पंढरीचे भूत मोठे हंसराज म. मिसाळ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पंढरीचे भूत मोठे

 संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग रूपकात्मक आहे. रुपक हे परमात्मा पांडुरंगावर केलेले आहे. 

 रुपकात दोन पदार्थ असतात १) रुपक ज्याचं असतं तो एक पदार्थ २) रुपक ज्याच्यावर केले जाते तो एक पदार्थ. जो पदार्थ अति परिचयाचा असतो त्याचे रुपक आपण करतो. 

एक पदार्थ भूत हा आपणास ऐकुन कां असेना माहीत माहीती आहे त्या पदार्थावरुन त्या सदृश्य असलेला पदार्थ म्हणजे परमात्मा पांडुरंग नांवाचा पदार्थ जाणवून देण्यासाठी ही रुपकाची भाषा असते. 

यात एक गंमत आहे परमात्म्याच्या ठिकाणी रुपक करून शिक्षण
वेगवेगळ्या रुपकातुन परमात्म्याचं ज्ञान करुन देणं हे महत्वाचं असतं. ते संत करतात.

वस्तुतः देव वेगळा आणि भूत वेगळे. ज्याचं नांव घतले तर भुत जवळ येत नाही. त्यालाच येथे भूत म्हणायचे म्हणजे नवलचं नाही कां! 

 असो. जगात भूत आहे किंवा नाही याचा अगोदर विचार करायला हवा. 

      १)  भूत नाहीच त्याचा बाऊ करु नये .असं म्हणणारे लोक आहेत 
      २) आपल्या शास्त्रात मान्य  केले आहे म्हणून भूत मानणारे ही लोकं आहेत.

कोणी माना या न माना पण शास्त्रात भूत योनी स्वतंत्र योनी दिलेली आहे.

  गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 

 १) ' देवाचं यजन करणारा देव होतो.
  २) पितरांचे यजन करणारा पितरस्वरुपाला प्राप्त होतो.
  ३) परमात्म्याचे यजन करणारा परमात्मा स्वरुपाला प्राप्त होतो.
  ४) आणि भूतांचे यजन करणारा भूत होतो.
 म्हणजे गीता शास्त्राने भूत योनी मानली आहे. 
  असं म्हणतात आयुर्वेदात ही भूत योनी वेगळ्या पद्धतीने मानली आहे.

मानवाच्या शरीरात काही विकृती निर्माण झाली की, त्यांच्या मनात उन्मत्तपणा अर्थात उन्माद निर्माण होतो , तो सात प्रकारचा असुन सातवा उन्माद भूतोन्माद सांगितला आहे. म्हणजे मनुष्याच्या शरीरात भूत प्रेताच्या योनीचा प्रवेश झाला की, तो असंबद्ध बरळु लागतो.त्याला भुतोन्माद म्हणतात.

  समान योनीच्या शरीरात कोणालाच प्रवेश करता येत नाही.

 भौतिक शरीर भौतिक शरीरात प्रवेश करु शकत नाही.म्हणजेच मनुष्याला मनुष्याच्या शरीरात प्रवेश करता येत नाही.  पण वासनामय शरीर , इच्छामय शरीर कुठे ही संचार करण्यास समर्थ असते. 

  देव शरीर इच्छामय असते व भूत शरीर वासनामय असते म्हणुन त्यांना कोणत्याही शरीरात प्रवेश करता येतो.

उदा. श्रीरामांना राज्यअभिषेक होवु नये व ते वनवासात जावेत म्हणुनच देवी सरस्वती देवांच्या आज्ञेनुसार मंथरेत प्रवेश करुन तिच्या जिभेवर बसली होती.

   कुंभकर्णाने ब्रह्मदेवाकडे विशेष काही मागु नये म्हणूनहि सरस्वती त्याच्या जिभेवर बसली होती. 

 त्याच प्रमाणे आपली वासनामय इच्छा पुर्ण करुन घेण्यासाठी भूत कोणाच्याही शरीरात प्रवेश करते व इच्छा पुर्तीसाठी त्रास देते . नवनाथ , गुरुचरित्र ग्रंथ वाचल्यानंतर हे लक्षात येते. 

  एकंदरीत भूत हा विषय बुद्धीच्या पलीकडील विषय आहे .  कदाचित भूत योनी नसेलही  पण आपण शास्त्र मानतो. शास्त्रा प्रमाणे आपणही मानावे लागेल.

“तस्मात् शास्त्र प्रमाणांते”

 हरिपाठा मध्ये माऊली म्हणतात , 

“पळे भूत बाधा भेणे तेथे.”/

 आहे म्हणून पळे ना !? 

कि नाही म्हणून पळे!
म्हणजेच भूत आहेच.

   भुताचा संचार झाला किंवा झपाटले हे कसे ओळखावे. 

१) सामान्य माणसाला न दिसणारं ज्ञान दिसतं त्या माणसाला भूताचा संचार झाला असं म्हणावं.
२) सामान्य माणसाला न दिसणारं विशेष ज्ञान दिसतं त्याला भूतांचा संचार झाला असं म्हणावं.
३) सामान्य माणसाला जे बोलता येत नाही ते जर तो बोलु लागला तर भूत संचार झाला असं म्हणावं.
४) सामान्य माणसाला जे करता येत नाही ते जर करु लागला तर संचार झाला असं म्हणतात.
५) सामान्य माणसाला जे बल असतं नाही ते अंगात दिसु लागलं तर संचार समजावां.
६) मनुष्याच्या ठिकाणी नसणारा पराक्रम दिसु लागला तर संचार समजावां.

ज्या प्रमाणे भूताने झपाटल्या नंतर वर लक्षणाने ओळखावा त्याच प्रमाणे परमात्मा पांडुरंगाने साधुला – संताला – भक्ताला झपाटले हे कसे ओळखावे.

१) साधु, संताला विलक्षण ज्ञान होतं.
२) साधु संताला विलक्षण विशेष ज्ञान होते.
३) साधु पुरुषाची वाणी विलक्षण होते.
४) साधु संतांचे वागणे अन्या पेक्षा वेगळे विलक्षण असते.
५) साधु संताला बळ विलक्षण असते.
६) साधु, संतांचा पराक्रम विशेष विलक्षण असतो.

ज्यांना पांडुरंग प्रसन्न झाला, ज्याला पांडुरंगाने आपले केले, जवळ केले, झोडपले की तो असामान्य होतो. 

असा तो - ते भूत पंढरीचे आहे. ते खुप मोठे आहे. सामान्य भूत व हे भूत यात जमिन अस्मानाचा फरक आहे. त्याचे कोणी नादी लागले, त्याच्या वाटेला कोणी गेला तो त्याला सोडीत नाही. झडपीतो. 

तुकोबाराय म्हणतात,
पंढरीचे भूत मोठे / आल्या गल्या झडपी वाटे /१/ तेथे जाऊ नका कोणी / गेले आले नाही परतोनी//२//

     थोडक्यात जे संसारातील लोक परमात्मा पांडुरंगाकडे गेले त्यांना तो पुन्हा संसारात परत येऊ देत नाही. म्हणुन त्यांना संसारच करायचा आहे त्याने चुकूनही त्याच्या कडे जाऊ नका

आणि ज्यांना परमात्म्याच आपला करायचा आहे त्यांनी त्याच्या कडे गेल्या शिवाय राहु नये.

  तुकोबाराय म्हणतात, मी पंढरपूरला गेलो तो पुन्हा जन्म मरण रुप संसारात आलोच नाही. या तुम्ही ही माझ्या मागे या! 

असंच असेल कां? नाही. बिल्कुल नाही. चुक भुल बरोबर करुन घ्या.

जय हरि,

माऊली शिष्य हंसराज महाराज मिसाळ याज कडुन सविनय👏

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *