ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.४४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ४४  

हरपली सत्ता मुराली वासना । सांवळाचि नयना दिसतसे ॥ काय करूं माय सांवळा श्रीकृष्ण ।

सांगितला प्रश्न निवृत्तीनें ॥ बापरखुमादेविवरू सांवळीये तेज । सेजबाज निज कृष्णसुखे ॥

अर्थ:-

 त्या सावळ्या मूर्तीला पाहिले व माझी वासना मुरोन गेली व माझी माझ्यावरची सत्ता लोप पावली. निवृत्तिनाथांनी त्याच्या बद्दल सांगितल्या पासुन मला काय झाले ते कळत नाही त्यांने मला व्यापुन टाकले आहे.

माझे पिता व रखुमाईचा पती असलेल्या त्या सावळ्यारुपाने मला येवढे मोहित केले आहे की सेजे बाजे वर पहुडलो तरी तोच जाणवत राहतो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *