संत चोखामेळा म. चरित्र २८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग  –  २८.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबा महाद्वाराजवळ थांबल्या वर ती व्यक्ती त्यांना गाभार्‍यात चलण्या चा आग्रह करुं लागल्यावर चोखोबा तयार होईना,तेव्हा विठ्ठलानेच तुम्हाला भेटीस्तव आतं बोलावले असे म्हणुन त्यांचा हात धरुन गाभार्‍यात नेले.चोखा भान हरपुन देवाला मिठी मारली.ते उन्मानी अवस्थेत असतांना देव म्हणाले, झाली ना माझे दर्शन घेण्याची इच्छा पुर्ण मलाही तुला भेटायचे होते,चोखोबा!आतां घरी जा ..कुणी बघीतले तर..तुम्ही माझे लाडके भक्त म्हणुन हा माझ्या गळ्यातील रत्नहार तुम्हाला देतो.चोखां ना त्या हारापेक्षा देवाचे जवळुन दर्शन झाल्याचा जास्त आनंद झाला.पहाटे जाग आली तो स्वप्न आठवतच.अवधाना ने त्यांचा हात गळ्याकडे गेला पण तिथे हार नव्हता.तीर्थकलशातील हार देवानेच पाठवला या समजुतीने त्यांनी तो गळ्यात घातला आणि नामस्मरणांत स्वतःला झोकुन दिले.

आपलं अभिषेकाचं तीर्थ रोज चोखोबाच्या घरी पोहचनं हा आनंद होता पण भक्ताने केलेल्या भक्तीच फळ व पुण्य सहजी मिळु देईल तर तो देव कसला?कसोटीस उतरल्याशिवाय भक्ताचा कस लागत नाही म्हणुनच चोखोबांची सत्वपरीक्षा पाहण्याचे त्याने ठरविले.त्याची भक्ती किती पराकोटीची आहे?चांगल्या वाईट,अत्यंत वाईट, महा भयंकर परिस्थितीतही त्याची भक्तीवर निष्ठा कायम राहील का?हे एकदा देवाला बघायचे होते,म्हणुनच रत्नहार त्यांच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था केली.रात्री स्वप्न दाखवल्यावर चोखा रत्नहार गळ्यात घालेल याची खात्री होती.ही परीक्षा फक्त चोखोबाचीच नव्हती तर, त्यांच्या भक्तीच्या सखोलतेची,श्रध्देची, अढळ विश्वासाची व प्रत्यक्ष पांडुरंगाचीही होती.एकंदरीत ही कसोटी सगळ्या मांगल्याची सत्वपरीक्षा होती.

चोखोबांनी गळ्यात रत्नहार घातल्यावर आपण जणूं विठ्ठलाच्या अलिंगनात बध्द असल्याच्या विलक्षण अनुभुतीने ते नामस्मरणांत दंग झाले होते.विठ्ठलनामाची उर्जा नसांनसातुन वाहत होती.पंढरपूरात आल्यावरसुध्दा आपल्या चोख वागण्याने,प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणारा असा नावलौकी क मिळवला होता.सरकार दरबाराचे कितीही जोखमीचे काम असो,जिन्नस, गुपिते असो,कोणत्याही प्रलोभणाला बळी न पडतां,राजकर्त्याशी एकनिष्ठ, खाल्ल्या अन्नाला जागणारा असा नाव लौकिक चोखोबाने मिळवला होता.एक आगळी ओळख निर्माण केली होती. इकडे नामस्मरणांत दंग चोखोबा शांत होते आणि गावांत मात्र कोलाहल माजला होता.देवळात घडलेल्या घटनेची चर्चा केल्यानंतर,केशवभट,शंकरभट, गोविंदभट,नागेश बडवे,दहा बारा पुजारी असा शंभरएक लोकांचा समुदाय चोखां च्या दारासमोर पोहचला.त्यांच्या दारा बाहेर उभे राहुन शिव्यांची,अपशब्दांची लाखोली वाहत,भडीमार करत चोखाला बाहेर बोलावले.पण चोखोबा भान विसरुन नामस्मरणांत दंग!

बाहेर एवढा कशाचा गोधळ म्हणुन सोयराने डोकावुन बघीतले असतां,शंभर एक लोकं हातात लाठ्या काठ्या आणि शिविगाळ देत,ओरडत असलेला जमाव व बाहेरचा रागरंग पाहुन भितीने, व जिवाच्या आकंताने तिने मारलेली हाक नामस्मरणाचे अभेद्य कवच फोडुन चोखोबांच्या कानांवर आदळल्यावर ते निष्पाप भावनेने आले आणि जोहार घालुन येण्याचे प्रयोजन विचारले,पण  त्यांच्या गळ्यात रत्नहार दिसल्यावर, संतापाने बेभान झालेल्या जमावाने एकदम त्यांना दगड धोंडे,वाहणे,लाठ्या काठ्या ने मारायला सुरुवात केली.चोखां ना कळेना की हे लोक कशासाठी मारताहेत?कोण वाचवणार?विठ्ठला शिवाय होतच कोण?वेदनेने,दुःखाने पिचलेल्या आणि झालेल्या मारहानीने दुखावलेल्या आर्त स्वरांत त्यांनी टाहो फोडला.त्यांचा तो वेदनेने भरलेला टाहो सगळ्या पंढरपूरचंं काळीज चिरत गेला. देवाच्या पायाखालची वीटसुध्दा थरारली. आपल्या नवर्‍याला कां मारताहेत हे न कळुन त्यांचा मार चुकवण्याचा प्रयत्न करुं लागली,पण तिला ते शक्य होईना.मग मात्र आर्त स्वर निघाले….

” येई वो विठ्ठले येई लवकरी।धावे तू सत्वरी मजलागी।
आमुचा विचार आता काय देवा। सांभाळी केशवा मायबापा।।
आता कवणाची पाहू मी वास।अवघेंचि वास दिसतसे।
सोयरा म्हणे अहो पंढरीच्या राया।आमुची ती दया येऊ द्यावी ।।अशा शब्दात सोयराने गहिवर घातला पण चोखोबाला होणारी मारहाण चालुच होती.जीव गेला तरी चालेल पण अद्दल घडवायचीच या उद्देशाने,आवेगाने मारहाणीबरोबर शिव्यांचा भडीमार चालुच होता.कुणी अंगावर थुंकत,लघवी क्रुरतेची परिसीमा गाठली होती.क्रूर जनावरालाही लाजवेल इतके पशुवत विभित्सता सुरु होती.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *