात्र असते. ललिता पंचमीच्या दुसर्या दिवसापासून, म्हणजे षष्ठीपासून ते दसर्यापर्यंत हा उत्सव चालतो. महाअष्टमी(दुर्गाष्टमी)ला बकर्याचा आणि महानवमीला रेड्याचा बळी दिला जातो.
बिहारमध्ये सप्तमीपासून नवरात्र सुरू होते.
रामाने दुर्गेची आराधना ९ दिवस केली आणि रावणावर विजय मिळवला

२. वासंतिक नवरात्र

वसंत ऋतूत येणारे नवरात्र . चैत्र शु १ ते शु ९ पर्यंत येते.
सुदर्शन राजाने हे नवरात्रीचे व्रत केले आणि देवीने त्याला कौशल राज्य दिले . ह्याच्याच वंशात रामाचा जन्म झाला.
सुदर्शन
अग्निवर्ण
शीघ्रग
मरू
प्रशुश्रुवा
अंबरीश
नहुष
ययाती
नाभाग
अजा
दशरथ
राम
अशी वंशावळ आहे. त्यावरून वासंतिक नवरात्रीचे पौराणिकत्व कळेल. नवमीला रामजन्म झाला.

३. शाकंभरीचे नवरात्र

हे माघ शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असते. तांत्रिक लोकांमध्ये सिद्धिप्राप्तीसाठी हे नवरात्र साजरे करण्याची प्रथा आहे. शाकंभरी देवी बरोबर सरस्वती पूजन तर काही प्रदेशात कामदेवाचे पूजन होते. मकर संक्रांती नंतर येणारे नवरात्र उत्तरायणाचा सुरुवात शिशिर ऋतूत येते .

४ गुप्त नवरात्र अथवा वराही नवरात्र

आषाढ शु १ ते शु ९ पर्यंत . जून जुलै मध्ये येते व कर्क संक्रांती च्या जवळ येणारे नवरात्र . दक्षिणायनाची सुरवात. याला विठोबाचे नवरात्रही मानले जाते . याला गुप्त नवरात्र म्हणतात कारण तंत्र , जादूटोणा अशा विद्येचे अध्ययन व पुरश्चरण केले जाते. वाराही देवतेचे पूजन होते. सप्त मातृकांत या देवीची गणना होते. शुंभ निशुंभ वध केल्यावर सप्त मातृका त्यांचे रक्त पिऊन बेभानपणे नाचत होत्या अशी आख्यायिका आहे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *