संत नामदेव महाराज चरित्र प्रकरण १ भाग १, २, ३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

*🌼#संत_शिरोमणी॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ🌼🚩॥*

*🍃प्रकरण-१.जन्म, 🍃भाग-१ 🍃**☘️भाग-१ परिचय☘️*

      आर्यावतामध्ये जंबुव्दीप आहे. या जंबुव्दीपामध्येच भारतवर्ष त्यालाच आपण आता भारत देश असे म्हणतो. आर्यावर्त, जंबुव्दीप असा उल्लेख आपल्याला पुराणात सापडतो. पुराणकालीन भुमीखंडाची फार वेगळी रचना होती. तेव्हा संस्कृत भाषा प्रचलित असल्यामुळे भुमीखंडांना नावेही संस्कृतमध्येच दिल्या गेली. ती नावेही फार अर्थपूर्ण आहेत. त्या त्या खंडाच्या वैशिष्ट्यानुसार नामकरण केलेले दिसून येते.



       तर अशा या भारतवर्षामध्ये म्हणजेच भारत देशामध्ये आपले महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्राची महिमा संतसहवासामुळे आणखीच वाढली. जेवढे सिद्ध, आत्मज्ञानी, विद्वान, सर्वज्ञ संत महाराष्ट्रात जन्माला आले तेवढे दुसरीकडे नाहीत. जेवढे संतसाहित्य महाराष्ट्रात उपलब्ध आहे तेवढे कुठेच नाही. महाराष्ट्रातील लोकांचे परमभाग्य आहे. अशा या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होवून गेले. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत कान्हो पाठक, संत जनाबाई, संत गोरोबा, संत सेनान्हावी, संत कान्होपात्रा, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत निळोबा इत्यादी या सर्वांचे वैशिष्ट्य एकच. या सर्वांनी विठुरायाचीच भक्ती केली. या विठुरायाच्या परमभक्तीनेच जात पातीच्या भिंती भेदुन या सर्वांना एका सुत्रात गुंफले. जवळ ज्ञान मात्र सारखेच आहे. जवळ जवळ सर्वानीच अभंगरचना केलेली आहे. सर्वजन एकच विचार आपल्या रचनेमधून व्यक्त करतात. शब्द बदललेले असतील परंतु ज्ञान माञ सारखेच आहे.



      सर्व ब्रम्हांडामध्ये एकच ईश्वर व्यापुन उरलेला आहे. हे सर्व दृश्यमान विश्व एकाच ईश्वरापासून बनलेले आहे. “विष्णुमय जल वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।” ज्यांनी बालपणीच विठुरायाला आपल्या शुद्ध, पवित्र हृदयात भक्तीने अंकित केले, असे संत नामदेव महाराज, जे संत ज्ञानेश्वरादी भावंडाना समकालीन होते तेच आपले चरित्रनायक,

#क्रमश…..
|#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

संत नामदेव महाराज समाधी अभंग पहा

*🌼#संत_शिरोमणी॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼🚩*

*🍃#प्रकरण-१.जन्म, 🍃भाग-2#🍃* *☘️भाग २ परिचय☘️*

या नामदेव महाराजांचे पुर्वज नरसी बामणी जि. परभणी येथील होते. नामदेव महाराजांचे वडील कधीतरी नंतर पंढरपुरात रहावयास आले असावेत. भारव्दाज कुळी यदुशेठ रेळेकर हे मुळपुरूष होते. हे विठ्ठल भक्त होते. व्यवसायाने शिंपी होते. यांचा काळ सुमारे ई.स. ८०० ते ८५० च्या सुमारास असावा असे इतर कागदपत्रांवरून वाटते. यदुशेठांचे पुत्र हरिशेठ झाले. हेही विठ्ठलभक्त होते. हरिशेठ हे एकदा चंद्रभागेत स्नान करून विठुरायाच्या दर्शनाला गेले असता वृद्धापकाळामुळे मंदिरातच त्यांना देवाज्ञा झाली. घराण्यातील सर्वांचाच दरवर्षी आषाढी, कार्तिकीला पंढरपुरात जाण्याचा नेम होता.


      पुढे हरिशेठ त्यांचे गोपाळशेठ त्यांचे गोविंद शेठ त्यांचे छ नरहर शेठ त्यांचे दामोदर शेठ यांच्या पत्नीचे नांव गोणाई होते. वा गोणाई ह्या गाधीज कुळी, कल्याणी येथील गोमाशेठ व उमाबाई ह्यांच्या कन्या होत्या. दामोदर शेठींचा गोणाई बरोबर विवाह झाला. दामोदर शेठ व गोणाई हेच संत नामदेव महाराज यांचे आईवडील.

        या उभयतांना प्रथम कन्यारत्न प्राप्त झाले. नांव ठेवले आऊ ने बाई. पुढे अनेक वर्षे संतान नाही. दामाशेठ पत्नी गोणाईला घेऊन पंढरपुरात वास्तव्य करू लागले. गोणाईने विठुरायाला पुत्रप्राप्तीसाठी नवस केला. *’गोणाईने नवस केला।देवा पुत्र देई मला॥’* गोणाई ह्या महान पतिव्रता, सालस, गृहिणी होत्या. *’ऐसी पतिव्रता । जिची देवावरी सत्ता’.* गोणाईच्या सतीत्वाने विठ्ठल प्रसन्न झाले. *’शुद्ध देखोनिया भाव । पोटी आले नामदेव’.* *शुक्ती उकलीता प्रगटले बाळ | गर्भचिन्हे सकळ मावळली।।*


      संत साहित्याचे अभ्यासक भक्त साधूपुरुष यांची एक श्रद्धा आहे की नामदेव महाराज हे पुर्वजन्मीचे भक्त प्रल्हाद, भक्त अंगद आणि श्रेष्ठ भक्तराज उद्धव यांचा अवतार आहेत. पुत्रमुख पाहून दामोदर शेठजीना खूप आनंद झाला. आऊबाई सुद्धा आपल्या हे लहानभावाचा मोठ्या प्रेमाने, काळजीपुर्वक सांभाळ करू लागल्या. असे म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या उक्तीप्रमाणे बाळ जसजसा दिवसेंदिवस वाढू लागला त्यांच्या ईश्वराविषयी ओढ दिसू लागली. शके ११९२, प्रमोदनाम संवत्सरे, कार्तिक शुद्ध एकादशी घटी २२, पळ १४ सुर्यास्तानंतर उत्तरभाद्रपदा नक्षत्र, तृतीय चरणावर नामदेवांचा जन्म झाला. इ.स. २६ ऑक्टोंबर १२७० रोहीणी तारा उदीत होता.


#क्रमश…..
|#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼*

*☘️#प्रकरण-१.जन्म,बालपण,विवाह,☘️**🍃भाग-३ नामदेवा हाती दूध प्याला🍃*

       वडीलांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ असा गजर केला की, नामदेवांनी छोट्या छोट्या पावलांनी आनंदाने टाळी वाजवून किर्तन करावे. वडील त्यांना मंदिरात घेऊन जात असत. दामोदरशेठजींचा विठुरायांना स्वहस्ते नैवद्य अर्पण करण्याचा नेम होता. हा नेम सहसा चुकत नसे. देवाला नैवद्य अर्पण मगच भोजन करावे असा परिपाठ होता, नामदेव महाराज हे सर्व पाहत होते. आपले वडील नेहमी विठुरायाला नैवेद्य अर्पण करतात म्हणजे त्या हाताने देव अन्न ग्रहण करत असावेत असा त्यांचा समज झाला.



      एकदा दामोदर शेठजींना काही काम निघाले म्हणून बाहेरगावी गेले. गोणाईने नामदेवा करवी नैवेद्य पाठवला. छोट्या नामदेवाने देवापुढे, विठुरायापुढे नैवेद्य ठेवला. नामदेव महाराज त्या पाषाणाच्या मुर्तीपुढे वारंवार विनवणी करू लागले. देव नैवेद्य ग्रहण कसे करतील ? परंतु यांचा ठाम विश्वास पुष्कळ वेळ झाला, नामदेव महाराज रडू लागले. छोट्या बाळाची निष्काम, शुद्ध भक्ती पाहून विठुरायाला गहिवर फुटला. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने आपला मुर्तीपणा सोडून देह धारण करून नामदेवाच्या हातचा नैवेद्य ग्रहण केला. छोट्या नामदेवाला खूप आनंद झाला. नामदेवांना ही साधारण बाब वाटत होती परंतु मोठ्या वडिलधारी व्यक्तींसाठी ही बाब अलौकीक घटना ठरली. नामदेव महाराज रिकामे ताट घेऊन घरी आले. गोणाईस मोठे नवल वाटले. गोणाईने सर्व वृत्तांत विचारला निरागसपणे बाळ नामदेवाने सर्व कालक्रम आईस सांगीतला. तिला मोठे नवल वाटले. पुढे नामदेवांच्या हातून रोजच शुद्ध नैवेद्य वितुराय ग्रहण करू लागले.



       बाळ नामदेवाचे मन, चित्त भक्तीरसाचे प्राशन करून तृप्त होवू लागले. ह्या भक्तीरसावरच नामदेव महाराज दिवसेंदिवस वाढू लागले. अकराव्या वर्षी दामोदरशेठांनी नामदेवांचा विवाह शेठ सदावर्ते ह्यांच्या राजाई नावांच्या कन्येशी करून दिला. दामोदरशेठ श्रीमंत होते. खाऊनपिऊन सुखी कुटूंब होते. पुढे नामदेव महाराजांना चार पुत्र व कन्या झाली. पुत्रांची नांवे नारायण, विठ्ठल, महादेव, गोविंद होते. कन्येचे नांव लिंबाई ठेवले. चंद्रभागेच्या वाळवंटात त्यांना अनाथ जनाबाई भेटल्या तिचे त्यांनी मुलीप्रमाणे पालनपोषण, वस्त्रदान केले. पुढे त्या अभंग रचना करू लागल्या.

#क्रमश…..
|#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

संत नामदेव महाराज समाधी अभंग पहा

संत नामदेव संपूर्ण, अभंग, चरित्र, समाधी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *