संत शिरोमणी नामदेव महाराज संक्षिप्त चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
|| संत नामदेव महाराज ||

संत नामदेव

हा लेख संत ज्ञानेश्वर समकालीन संत नामदेव (नामदेव दामाशेटी रेळेकर) याबद्दल आहे.

संत शिरोमणी नामदेव महाराज
 (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातहिले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा,नरसी नामदेव यागावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाडा मधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.

भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.

दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी (नरसी नामदेव) हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०) मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.

संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.


पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथंतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.

कीर्तनांत अनेक चांगल्या  ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. कालनिर्णय या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो. संत नामदेव हे कीर्तने करत करत भारतभर फिरले.

अनुक्रमणिका

१ नामदेवांसंबंधी आख्यायिका
२ नामदेवांचे साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिले गेलेले साहित्य
३ नामदेवांची स्मारके

नामदेवांसंबंधी आख्यायिका
नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला.

कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.

एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन/कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले. त्यांच्या विनंतीस मान ठेवून, नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले, ते आजतागायत तसेच आहे.

नामदेवांचे साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिले गेलेले साहित्य

घास घेई पांडुरंगा (कादंबरी, लेखक -रवींद्र भट)

चिरंतनाचा ज्ञानदीप : संत नामदेव (सुभाष कि. देशपांडे)

आद्य मराठी आत्मचरित्रकार-संत नामदेव (डॉ.सौ. सुहासिनी इर्लेकर)

नामदेव गाथा (संपादक : नाना महाराज साखरे)

नामदेव गाथा (संपादक: ह.श्री. शेणोलीकर)

संत नामदेव-तुकारामांचे सांस्कृतिक संचित (डॉ. श्रीपाल सबनीस)

नामदेवांची गाथा (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन -एकूण २३३७ अभंग)

संत नामदेव गाथा (कानडे / नगरकर)

श्री नामदेव : चरित्र, काव्य आणि कार्य (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)

श्री नामदेव चरित्र (वि.स. सुखटणकर गुरुजी-आळंदी)

श्री संत नामदेव महाराज चरित्र (प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत)

श्री नामदेव चरित्र ग्रंथ तत्त्वज्ञान (शंकर वामन दांडेकर)

श्री नामदेव चरित्र (वि.ग. कानिटकर) (सरकारी प्रकाशन)

संत नामदेव (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)

संत नामदेव चरित्र (बालवाङ्‌मय, शैलजा वसेकर)

संत नामदेवांचे कवित्व आणि संतत्व (डॉ. श्रीपाल सबनीस)

संत शिरोमणी बाबा नामदेव (दीपक बिचे)

नामदेवांची स्मारके

महाराष्ट्रातील शिंप्यांच्या एका पोटजातीला नामदेव शिंपी म्हणतात.

पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिले आहे.

पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे.

पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय आहे. (स्थापना १७-७-२०१६). घुमान गावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.

हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावी त्यांचे एक मोठे स्मारक आहे.

संत नामदेव

आपल्या महाराष्ट्र भूमिला संतांची पवित्र भूमी म्हंटलं जात. संतांच्या मांदियाळीतील एक प्रमुख नाव म्हणजे संत शिरोमणी नामदेव. ज्यांनी एकाहून एक अभंग रचले.
वारकरी संप्रदायचे थोर प्रचारक संत नामदेव महाराजांनी भारतभ्रमण केले. संत नामदेव हे प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या अंतरंगातील भक्त होते.
संत नामदेवांची अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये सुमारे २५०० अभंग लिहिले आहेत.

संत नामदेव माहिती
नाव नामदेव दामाशेटी रेळेकर
जन्म २६ ऑक्टोबर १२७०
गाव नरसी नामदेव जि. हिंगोली मराठवाडा
आई गोणाई रेळेकर
वडील दामाशेटी रेळेकर
पत्नी राजाई नामदेव रेळेकर
मुले महादेव, गोविंद, विठ्ठल, नारायण आणि मुलगी लींबाई
समाधी ३ जुलै १३५० शनिवार (शके १२७२)

संत नामदेव हे ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. ज्ञानेश्वर माऊलीना समकालीन असणाऱ्या संत नामदेव महाराजांचं जन्म नाम संवस्तरात शके १९९२ मध्ये कार्तिक शुध्द एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी (इ.स.२६ ऑक्टोबर १२७०) रोजी नरशी नामदेव या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्यातील गावामध्ये झाला. संत नामदेवांचे पूर्ण नाव “नामदेव दामाशेटी रेळेकर” असे होते. त्यांच्या आईचे नाव गोणाई. त्यांचा व्यवसाय शिंपी होता. संत नामदेवांचा वयाच्या ११ व्या वर्षी सावकारांची मुलगी राजाई हिच्याची लग्न झाला.

एक मोठी बहिण आऊबाई ,चार पुत्र नारा, विठा, गोंदा, महादा आणि एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्याच परिवारातील एक सदस्य होत्या. विठ्ठलाच्या भक्तीत रममाण झालेल्या नामदेवांची संसाराची ओढ कमी होत गेली आणि ते विरक्त होत गेले. त्यांच्या विठ्ठलभक्तीला घरातून विरोध होऊ लागला पण नामदेव पांडुरंगामध्ये इतके लीन झाले होते कि ते माघारी फिरले नाहीत. पुढे त्यांचे अवघे कुटुंबच भाक्तीमार्गाशी एकरूप झाले.

वारकरी संप्रदायचे थोर प्रचारक नामदेव महाराज नामदेवाचे व नामविध्येचे आद्य प्रणेते म्हणून संत नामदेवांनी भारतभ्रमण केले. संत नामदेवांच्या घराण्यात विठ्ठल भक्तीची परंपरा होती त्यामुळे संत शिरोमणी नामदेव अगदी लहानपणापासूनच विठ्ठलमय झाले होते. बालपण पंढरपुरात गेल्यामुळे पांडुरंगच त्यांचे सर्वकाही होता. पांडुरंगाशी ते संवाद साधत.

अमृताहुनी गोड नाम तुझें देवा ||
मन माझें केशवा कां बा नेघे ||


संत नामदेवांविषयी अख्यायिका अश्या सांगितल्या जातात कि त्यांच्या बालपणी वडिलांच्या आज्ञेनुसार नामदेव विठ्ठलाला नैवेद्य घेऊन देवळात गेले, आणि त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखविला नाही तर देवापुढे वात बघत बसले कि केव्हा हा खाईल. बालभक्ताची भक्ती पाहून साक्षात विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. एकदा कुत्र्याने चपाती पळवली, त्याला ती कोरडी लागू नये म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे धावू लागले. आपल्या कीर्तनकलेमुळे साक्षात पांडुरंगाला डोलायला भाग पाडणारे अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव हे प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्थी सखा होता असे मानले जाते.

एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथांच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन कीर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांनी त्यांना विनवले त्या विनंतीस मान देऊन नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले, नामदेवांची भक्ती बगून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर पश्चिमाभिमुख केले ते आजतागायत तसेच आहे.

संत नामदेव गाथा मराठी
मराठी भाषांमधील सर्वाधिक जूंन्या काळामधील कवींपैकी एक म्हणजे संत नामदेव महाराज. प्रल्हाद बाळांचा अवतार संत शिरोमनी नामदेवांनी १०० कोटी अभंग लिहण्याचा संकल्प केला होता. त्यांनी वज्र भाषेमधेही काव्ये रचली. भागवत धर्माचा प्रचार थेट पंजाब पर्यंत करणारे संत नामदेव शीख धर्मियांचे देखील श्रद्धास्थान आहेत. संत नामदेवांची अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये सुमारे २५०० अभंग लिहिले आहेत. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना केली.

त्यातील सुमारे ६२ अभंग नामदेवजीकी मुखबानी नावाने शीख पंतांच्या ‘गुरुग्रंथसाहेब ’ मध्ये समाविष्ट आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी या ग्रंथातील तीन अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार संत श्रेष्ठ नामदेवांनी केला. प्रतिकूल परिस्तिथी मध्येही महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम संत नामदेवांनी केले. त्यांच्या कामातूनच पुढे रामानंद, कबीर, नानक, दादू दयाळ, मीरा, नरसी मेहेता, मलुकदास अश्या संतांची मांदियाळी देशभर उभी राहिली. महाराष्ट्र आणि पंजाब बरोबरच राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाना, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश मध्ये संत नामदेवांची मंदिरे आहेत.

जमला संतमेळा, अवघा रंग एक झाला.

संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदि संतांचा मेळा जमला होता. त्यांची एकत्र तीर्थयात्रा सुरु झाली. माणसाला माणूस बनवण्याची त्यांची धडपड होती. १२९१ मध्ये संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांची भेट झाली. ज्ञानदेव नामदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला आला होता. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम होता. संत नामदेव कीर्तन करत, चोखामेळा टाळकरी बनून त्यांना साथ देत आणि जनाबाई कीर्तनाचे संचलन करत. यानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरु म्हणून लाभले.

संत सामेलनामधील चर्चांमधून नामदेवांना भगव्द्कार्यासाठी अधिक ज्ञान मिळवण्याची गरज लक्षात आली. त्यासाठी त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून देवाच्या सगुण-निर्गुण रूपाविषयी स्पष्टता मिळवली.

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी

या भूमीकेशी समरस होत त्यांनी आयुष्य वेचलं. आषाढ कृष्ण त्रयोदशीला(शनिवार ३ जुलै १३५०) संत नामदेव महाराजांनी वयाच्या ऐशी व्या वर्षी अत्यंत समाधानाने देह ठेवल्याचे सांगितले जाते. संत नामदेवांची इच्छा होती कि पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या संत सज्जनांची पायधूळ माझ्या मस्तकी लागावी. विठ्ठलाच्या मंदिरी ‘पायरीचा दगड’ होण्यात नामदेवांनी धन्यता मानली.त्यांच्या इच्छेनुसार विठ्ठल महाद्वाराच्या पायरीखाली नामदेव महाराजांची समाधी बांधण्यात आली. त्यांची एक समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आहे, तर दुसरी पंजाबमधील घुमान येते आहे.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

संत नामदेव महाराज हे मध्ययुगीन भारताचे संत होते. संत नामदेव हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन होते. नामदेवांच्या जन्मापूर्वीपासून भारतावर सतत मुस्लिमांचे राज्य होते, त्यामुळे त्यांचे धार्मिक विचार समाजात मिसळले. त्यामुळे सांस्कृतीक वातावरण गढूळले होते. समाजाला एक प्रकारची ग्लानी आली होती सर्वसामान्य लोकं कर्मकांडाच्या नादी लागल्यामुळे खरा धर्म सामाजिक प्रवाहापासून दूर चालला होता. त्या काळात नामदेवांनी जन्म घेऊन अलौकिक कार्य केले.

Contents hide
1 संत नामदेव महाराज
1.1 नामदेवांचा जन्म आणि कुटुंब
1.2 नामदेवांचे बालपण
1.3 संत नामदेवांचे लग्न
1.4 नामदेवांची आणि ज्ञानदेवांची भेट
1.5 नामदेवांचे सामाजिक/आध्यात्मिक कार्य
1.6 संत नामदेवांचे साहित्यिक कार्य
1.7 नामदेवांचे निधन
संत नामदेव महाराज
नामदेवांचा जन्म आणि कुटुंब
संत नामदेवाचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० मध्ये काठा नदीच्या काठी असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणि (सध्या नरसी नामदेव म्हणून ओळखले जाते) नावाच्या गावात झाला पण त्यांचा जन्म नरसी-बामणीचा, की पंढरपूरचा ह्यासंबंधीही वाद आहे. नामदेवांच्या घरचा व्यवसाय शिंप्याचा होता. नामदेवांच्या घरात त्यांच्या आजोबापासून विठ्ठलभक्तीचे वातावरण होते त्यामुळे त्यांना बाळपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली.

नामदेवांचे बालपण
नामदेव, अगदी लहानपणापासूनच प्रल्हादसारखे होते. ते विठ्ठलाचे महान भक्त होते वयाच्या दुसऱ्या वर्षी, जेव्हा त्यांनी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा दररोज त्यांची आई गुनाबाई त्यांना देवतांच्या पूजेसाठी विठोबाच्या मंदिरात घेऊन गेल्या तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्याची पुढील पायरी म्हणजे जेव्हा वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी झांजांची जोडी तयार केली आणि नृत्य, गाणे, भजन गाण्यात वेळ घालवून इतर सर्व गोष्टींकडे-शाळेतले शिक्षण, विश्रांती, झोप इत्यादीकडे दुर्लक्ष केले. विठोबाबद्दलची भक्ती इतकी निर्दोष आणि प्रामाणिक होती की कधीकधी ते त्याला त्यांचा सर्वात प्रिय भाऊ म्हणून मानत असत.

एके दिवशी नामदेवची आई व्यस्त असल्याने तिने नामदेवला विठोबाला नैवेद्याचे भोजन भरवण्यास सांगितले. नामदेव मंदिरात गेला आणि त्याने जेवणाची थाळी विहोबासमोर ठेवली आणि त्याला नैवेद्य स्वीकारण्यास सांगितले. तथापि, विठोबाने नामदेवाची मागणी मान्य नाही केल्यामुळे बालक नामदेव रडू लागला. तेव्हा विठोबाने प्रत्यक्षात मानवी रूप धारण केले आणि कृतज्ञतेने अर्पण स्वीकारले.

नामदेवाच्या आईला आश्चर्य वाटले जेव्हा तिचा मुलगा रिकामी प्लेट घेऊन मोठ्या आनंदाने परत आला आणि त्याने तिला सांगितले की विठोबाने नैवेद्य स्वीकारले. परमेश्वराने खरोखरच त्यांचे अर्पण स्वीकारल्याचे पाहून आईला समाधान वाटले. तिचा नामदेवावरील आनंद आणि अभिमान अमर्याद होता. ती अशा महान भक्ताची आई आहे याबद्दल तिला परमेश्वराची कृतज्ञता वाटली.

नामदेवांना सुरुवातीपासूनच ऐहिक गोष्टींमध्ये रस नव्हता. त्यांना शिंपी म्हणून किंवा आपल्या वडिलांच्या इतर व्यवसायात रस नव्हता. दिवस आणि रात्र विठोबाच्या भक्तीत घालवणे हे त्यांचे एकमेव हित होते. त्यांचे आईवडील म्हातारे झाले कौटुंबिक भरभराट होत चालली होती. म्हणून, त्यांची प्रिय इच्छा अशी होती की नामदेवांनी आपल्या भक्तीसाठी वाजवी मोकळा वेळ न घालवून कुटुंब सुखसोयी राखण्यास मदत करावी. म्हणून नामदेवांना काही दिवस कपड्यांचे तुकडे विकण्यासाठी बाजाराकडे पाठविण्यात आले. पण नामदेव व्यापाराच्या युक्तीने निष्पाप होते. त्यांच्यासाठी, किंमती आणि पैसे आणि त्याचे मूल्य यासारख्या गोष्टी अज्ञात विषय होते. ते कपड्यांसह बाजारात गेले, कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना भाग पाडले. ते तेथे एका दगडावर भजन करीत बसले, हे विसरूनच की आपण तेथे कपडे विकायला गेलो आहे.

काही तासांनंतर सूर्य मावळला आणि संध्याकाळच्या भक्तीप्रदर्शनासाठी मंदिराकडे जाण्याची वेळ आली. त्यानंतर त्यांना आठवले की त्यांनी कपडे विकले नाही आणि आता आपल्या वडिलांकडून मारहाण केली जाईल. ते मंदिरात जाण्यासाठी अधीर होते. म्हणूनच त्यांनी सर्व कपडे ज्या दगडावर बसले होते त्याला विकून टाकले, म्हणजे त्याने कपडे त्या दगडावर ठेवले आणि पैसे दुसऱ्या दिवशी देण्यासाठी त्या दगडाचा साक्षीदार म्हणून आणखी एक दगड नेमला आणि मंदिरात गेले.

आपल्या मुलाचे धाडस ऐकून नामदेवच्या वडिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी पैशाची हमी दिलेला धोंड्या आणण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी नामदेव बाजाराकडे परत गेले तेव्हा त्यांना आढळले की कपडे रात्रीच्या वेळी गायब झाले होते आणि त्यांनी दुसरा दगड (धोंड्या) घरी नेला कारण त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर ते मंदिरात गेले आणि त्त्यांनी विठोबाला सर्व घटना सांगितल्या आणि आपल्या अडचणीही सांगितल्या. जेव्हा नामदेवाच्या वडिलांनी त्यांना पैशाची हमी दिलेली धोंड्या दाखवायला सांगितले तेव्हा नामदेव यांनी उत्तर दिले की धोंडय़ाला घराच्या बंद खोलीत ठेवण्यात आले आहे आणि ते मंदिरात पळाले.

जेव्हा वडिलांनी पैशाची मागणी करण्यासाठी खोली उघडली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले की, त्यांनी तेथे एक सोन्याचा ढीग पहिला. वडिलांना खूप आनंद झाला; पण नामदेव त्याबद्दल अगदीच उदासीन होते. नंतर त्यांना वाचवल्याबद्दल त्यांनी देवाची स्तुती केली

एकदा नामदेवांची संत ज्ञानदेव व त्यांच्या भावंडाशी भेट झाली. त्या सर्व भावंडांनी नामदेवांना नमस्कार केला; परंतु नामदेवांनी त्यांना परत नमस्कार न करता तसेच बसून राहिले. ते पाहून मुक्ताबाईं नामदेवांना म्हणाली, “तुम्ही विठ्ठलभक्त स्वत:ला समजता, तरीही तुमचा अहंकार काही गेला नाही.” त्यानंतर संत ज्ञानदेवाच्या सांगण्यावरून नामदेवांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला. त्यांचे शिष्यत्व स्वीकारले.

संत नामदेवांचे लग्न
याच दरम्यान नामदेवांचे राधाबाईशी लग्न झाले. राधाबाई ही सांसारिक विचारांची स्त्री होती. नामदेवाच्या आमंत्रणास उत्तर म्हणून, विठ्ठलाने मनुष्याच्या वेषात नामदेवच्या मुलाच्या नामकरण सोहळ्यास हजेरी लावली, मुलाचे नाव ‘नारायण’ ठेवले आणि त्या प्रसंगी त्यांना चांगल्या भेटवस्तू दिल्या. नामदेव आणि राजाई यांना नारा, विठा, गोंडा, महादा आणि लिंबाई नावाची एक मुलगी अशी चार मुले झाली. त्यांची मोठी बहीण औबाईसुद्धा त्यांच्याबरोबर राहत होती. घरात सर्व पंधरा लोक होते.

नामदेवांना वाटले की घरगुती गोष्टींमध्ये, पालकांमध्ये, पत्नीत आणि मुलांमध्ये रस घेणे अधिकच कठीण आहे आणि सर्व लोक किंवा त्यांचे मित्र त्यांना मनापासून जगात परत आणण्यात यशस्वी झाले नाहीत. त्याला फक्त एकच आवड होती आणि ती होती विठोबाची भक्ती. तो विठोबासमोर तासनतास बसून, त्याच्याशी बोलत असे, त्याच्याशी आध्यात्मिक गोष्टींबद्दल चर्चा करीत आणि भजन करीत असे. नामदेवासाठी, विठोबाच प्रत्येक गोष्टीची सुरुवात आणि अंत होता.

नामदेवांची आणि ज्ञानदेवांची भेट
नामदेव वयाच्या साधारण वीस वर्षांचे होते तेव्हा त्यांची भेट पंढरपुरात थोर संत ज्ञानदेव यांना झाली. ज्ञानदेव विठोबाचा एक महान भक्त म्हणून स्वाभाविकच नामदेवांकडे आकर्षित झाले. त्यांना नामदेवच्या संगतीचा फायदा व्हावा म्हणून त्याने नामदेवला आपल्याबरोबर तीर्थस्थानावरील सर्व पवित्र ठिकाणी जाण्यास उद्युक्त केले. नामदेवला जाण्याची इच्छा नव्हती. तथापि, शहाणपणाचा सल्ला यशस्वी झाला आणि त्यांनी नामदेव यांना तीर्थयात्रा करण्यास उद्युक्त केले. नामदेवच्या जीवनातील हा सर्वात महत्वाचा काळ होता. या काळापासून या दोन महान संतांना मृत्यूपासून विभक्त होईपर्यंत जवळजवळ कधीच वेगळे केले नाही. तीर्थयात्रा भारतातील सर्व भाग आणि जवळजवळ सर्व पवित्र स्थळांवर विस्तारली गेली.

तीर्थयात्रेच्या वेळी नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्या समाजातून आणि ज्ञानेश्वरांचा मोठा भाऊ आणि गुरू असलेल्या निवृत्तीकडून बरेच काही मिळवले आणि देवाचे प्रकटीकरण म्हणून या जगाकडे विस्तीर्ण दृष्टींने पाहण्यास सक्षम होते.

आम्ही पूर्वी पाहिल्याप्रमाणे, नामदेवचे जग पंढरपुरातील देवता ‘विठोबा’ ने आरंभ झाले आणि ते इतर कोणत्याही देवताला देवाचे प्रतीक म्हणून ओळखणार नाहीत. तीर्थयात्रे सुमारे पाच वर्षे चालली आणि या काळात ज्ञानदेव यांनी नामदेवला गुरुंचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जेणेकरुन त्याला पूर्णतः पुरुषाची जाणीव होऊ शकेल.

नामदेवांची “सर्वसुख आहे मज पांडुरंगी” अशीच धारणा होती त्यामुळे त्यांना तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता वाटत नव्हती. तरीही नामदेव ज्ञानदेवांबरोबर तीर्थयात्रेला गेले. महाराष्ट्रातील अनेक संत ह्या तीर्थयात्रेत सामील झाले. तीर्थयात्रेहून परत आल्यानंतर ज्ञानदेवांनी समाधी घेतली. तो प्रसंग नामदेवांनी पाहिला. नामदेव त्यावेळी अवघे सव्वीस वर्षांचे होते. त्यानंतर आपल्या आयुष्याची उर्वरीत ५४ वर्षे त्यांनी भागवत धर्माचा प्रचार केला.

नामदेवांचे सामाजिक/आध्यात्मिक कार्य
नामदेवांनी उत्तर भारतात तब्बल चोपन्न वर्ष समाज जागृतीसाठी आध्यात्मिक कार्य केले. अवघ्या महाराष्ट्रात ज्ञानदेव, नामदेवाबरोबरच आध्यात्मिक भक्तिगंगेत पुढे एकनाथ, तुकाराम, रामदास हे सामील झाले आणि या पंच संतकवींनी अज्ञानी मनात ज्ञानाचे दीप प्रज्वलित करण्याचे मौलिक काम केले.

त्यानंतर नामदेवांनी महाराष्ट्रापासून ते पंजाबपर्यंत भागवत संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी गुजरात सौराष्ट्र राजस्थान पंजाब असा प्रवास करीत कीर्तनाद्वारे भागवत संप्रदायाचे प्रबोधन केले. राजस्थानातील जयपूर, भरतपूर, बिकानेर, अलवर अशा मोठ्या शहरातून नामदेवांची मंदिरं आहेत. तसेच त्यांच्या नावाच्या शाळाही आहेत.

राजस्थानमध्ये अठरा जिल्ह्यातील बावन्न गावांमधून नामदेवांची मंदिरं आजही पाहायला मिळतात. सातशे वर्षापूर्वी नामदेवांनी भारतभर धर्मकार्य केले, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. संत नामदेवांनी ‘आदि’, ‘तीर्थावळी’ व ‘समाधी’ अशी त्रिखंडात्मक चरित्रकार रचना संत ज्ञानेश्वरांच्याजीवनावर केली आणि ‘आद्य पद्य चरित्रकार’ म्हणून संत नामदेवांचा गौरव केला गेला.

संत ज्ञानदेवांना समकालीन असलेले संत नामदेव यांनी तर भगवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर द्वारका, मारवाड, बिकानेर, मथुरा, हरिद्वार पंजाबपर्यंत फडकवली, पंढरपुरातील विठ्ठलाच्या परिसरात सीमित झालेल्या भक्तिकेंद्राला त्यामुळे व्यापक क्षेत्र मिळालं. खरंतर नामदेवांच्या नामामध्येच नाम हाची देव आहे.

घोमान हे बाटला शहराच्या दक्षिणपूर्व दिशेला 26 कि.मी. आणि श्री हरगोबिंदपूरपासून 10 कि.मी. अंतरावर आहे. ते श्री हरगोबिंदपूरच्या पश्चिमेस दिशेने आहे. घोमान संत नामदेवांशी संबंधित आहेत. संत नामदेव हे या शहराचे संस्थापक होते आणि 17 वर्षे त्यांनी येथे ध्यान केले. येथे त्याने चमत्कारिक कामे केली. या मंदिराचे पूर्व प्रवेशद्वार नामदेव दरवाजा म्हणून ओळखला जातो. गर्भगृहात विठोबाची स्थिर प्रतिमा आहे.

भागवत धर्माची पताका उत्तरेत नेणारे नामदेव हे पहिले संत होते. नामदेवांनी पंजाबमध्ये भक्तिमार्गाचा शुभारंभ केला आणि रामानंद, कबीर व नानक अशा संतांना प्रेरणा मिळाली. शीखबांधवांच्या ‘श्री गुरुग्रंथसाहेब’ या धर्मग्रंथात संत नामदेवांची एकसष्ट हिंदी पदे आहेत त्यास “बाबा नामदेवजी की मुखबानी” म्हणून ओळखले जाते.

दुःखापासून मुक्ती मिळवून सुख, शांती समाधान मिळविण्यासाठी नामस्मरणाचा सोपा मार्ग पीडित जनतेला दिला. लोकांना कर्मकांडापासून परावृत्त करून खरा धर्म सर्वसामान्याच्या मनात रुजवाला. अखंड आयुष्यभर भ्रमण करत विश्वशांतीचे स्वप्न साकार केले. ज्ञानदेवांनी केलेली विश्वकल्याणाची प्रार्थना नामदेवांनी अंगीकारत सार्थ केली.

संत नामदेवांचे साहित्यिक कार्य
संत नामदेव म्हणजे मराठीतील पहिले चरित्रकार आणि स्वयं-चरित्रकार आणि पंजाबपर्यंत धर्म प्रसार करणारे भागवत-धर्माचे अग्रणी लेखक. संत नामदेव हे महाराष्ट्राचे प्रख्यात धार्मिक कवी मानले जातात. ईश्वराला अनन्यभावानं शरण जाणं ही नामदेवांच्या कवित्वामागील प्रमुख प्रेरणा होती.

“विठ्ठल आवडी प्रेमभावे, आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी।“
असं नामदेव अभिमानाने सांगतात. ‘अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा’ असे म्हणत पंढरीचा महिमाही पटवून देतात.

“देह जावो अथवा राहो, माझे तीर्थ पंढरी।”

अशा कितीतरी अभंगांतून नामदेवांचा विठ्ठलाविषयीचा श्रद्धाभाव व्यक्त झाला आहे. नामदेवांनी विठ्ठलाविषयी ज्या उत्कटेने रचना लिहिल्या, त्याच उत्कटतेने अनेक संतांचं वर्णन काव्यात केलं आहे. साधी, पण भावोत्कट अभिव्यक्ती हे नामदेवांच्या काव्यरचनेचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या उत्कट ईश्वरभक्तीचा अत्यंत विलोभनीय असा आविष्कार काव्यात जाणवतो. त्यांच्या रसाळ वाणीची व अर्थपूर्ण अभंगाची महतीसांगणाऱ्या किती तरी कथा प्रचलित आहेत.

महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन पंजाबमध्ये पोहोचलेल्या भगवत-धर्माचे ते आद्य समर्थक आहेत. हिंदी आणि पंजाबी भाषेतही त्यांनी काही भजन लिहिले. कीर्तन करताना त्यांची भक्ती आणि कौशल्य इतके उच्च दर्जाचे होते की असे म्हटले जाते की भगवान पांडुरंगसुद्धा त्यांच्या नादात चालले होते. वारकरी संप्रदायाचे समर्थक असूनही संत नामदेव यांनी देशभर धार्मिक ऐक्य स्थापित केले.

सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणी भगवद्भाव मानणं हा जो भक्तियोग ज्ञानदेवांनी सांगितला, तोच भागवतधर्म. त्यांच्या शब्दांमध्ये समदृष्टी आहे, व्यापकपणा आहे, आणि आल्हादही आहे. त्यामुळे नामदेवांच्या रचना मनाला स्पर्श करतात.

संत ज्ञानेश्वरांनी एका ओवीत जे मूळ तत्त्व सांगितलं, ते संत नामदेवांनी केवळ स्वीकारलं असंच नाही तर ते अंगीकारलं, त्यामुळे त्यांना जो अनुभव आला, तो त्यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. नामदेवांनी समाज जागृतीचे महान कार्य केले. संसारात राहून संसाराचा उपभोग जरूर घ्यावा; परंतु नित्य जागृत राहावं, अनासक्त असावं. वेळोवेळी ईश्वराची भक्ती करावी. अशा या भक्ताच्या रक्षणासाठी साक्षात् विठ्ठल सुदर्शनचक्र घेऊन दारात उभा असतो. नामदेवांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणजे नामस्मरण होय.

नामदेवांनी विठ्ठलभक्तीबरोबरच व्यावहारिक व प्रापंचिक जीवनावरही अभंगांद्वारे भाष्य केले आहे. चंचल मनाविषयी ते म्हणतात,

“मन केले तैसे होय, धाडिले तेथे जाय।“

नामदेवांचे अभंग, कविता अतिशय तरल, अर्थपूर्ण व भावस्पर्शी आहेत. त्यांच्या काव्याचे वर्णन संत तुकारामांनी अचूक शब्दात केले आहे, ते असे…

‘कविता गोमटी नामयाची’

नामदेवने असंख्य अभंग लिहिले. ते महाराष्ट्रात आणि पंजाबमध्ये अत्यंत लोकप्रिय होते आणि त्यांचे काही श्लोक आदि ग्रंथात समाविष्ट आहेत, शीख धर्माचे पवित्र शास्त्र. नामदेव यांनी भक्तीमय कवितेची परंपरा प्रेरित केली, जी महाराष्ट्रात चार शतकांपर्यंत चालू राहिली, ज्याचा शेवट महान भक्ती कवी तुकारामांच्या कार्याने झाला.

अशा या नामदेवांनी अज्ञानाला दूर सारत कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप लावण्याचे महान कार्य केले. खऱ्या अर्थाने नि:स्वार्थी भावनेने त्यांनी ज्ञानदेवांनी लावलेल्या भागवत पंथाच्या रोपट्याचा महावृक्ष केला.

नामदेवांची समाधी
ऐंशी वर्षे वय झाल्यानंतर नामदेवांनी देह त्यागण्याचे ठरविले. त्यांनी विठ्ठलापुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी आषाढ शुद्ध एकादशी,शके १२७२ रोजी विनंती केली. त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी,शके १२७२ ह्या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातील पहिल्या पायरीखाली त्यांनी समाधी घेतली.

संत नामदेव
(२६ ऑक्टोबर१२७०–३जुलै १३५०).वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवींपैकी एक. पित्याचे नाव दामाशेटी; आईचे गोणाई. नरसी-बामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून सांगितले जाते; तथापि हे गाव नेमके कोठले ह्याबद्दल अभ्यासकांत ऐकमत्य नाही.कराडजवळील नरसिंगपूर हेच ते गाव असावे, असे एक मत आहे.

नरसी-बामणीचा ‘नरसी-ब्राह्मणी’ असा उल्लेख करूनमहाराष्ट्रसारस्वतकारवि.ल.भावे ह्यांनी ते सोलापूरकडचे गाव असल्याचे म्हटले आहे;तथापि असे गाव सोलापूर जिल्ह्यात नाही. मराठवाड्यात नरसी आणि बामणी अशी दोन गावे आहेत.त्यांतील अंतरही फारसे नाही.

नरसी ह्या गावाजवळच नामदेवांची समाधी व देऊळ आहे. ह्या गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते. त्यांचे आजोळ कल्याणी किंवा काणणीहेही ह्याच परिसरातले.नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली, तरी त्यांचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवांची नरसी-बामणी ही ह्या दोन गावांत सामावलेली असावी, असे सामान्यतः मानलेजाते.नामदेवकृत म्हणून समजले जाणारे एक ‘आत्मचरित्र’ नामदेवांच्या संकलित गाथ्यात अंतर्भूत आहे.त्यात “गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण।संसारी असोन नरसीगावी।।”असा निर्देश सापडतो.

नामदेवांचाजन्म नरसी-बामणीचा, की पंढरपूरचा ह्यासंबंधीही वाद आहे. वि.ल.भावे व महाराष्ट्रकवि चरित्रकार ज.र.आजगावकर ह्यांच्या मते नामदेव नरसी-बामणी येथेच जन्मले; तथापि नामदेव पंढरपुरी जन्मल्याचा निर्वाळा बहुतेक प्राचीन संतचरित्रकारांनी दिलेला आहे.एकनाथांनी लिहिलेल्या नामदेव- चरित्रावरून नामदेवांच्या आईने पुत्रप्राप्तीसाठी पंढरीच्या विठोबास नवस केला होता आणि त्यापूर्वीच नामदेवांचे आईवडील पंढरपुरात येऊन राहू लागल्याचे दिसते. नामदेवांचे बालपण पंढरपुरात गेल्याचेही ह्या चरित्रात नमूद आहे.

नामदेवांच्यानावावर मोडणारे उपर्युक्त ‘आत्मचरित्र’ हा नामदेवांचे चरित्रविषयक तपशील जाणून घेण्याच्या दृष्टीने उपयोगात आणला जाणारा एक मुख्य आधार आहे.त्यानुसार असे दिसते,कीनामदेवांच्या घरचा व्यवसाय शिंप्याचा होता.‘शिंपियाचे कुळी जन्म मज झाला’ असेत् यातम् हटले आहे.नामदेवांच्या घरात विठ्ठलभक्तीचे वातावरण होते.नामदेवांनाही बाळपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली. एकदा विठ्ठलासाठी नैवेद्य घेऊन देवळात गेलेले नामदेव देव नैवेद्य खाईना, म्हणून त्याच्या पायांवर डोके आपटूनप्राण द्यावयास निघाले आणि भक्त वत्सल देवाने त्यांची ही भक्ती पाहून नैवेद्य आनंदाने खाल्ला, अशी आख्यायिका आहे.

नामदेवांचा विवाह राजाई नावाच्या स्त्रीशी झालेला होता आणि तिच्यापासून त्यांना नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल असे चार पुत्र झाले; लिंबाई नावाची एक मुलगी झाली. विठ्ठलभक्तीमुळे नामदेव उत्तरोत्तर विरक्त होतचालले. घरातील परिवार मोठा होता. त्याची जबाबदारी नामदेवांनी घेतली पाहिजे, असे त्यांच्या मातापित्यांस वाटे. त्यामुळे नामदेवांच्या विठ्ठल वेडाला त्यांच्या घरातूनविरोध होऊ लागला.नामदेव भक्ती परमार्थाच्या मार्गावरून ढळले नाहीत; उलट हे कुटुंबच भक्तिमार्गाशी समरसले.

सुमारे १२९१ मध्ये नामदेवांची ज्ञानदेवांशी भेट झाली असावी.आपली भक्ती गुरूपदेशावाचून अपुरीच आहे, ह्याची जाणीव ह्या भेटीनंतर त्यांना झाली आणि त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला;त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. अशी आख्यायिका आहे, की नामदेवविसोबांना भेटावयास गेले असता, विसोबा शंकराच्या देवळात पिंडीवर पाय ठेवून निजले होते.तेदृश्यपाहून नामदेवांना चीड आली व त्यांनी विसोबांची निर्भर्त्सना केली; परंतु विसोबांनी देव नसेल तेथे माझे पाय उचलून ठेव, असे म्हटल्यावर ‘देवाविण ठाव हे बोलणेचि वाव’ हाविचार नामदेवांच्या मनालाभिडला.गुरूपदेशामुळे त्यांचा अहंकार नष्ट झाला.विशुद्धभक्तीलाअद्वैतबोधाचे अधिष्ठान प्राप्त झाले.

पुढे श्रीज्ञानदेव पंढरपूर येथे आले आणि ‘भूतळीची तीर्थे पहावी नयनी’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ‘सर्वसुख आहे मज पांडुरंगी’ अशीच नामदेवांची धारणा असल्यामुळेतीर्थयात्रा करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नव्हती; परंतु अखेरीस ते ज्ञानदेवांबरोबर निघाले. महाराष्ट्रातील अनेक संत ह्या तीर्थयात्रेत सामील झालेले होते. रतातीलअनेक तीर्थे त्यांनी पाहिली. ह्या तीर्थयात्रेहून परतल्यानंतर ज्ञानदेवांनी लवकरच समाधी घेतली (१२९६). तो रसंग नामदेवांनी पाहिला. नामदेव त्यावेळी अवघे सव्वीस वर्षांचे होते आणि त्यानंतर आपल्या आयुष्याची उर्वरित ५४ वर्षे त्यांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी वेचिली.‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावूजगी’ ही त्यांची भूमिका होती.

नामदेवांच्या चरित्राचे आणि कार्याचे एक अभ्यासक ग. वि. कविटकर ह्यांनी असे मत मांडले आहे, की ह्या दीर्घकाल खंडात मदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा केल्या;दक्षिणेतील श्री शैलशिखर, अरुणाचल, चिदंबरम्, विष्णुकांची, रामेश्वर आदी ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या होत्या; त्यांच्या प्रभावामुळे दक्षिणेतील दर्जी ही जात स्वतःलानामदेवम् हणवून घेऊ लागली, तर भूसागर आणि मल्ला ह्या जातींनी ‘नामदेव’ हे आपल्या जातीचे एक पर्यायी नावम् हणून स्वीकारले; गुजरात, सौराष्ट्र,सिंधुप्रदेश,राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश येथे हीनामदेवांचे वास्तव्य झाले होते. लोक जागृतीच्या ध्येयपूर्तीसाठी विविधप्रदेशांतील भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या,असे ही कविटकर ह्यांचेप् रतिपादन आहे.

नामदेव उत्तर भारतात गेले असल्याची प्रमाणे अनेक प्रकारे मिळतात.विशेषतःपंजाबातील त्यांच्या वास्तव्याची व कार्याची जाणीव आजही ठळकपणे मिळते. ‘नामदेवजीकी मुखबानी’ म्हणून प्रसिद्ध असलेली नामदेवांची हिंदी भाषेतील ६१ पदे शिखांच्या ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत.त्यांतील ३ विवक्षित पदे अन्य कवींची आहेत, असे एक मत आहे. नामदेवांच्या हिंदीवर मराठीची छाप तर आहेच; परंतु व्रज,अवधी,राजस्थानीअशाभाषांचेही संस्कार आहेत.

व्रजादी भाषा बोलणाऱ्या प्रदेशांत त्यांचे वास्तव्य झाल्याचे आणि त्यांनी ह्या भाषा निदान काही प्रमाणात आत्मसात केल्याचे हे द्योतक आहे.नामदेवांची सु. सव्वाशे हिंदी पदेही आता उपलब्ध झालेली आहेत.विष्णुस्वामी, बहोरदास किंवा बोहरदास, जाल्लो, लब्धा, केसो कलंधर किंवा कलधारी ह्यांसारखे अनेक शिष्य नामदेवांना पंजाबात मिळाले. त्यांपैकी जाल्लो किंवा जाल्हण सुतारासारखे काही शिष्य नामदेवांसोबत पंढरपूरला आले.

केसो कलधारी ह्याने भावलपूर संस्थानात भागवत धर्माची ध्वजा फडकविली. तेथे ‘कलधारिकी गद्दी’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेला त्याचा आश्रम तसेच त्याची समाधीही आहे. नामदेवांची अनेक मंदिरे आज पंजाबात पहावयास मिळतात. पंजाबातील गुरदासपूर जिल्ह्यात घुमान किंवा घोमान गावी असलेले मंदिर (गुरुद्वारा बाबा नामदेवजी) प्रसिद्धआहे. नामदेवांचे शिष्य बोहरदास यांनी हे मंदिर उभारले, असे म्हणतात. प्रतिवर्षी माघ शुद्ध द्वितीयेस येथे मोठी यात्रा भरते. राजस्थानातआणि उत्तर प्रदेशातही नामदेवमंदिरे आहेत. उत्तर भारतातील रैदास (रविदास किंवा रोहिदास),धना, रज्‍जब, तुलसीदास, पीपा, रामानंद, कबीर आदींनीनामदेवांचा उल्लेख केलेला आहे.

गुजरातमधील विख्यात संत नरसी मेहतांनीही आपल्या काव्यातून नामदेवांचा निर्देश अनेकदा केलेला आहे. देवाने नामदेवांच्या घराचे छप्पर शाकारले, असे राजस्थानातील संत मिराबाईंनी आपल्या एका कवनात म्हटले आहे. उत्तर भारतातप्रसिद्धी पावलेले नामदेव हे दुसरेच कुणी नामदेव असावेत, ही शंका विविध अभ्यासकांनी साधार खोडून काढलेली आहे. ग्रंथसाहिबातील पदांवरील मराठीची छाप, त्यांत येणारा ‘बीठलु’ हा विठ्ठलवाचक शब्द, नामदेवांच्या रूढ चरित्राशी मिळतेजुळते असे ह्या पदांतून येणारे काही उल्लेख पाहता पंजाबात गेलेले नामदेव कुणी वेगळे नव्हते, ही बाब स्पष्ट होते.

ऐंशी वर्षांचे वय झाल्यानंतर इहलोक सोडून जाण्याचे त्यांनी ठरविले. आषाढ शुद्ध एकादशी,शके१२७२ रोजी विठ्ठलापुढे जाऊन ‘आज्ञा द्यावी’ अशी विनंती केली.त्यानंतरआषाढवद्यत्रयोदशी,शके१२७२ह्या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलमंदिराच्या महाद्वारात समाधी घेतली. विठ्ठलदर्शनासाठी येणाऱ्या सर्वसंतसज्‍जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी, ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीखालीच हे समाधिस्थान तयार करण्यात आले होते.

नामदेवांच्या कुटुंबीयांनीहीजनाबाईसह ह्याच दिवशी समाधी घेतली, असे म्हटले जाते. नामदेवांची सून लाडाई हिचे नाव शेवटी गुंफलेला एक अभंग मिळतो. त्यातून मिळणाऱ्या वृत्तांतानुसार लाडाई ही ह्या प्रसंगी कल्याणी येथे प्रसूतीसाठीगेलेली होती; त्यामुळे तिला मात्र ह्या भाग्याला वंचित व्हावे लागले. ‘ऐकिला वृत्तांत सर्व जाले गुप्त।माझेंचि संचित खोटे कैसें।।’ असे उद्‌गार ह्या अभंगात आढळतात. ‘सर्व जाले गुप्त’ ह्या शब्दांचा आधार उपर्युक्त वदंतेस आहे; तथापि नामदेवांच्या वर्तुळातील एक संत परिसा भागवत ह्यांनी मात्र ह्या प्रसंगाचे वर्णन करीत असताना एकट्या नामदेवांच्या समाधीचाच उल्लेख केलेला आहे. शिवाय ह्या समाधीनंतर नामदेवांचा पुत्र विठा किंवा विठ्ठल ह्याने लिहिलेले काही अभंग आहेत.

‘तळहाताची सावली करून तुमची वंशावळी पोशीन असे वचन, हे पांडुरंगा, तू दिल्याचे आमचे वडील आम्हाला सांगत असत; पण ते तू विसरलास’ अशा आशयाची तक्रार विठाने पांडुरंगाला उद्देशून रचिलेल्या एका अभंगातकेल्याचे दिसते. त्यामुळे साऱ्यांनीचसमाधी घेतली, ह्या वदंतेत तथ्य दिसत नाही.

नामदेवांच्यापूर्वचरित्राविषयी वाद आहेत. संत होण्यापूर्वी ते दरवडेखोर होते, असे मत महाराष्ट्रकविचरित्रकार आजगावकरांनी मांडलेले आहे. ह्या मताला नामदेवगाथेतील एका ५६ चरणी अभंगाचा आधार आहे. त्यात नामदेवाविषयी ‘प्राक्तनाचे योगे।भरलासे ओहटा।पाडितसे वाटा चोरांसंगे।। ब्राह्मण, कापडी। गरीब साबडी।केली प्राणघडी बहुतांची।।’ असे म्हटलेले आहे. तथापि हा अभंग त्यात आढळणाऱ्या काही फार्सी शब्दप्रयोगांवरून उत्तरकालीन आणि प्रक्षिप्त वाटतो.नामदेवगाथेत नामदेवांचे आत्मचरित्र म्हणून ओळखले जाणारे १६५ अभंग आहेत.

नामदेवांची पत्‍नीराजाई हिने रुक्मिणीकडे नामदेवांसंबंधी केलेली तक्रार त्यांत आलेली आहे. त्यात राजाई सांगते, की सुई आणि कातर हीच शिंप्याची शस्त्रे असता ‘हा बाण आणि सुरी वागवीतसे’.तथापि उपर्युक्त १६५ अभंगांना नामदेवांचे आत्मचरित्र निःसंदेहपणे म्हणण्यासारखी परिस्थिती नाहीच,हे रा. चिं. ढेरे ह्यांनी दाखवून दिले आहे. वर उल्लेखिलेल्या ५६ चरणी अभंगातच नव्हे, तर ह्या तथाकथित आत्मचरित्रातही अन्य काही ठिकाणीही बरेच फार्सी शब्द आलेले आहेत. शिवाय त्यात एके ठिकाणी नामदेवांच्या तोंडून कबीर आणि रोहिदास ह्या उत्तरकालीन संतांची स्तुती वदविली आहे. त्यामुळे नामदेवांनंतर काही शतकांनी कुणी तरी हे अभंग लिहिले असावेत, असे मत ढेरे ह्यांनी मांडलेले आहे.

नामदेवांनी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती, असे म्हटले जाते; तथापि ती त्यांना पूर्ण करता आली, असे दिसत नाही. नामदेवांचे म्हणता येतील असे सु. पाच-सहाशे अभंगच आज उपलब्ध होतात.नामदेवगाथांमध्ये अंतर्भूत असलेले पुष्कळसे अभंग नामदेवांचे वाटत नाहीत.⇨ विष्णुदास नामानावाचा एक संत सोळाव्या शतकात होऊन गेला. त्याचे पुष्कळसे अभंग नामदेवांचे म्हणून समजण्याची चूक घडत आलेली आहे.नामदेवगाथांत ह्या विष्णुदास नाम्याचे, तसेच ‘नामदेव’ आणि ‘नामा यशंवत’ ह्या दोन अन्य नामदेवांचे अभंगही अंतर्भूत आहेत. आजही खरीखुरी नामदेवगाथा निर्णायकपणे निश्चित करणे अभ्यासकांनाशक्य झालेले नाही. अशा ह्या गाथांतून जे अभंग सामान्यतः नामदेवांचेमानलेजातात त्यांत ‘आदि’, ‘तीर्थावळी’ आणि ‘समाधी’ अशा तीन प्रकरणांत सांगितलेलेज्ञानेश्वरचरित्रआहे.त्या आधारे ते ज्ञानेश्वरांचे आद्य चरित्रकार समजले जातात; परंतु हेचरित्रसुद्धा खरोखरच नामदेवकृत आहे किंवा काय, ह्या बद्दलही ढेरे ह्यांच्यासारख्या साक्षेपी अभ्यासकांनी शंका व्यक्त केलेली आहे.त्याचरित्राची निवेदनशैली पौराणिक आहे.

नामदेवांसारखा समकालीन करणार नाही अशा चुकाही त्यात आहेत.साधी पण भावोत्कट अभिव्यक्ती हे नामदेवांच्या म्हणून मानल्यागेलेल्या बहुतेकरचनांचेवैशिष्ट्य आहे.शब्दकळेचे प्राचीनत्वही ह्या रचनांतून लक्षणीयपणे प्रत्ययास येते. नामदेवांच्या उत्कट ईश्वरभक्तीचा अत्यंत विलोभनीय असा आविष्कारत्यांतआढळतो.पहाटेच्या वेळी चारा आणावयासजाणाऱ्या पक्षिणीची वाट तिचे उपाशी पिलू पाहात राहते;तशीच ईश्वरचरणांची आस आपणासरात्रंदिवस लागली असल्याचे त्यांनी एका अभंगात म्हटले आहे.‘भेटीलागेमाझाफुटतसेप्राण’, असा आवेग व्यक्तविणारे नामदेव प्रसंगी देवावर रुसून ‘पतितपावन नाम ऐकूनी आलो मी द्वारा। पतितपावन नव्हेसी म्हणूनी जातो माघारा’ असे बोलही त्याला ऐकवितात; परंतु देवावरचा त्यांचा रुसवाही भक्तीचे एक निरागस रूप म्हणून पुढे येतो, कारण विठ्ठलाशी त्यांनी जोडलेले नाते मूल माऊलीचे आहे.‘तू माझी माऊली मी तुझे वासरू । नको पान्हा चोरू पांडुरंगे।’ असा त्यांचा आर्तोद्‌गार ह्याच नात्यातून सहजपणे उमटतो. ‘विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन।’विठ्ठलस्मरण प्रेमपान्हा।।’व‘विठ्ठलचि पाही सर्वांभूती ’ ह्या शब्दांत त्यांनी आपल्या जीवनाचा आशय सांगून टाकलेला आहे.विठ्ठलाचे हे सर्वांभूती असणे ग्रंथसाहिबात अंतर्भूत असलेल्या आपल्या पदांतूनही नामदेव आवर्जून सांगतात (जत्र जाऊ तत बिठलू भैला).

एका पदात आपल्या व्यवसायावर एक रूपक करून त्यातून आपले अंतःकरण हरीशी शिवले गेले असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे(सुईने की सुई रूपे का धागा।नामे का चितु हरि सउ लागा।।).नामदेवांचे म्हणून सांगितले जाणारे एक चित्र लॉरेन्सबिनयन आणि आर्नोल्ड ह्यांच्या द कोर्ट पेंटर्स ऑफ द ग्रँड मुघल्सह्यापुस्तकात दिलेले आढळते.धाबळी पांघरलेले आणि गळ्यात तुळशीमाळ घातलेले नामदेव विविध हिंदू-मुसलमान साधूंसमवेत त्यात दाखविलेले आहेत. नामदेवांच्या चित्रावर त्यांचे नावही अरबी लिपीत आहे.मात्र हे चित्र समकालीन नसून सतराव्या शतकातले आहे.

संदर्भ:१.आजगावकर, ज. र. श्री नामदेवमहाराज आणि त्यांचे समकालीन संत, मुंबई, १९२७.
२.ढेरे, रा. चिं. संपा. संतांच्याआत्मकथा, पुणे, १९६७.
३. ढेरे, रा. चिं. संपा. संतांच्याचरित्रकथा, पुणे, १९६७.
४.तुळपुळे, शं. गो. पांचसंतकवी,पुणे, १९४८.
५. भावे, वि. ल.महाराष्ट्र-सारस्वत (शं. गो. तुळपुळेह्यांच्यापुरवणीसह),मुंबई, १९६३.
६.महाराष्ट्र शासन, श्रीनामदेवचरित्र,काव्यआणिकार्य,मुंबई, १९७०.
७.मुळे, मा. आ. श्रीनामदेवचरित्र, पुणे, १८९२,पुनर्मुद्रण १९५२.
कुलकर्णी, अ. र.
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती व कार्य मराठी।
संत नामदेव महाराज
संत नामदेव महाराजांचे संपूर्ण नाव – नामदेव दामा शेटी

संत नामदेव महाराजांचा जन्म – 26 ऑक्टोंबर 1270

संत नामदेव महाराजांचे गाव – नरसी ब्राम्हणी (मूळ गाव सांगितले जाते)

संत नामदेव महाराजांची आईचे नाव – गोणाई

संत नामदेव महाराजांच्या वडिलांचे नाव – दामा शेटी

संत नामदेव महाराजांच्या पत्नी चे नाव – राजाई

संत नामदेव महाराजांचे मुले – नारायण,महादेव,गोविंद,विठ्ठल, लिंबाई

संत नामदेव महाराजांचा संप्रदाय – नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय

संत नामदेव महाराजांचे गुरू – विसोबा खेचर

भाषा – मराठी हिंदी

संत नामदेव महाराजांचे शिष्य – चोखामेळा

संत नामदेव महाराजांची साहित्य रचना – शब्द किर्तन,अभंग गाथा,अभंग भक्ती ,कविता.

संत नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडामध्ये होऊन गेले.वारकरी संप्रदायाचे संत नामदेव महाराज एक प्रचारक आणि प्रसारक होते.नामदेव महाराजांचे जीवनामध्ये ते आद्य प्रणेते होते. पांडुरंगाला बोलायला लावणारे नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते.

संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून संपूर्ण भारतामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम केले.भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी केले.संत नामदेव यांचे वडील दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील होते.त्यांचा व्यवसाय कपडे शिवणे म्हणजेच शिंपी होते.सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव म्हणून ओळखले जाते.

संत नामदेव यांना एकूण ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभले.त्यांचे बालपण हे पंढरपूर मध्ये गेले.त्यांनी लहानपणापासूनच विठ्ठलाची भक्ती केली.संत गोरा कुंभार यांच्याकडे निवृत्तीनाथ ,ज्ञानेश्र्वर महाराज, सोपानदेव मुक्ताबाई ,संत नामदेव, चोखामेळा ,विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता.त्यावेळी संत ज्ञानेश्र्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.

संत नामदेव यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी राजाई ,मोठी बहीण आऊबाई, नारा विठा गोंदा महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा त्यांचा परिवार होता. त्यांचे कुटुंबही मोठे होते एकूण पंधरा माणसे त्यांच्या कुटुंबामध्ये होते.स्वतःला नामाची दासी म्हणून संबोधणारे संत जनाबाई यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.संत नामदेवांनी 2500 अभंग लिहिले असून त्यांनी इतर या भाषेमध्ये सुद्धा काही अभंगरचना केली आहे.

📌संत नामदेव महाराज यांच्याविषयी आख्यायिका
संत नामदेव लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते की, “आज देवाला प्रसाद तूच दाखवायचा, त्यादिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवा पुढे वाट बघत बसले , हा देव माझा प्रसाद खाईल, त्या अत्यंत निरागस अपेक्षाला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला. ” असे सांगितले जाते की, “कुत्र्याने चपाती पळवली,त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज यांनी तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे लागले होते.” संत नामदेव महाराज हे सतत विठ्ठलाचे भक्ती करत असत .

एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा नागनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असता तेथे भजन-कीर्तन न करण्याठी पुजाऱ्यांनी त्यांना विनवले त्यांच्या विनंतीस मान ठेवून नामदेव महाराजांनी मंदिराच्या मागच्या बाजूला बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करून नामदेवाचे भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वभिमुख असलेले दर्शन मंदिर फिरून पश्चिमाभिमुख केले. ते आजतागायत तसेच आहे असे सांगितले जाते.

📌संत नामदेव यांचे सामाजिक/सांप्रदायिक कार्य
संत नामदेव यांनी उत्तर भारतामध्ये जवळजवळ 54 ते 55 वर्ष समाज जागृतीसाठी व आध्यात्मिक कार्यासाठी झटत राहिले.संत नामदेव महाराज यांनी संत ज्ञानदेव,संत तुकाराम,संत रामदास व संत एकनाथ यांसोबत आपले अध्यात्मिक कार्य केले.

भागवत धर्माची शिकवण त्यांनी उत्तर भारता पर्यंत पोहचवली.तेथे त्यांनी पंजाब, राजस्थान,गुजरात, अध्यात्मिक कार्य केले.त्याठिकाणी संत नामदेव महाराज यांचे मंदिरे आहेत.विख्यात संत नरशी मेहता हे गुजरात मधील असून त्यांनी आपल्या काव्यात संत नामदेव महाराज यांचा उल्लेख केला आहे.तसेच राजस्थान मधील संत मिराबई यांनी आपल्या काव्यात नामदेवाने घराचे छप्पर शाकारले असे म्हटले आहे.

संत नामदेव महाराज समकालीन संत होते.भागवत धर्माची शिकवण त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर पोहचवण्याचे व समाजाला भक्ती मार्गाने जाण्याची शिकवण दिली.त्या काळात मुस्लिम राज्यकर्ते समजला त्रास देत होते,अशा काळात त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले.

कर्मकांडापासून लोकांना मुक्त करण्याचा प्रयत्न केला.दुःखी लोकांना उपदेश करून नामस्मरण करण्यास सांगितले.” विठ्ठल आवडी प्रेमभावे, आधी रचली पंढरी. मग वैकुंठ नगरी. “पंढरीचा महिमा त्यांनी “देह जावो अथवा राहो,माझे तीर्थ पांढरी .”असे ते सांगतात.नामदेवांनी विठ्ठल विषयीची भावना श्रद्धा आणि प्रेम हे आपल्या अभंगातून मांडलेली आहे संत नामदेव महाराज यांनी त्यांच्या रसाळ वाणी जीवन अर्थपूर्ण भंगाची सांगणाऱ्या कितीतरी कथा प्रचलित आहेत.

भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेव महाराजांनी जवळजवळ पन्नास वर्ष भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आढळून येतो अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे काम त्यांनी केले पंजाबमधील शीख बांधवांना त्यांनी भक्तिमार्ग शिकवला.

📌संत नामदेव महाराज यांच्याशी संबंधित असलेले साहित्य
✔नामदेव गाथा

✔नामदेव चरित्र

✔संत नामदेव कवित्व आणि संतत्व

✔चरिरांतनाचा ज्ञानदीप

✔श्री नामदेव महाराज चरित्र

✔संत नामदेव महाराज यांच्याशी संबंधित अनेक साहित्य असून ते वाचण्यासारखे आहे.

📌संत नामदेव महाराज यांची समाधी
संत नामदेव महाराज यांनी वयाच्या 80 व्या वर्षी समाधानाने आपला देह ठेवला, संत नामदेव महाराजांचा मृत्यू शनिवार, 3 जुलै 1350 रोजी झाला.पांडुरंगाच्या दर्शनाला येणार्‍या भक्त यांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागावी म्हणून त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महादरवाजा च्या पायरीखाली त्यांची समाधी बांधण्यात आली त्या जागेला पायरीचा दगड असे ओळखले जाते. दुसरी समाधी पंजाब मधील घुमान येथे आहे असे शीख बांधव समजतात..

संत नामदेव संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *