संत चोखामेळा म. चरित्र ३८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग- ३८.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबा कळवळुन नामदेवांना विनवित होते.देवा!मी अडाणी,अजान या शिष्याची आस,हट्ट म्हणा हवं तर,पण पूर्ण कराच.तुम्हीच हाताला धरुन या जीवनमार्गावर आणले.आतां शेवटच्या मुक्कामापर्यंत तुम्हीच पोहचवा.त्यांची अवस्था पाहुन नामदेवांचे मन भरुन आले.अस्वस्थ मनाने नामदेव घरी परतले मन मोकळे केल्याने चोखोबांना हलके हलके वाटले.विठ्ठलनामस्मरणांत ते इतके तल्लीन झाले की,मध्यरात्र झाली तेव्हा भानावर आले.बाहेर येऊन दीपमाळेवरील पणत्या पेटवल्या.हा त्यांचा रोजचाच परिपाठ झाला होता. लोकं स्वतःहुन तेल आणु लागले.रोजच चंद्रभागेचा काठ उजळायला लागला. चोखोबाच्या दीपमाळेचे कौतुक सर्वीकडे होऊ लागले.

आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली या विचारांकडे चोखोबांचा कल झुकु लागला.विठ्ठलाचे स्मरण,पुजा, अभंगरचना,भल्या पहाटे दीपमाळ लावणे हेच जीवनाचे उद्दीष्ट राहिले होते. मात्र त्यांच्या एकांतवासात नामदेवांच्या सांगण्यावरुन व चोखोबांचा भोळा भाबडा,प्रांजल स्वभाव, उत्कट विठ्ठल भक्ती,अभंगरचनेतील त्यांचे सातत्य, शब्दांचे सौंदर्य आणि सामर्थ्य हे सर्व पाहुन अनंत भट सुरुवातीपासुन सावली सारखे त्यांच्या सोबत असे.त्याला संकोची लाजरेबुजरे,भावगर्भ अभंग रचना करणार्‍या चोखोबांचे नेहमीच कौतुक वाटत असे.म्हणुनच त्यांनी एक कौतुक करायचे ठरवले. विठ्ठलमंदिरासमोर राहत असलेल्या घराच्या पडवीत नामदेव परिवारासह बसले होते.रजाई,गोणाई,मुलबाळं आणि जनाई सुध्दा.एवढ्यात अनंतभट भेटीला आलेले पाहुन त्यांना आश्चर्य वाटले.कांही अंतरावर  संकोचुन चोखोबा उभे असलेले पाहुन त्यांना जवळ बोलावले व मिठीत घेतले.अलभ्य लाभ! काय विशेष

अनंतभटांनी काखेत धरलेली चोपडी नामदेवांसमोर धरुन म्हणाले,देवा! ही चोपडी म्हणजे विठ्ठलकृपेचा सगुन अविष्कार,भक्तीचा महिमा किती अगाध आहे याचा हा पुरावा.. नामदेवांच्या कांहीच लक्षात येईना.काय आहे हे?देवा! ही चोपडी म्हणजे चोखोबांनी रचलेले अभंग आहेत.त्यांच्या तोंडुन उमटलेला प्रत्येक शब्द यात उतरवुन घेतला आहे. माझ्या अल्पमतीने थोडीफार दुरुस्तीही केली आहे.चोखोबांच्या उत्स्फुर्त प्रतिभेचा अविष्कार ती चोपडी नामदेवां च्या हाती दिली.नामदेवांच्या चेहर्‍यावर एक वेगळीच अनुभुती,कांहीतरी अद्भुत बघत असल्याचे भाव उमटले.अतिशय आदराने चोपडीतील एक एक पान उलगडुन बघतांना त्यांच्या चेहर्‍यावरुन आपल्या शिष्याबद्दलचा अभिमान ओसंडुन वाहुं लागला.वाss अनंतभट वा अतिशय अप्रतिम कामगिरी केलीत. वारकरी संप्रदाय व इतिहास नेहमीच तुमचा ऋणी राहिल.चोखोबांच्या उच्चाराला,विचाराला,वाणीला,भावनेला व भक्तिला अस्तित्व दिलेत.तुमचे हे कार्य युगानुयुगे स्मरणांत राहील आणि चोखोबासुध्दा चिरंतर स्मरणांत राहिल. मनुष्यप्राणी नश्वर,अशाश्वत आहे,पण किर्ती मात्र कायम असते.नामदेवांकडुन अशी शाबासकीची पावती मिळाल्यावर अनंतभटांना केलेल्या कामाचे सार्थक, चीज झालेसे वाटले.एवढ्यात आंतुन जेवण तयार असल्याचा निरोप आला. अतिशय संकोचाने चोखोबा नामदेवांच्या पंगतीला बसले.

चोखोबांच्या निरवानिरवीच्या भाषेने विठोबा अस्वस्थ झाला.चोखोबां च्या मृत्युची कल्पनाच त्याला सहन होत नव्हती.चोखोबा चिरंतर लोकांच्या स्मरणात रहावा,नांव किर्ती,अस्तित्व अजरामर व्हावे,यासाठी काय योजना करावी याचा विठोबा विचार करु लागला नामदेवांकडे मिष्टांन्नाचे जेवण झाले त्यांनी केलेल्या कौतुकाने आपले जीवन सार्थकी लागले ही भावना घेऊन चोखोबा घरी परतले.डोळे पैलतीरी लागलेल्या या भागवद्भक्ताला आणखी काय हवे होते?आजपर्यंत आपल्याला अस्पृश्य जातीत जन्माला घातले म्हणुन तक्रार करणार्‍या चोखोबांची उतारवयात धारणा बदलली.आपण या जातीत जन्मल्यामुळे आपल्या उत्कट भक्तीला, अभंगरचनेला,नामस्मरणाला लोक विलक्षणतेची अलौकिक परमार्थाची, अपुर्व भक्तीची व कालातीत अभंगभक्ती ची जी डूब मिळाली ती कदाचित ती उच्च वर्ण जातीत जन्मलो असतो तर लाभली नसती.म्हणुनच या अस्पृश्य जातीत जन्माल घातल्याबद्दल त्याचे उपकारच आहे.यामुळेच हा चोखामहार युगायुगात शाश्वत अमर झाले. येसकर म्हणजे वेसकर.गावा बाहेरील वेस,वेशीवरचे बुरुज,तटबंदी, तटबंदीतील,चोरदरवाजे,वेशीचे पक्के बांधकाम व त्यातील टेहाळणीचे भोके हे सगळे बांधकाम करण्यांत येसकर जमातीचा हातखंडा होता.बांधलेली दीप माळ ही त्याची साक्ष होती.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *