संत चोखामेळा म. चरित्र ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग-४०.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

थकुनभागुन रात्री झोपलेल्या चौघांनाही जाग आली ती सकाळी सूर्य उगवल्यानंतरच!त्यांच्या सर्व जाणीवा जागृत झाल्या आणि खडबडुन उठले. अंगाचा थरकाप झाला.मृत्युदंड डोळ्या समोर नाचु लागला.कोण कुणाचे सांत्वन करणार?चोखोबा मृत्युला घाबरत नव्हते. पण आपल्या बेसावधपणामुळे,त्याच्या लाडक्या भक्तामुळे विठ्ठलाला लाच्छंन लागणार, किटाळ येणार हे मृत्युदंडापेक्षा जास्तच दुःखद होते.संचित मुद्रेने चौघेही शिक्षा सांगायला येणार्‍या सैनिकांची वाट बघत होते.आणि तो आलाच.पण सैनिक नव्हे तर खुद्द सरदार नंग्या तलवारी घेतलेल्या दोन सैनिकांसह.घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकुन वस्तीवरील इतर मजूरही जमा झाले.डोळे मिटुन चौघेही जणं मृत्युदंडाच्या हुकुमाची वाट बघत होते.पण हे काय?सरदार सजा फर्मावण्याऐवजी दुसरेच कांहीतरी बोलत होता.चोखोबांनी डोळे उघडले.बोलणे कानावर पडले. शाब्बास रे माझ्या वाघांनो!दिलेल्या मुदतीच्या आंतच भूयाराचे काम पूर्ण केले.तुमची बक्षीसी  योग्यवेळी तुम्हाला मिळेल असे सांगुन सरदार निघुन गेला.

चोखोबांचा तर कानावर विश्वासच बसत नव्हता.बाकी तिघांचीही अवस्था वेगळी नव्हती.भूयाराचे बांधकाम पूर्ण झाले?कधी?कसे?आणि कुणी केले? आपण चौघे तर झोपलो होतो,मग बांध काम कुणी केले?एवढ्यात गोविंदा येऊन म्हणाला,चोखोबा!कमाल आहे तुमची. मध्यरात्री एवढ्या उंचावर चढुन चांदण्या च्या प्रकाशात एकट्याने काम पूर्ण केले. चोखोबांना अतिशय आश्चर्य वाटले,कोण मी?मध्यरात्री ते देखील उंच पायाड्यावर  उभा राहुन बांधकाम करीत होतो?कुणी सांगीतले तुम्हाला?मी स्वतः ह्या डोळ्यां नी बघीतलय!हाका सुध्दा मारल्यात,पण तुमचे लक्षच नव्हते.गोविंदा परत परत तेच सांगत होता.तिघांना तर विशेष वाटले नाही,पण चोखोबा समजुन चुकला,अंदाज आला,आपण निजलो असतांना भक्तवत्सल पांडुरंगाने आपल्या ला होणारी देहदंडाची शिक्षा व प्रत्यक्ष पांडुरंगावर येणारे लांच्छन या दोन्ही पासुन वाचवले.तो जनाबाईबरोबर दळण कांडन व इतरही कामे करायचा,गोरा कुंभाराबरोबर माती मळायचा,निर्मळाचे रुप घेऊन सोयराची प्रसुती केली.बैलां च्या पायात फरफटणार्‍या शिक्षेपासुन वाचवले,पण हे सारं पंढरपूरांत,पण इतक्या दूर मंगळवेढ्यात येऊन विठ्ठलाने मदत केली हे लक्षात आल्यावर,आपण कुठे आहो?भोवताली कोण आहे याचे भान विसरुन जमीनीवर डोके टेकवुन हुंदके द्यायला लागले.कां आणि कशा साठी रडत आहे?कशी समजुत काढावी कुणालाच समजेना.

चोखोबा आपल्यापासुन,पंढरपूर पासुन दूर गेला ही गोष्ट त्या वीटेवर उभ्या असलेल्या विठोबाला सलत होते.पण त्यांचे पंढरपूरला जाणे विधिलिखितच होते.तिथेही आपल्या भक्ताला मिळत असलेली लोकप्रियता,त्याचे भागवद्भक्ती त,अभंगरचनेत रमणे,तिथल्या मजुरांना भगवद् भक्तीचे महत्व,भजन किर्तनातुन पटवुन देणे हे सगळे बघून विठ्ठलाला आपल्याला या भक्ताचा अतिशय अभिमान वाटत होता.पण जेव्हा त्याच्या वर संकट आलं,मृत्युदंडाची शिक्षा होणार याहीपेक्षा अपराधी म्हणुन मृत्यु येणार यामुळेच पांडुरंग धावन बुरुजाचे काम पूर्ण केले. बुरुजातील गुप्त मार्गाचे आणि भिंतीचे काम चोखोबाने पूर्ण केले की, खरेच विठ्ठलाने येऊन पूर्ण केले याबद्दल चर्चा चालत,पण या प्रसंगामुळे चोखोबां चा आदर मात्र वाढला.हे जरी खरे असले तरी त्यांची कासावीसी वाढली.आपल्या मुळे देवाला त्रास पडला या विचारानेच जेवण जाई ना की,कशात लक्ष लागेना. जीवाची तडफड होत होती,आणि मग उरातील वेदना अभंगरुपाने बाहेर पडत.

मजुरांच्या श्रमांतुन गावकुसीची तट बंदीची भिंत आकारल्या जात होती. कालची अख्खी रात्र गत आयुष्यातील सार्‍या आठवणींत जागुन काढली.दिवस उजाडला,तशाच भारावल्या अवस्थेतच सकाळची कामे उरकली,पण आज त्यांना उदास उदास,मनांत एक अनामिक हूरहूर,विचित्रशी घालमेल होत होती.असं का होतय?मन असं सैरभैर कां झालय? कांहीतरी अघटीत घडणार याचा तर हा संकेत नसेल ना?अशा मनःस्थितीच चोखोबा कामाला लागले.प्रत्येक दगडा वर श्वासा-उच्छावासागणिक विठ्ठलाचे नांव कोरुनच ते चौथर्‍यावर बसवत असे. नेहमीचाच हा त्यांचा हा शिरस्ता होता. अगदी दीपमाळेच्या बांधकामापासुन! आणि त्या प्रत्येक दगडांत त्यांना विठू रायाची मूर्ती,नेहमीसारखीच स्निग्धभाव, प्रसन्न मुद्रेची दिसत होती,पण आज त्याचे हात कटेवर नसुन,डोक्याच्यावर उंचावुन जणुं चोखोबाला बोलावत होता. मिठीत घ्यायला उत्सुक दिसत होता. चोखोबा मृत्युला घाबरत नव्हते पण त्यांना मृत्यु हवा होता,त्याच्या,नामदेवा च्या सानिध्यात,पंढरपूरांत!ही इच्छा पांडुरंग नक्की पुरवेल याची चोखांना खात्री होती.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *