संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १८१ ते १८५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

आमचा साचार आमचा विचार अभंग क्र.१८१

आमचा साचार आमचा विचार । सर्व हरिहर एकरूप ॥
धन्य माझा भाव गुरूचा उपदेश । सर्व ह्रषीकेश दावियेला ॥
हरिवीण दुजे नेणें तो सहजे । तया गुरुराजें अर्पियेलें ॥
हरि हेंचि व्रत हरि हेंचि कथा । हरिचिया पंथा मनोभाव ॥
देहभाव हरि सर्वत्र स्वरूप । एक्या जन्में खेप हरिली माझी ॥
निवृत्ति हरी प्रपंच बोहरी । आपुला शरीरीं हरि केला ॥

अर्थ: शिव व विष्णु हे दोन्ही एकच आहेत हाच आमचा विचार आहे व हाच आमचा आचार झाला आहे. श्री गुरुच्यां उपदेशावर पुर्ण भाव ठेवल्यामुळे त्यांनी मला त्या हृषीकेशाचे स्वरुप दाखवले आहे. त्यामुळे त्या हरि वाचुन दुसरे काही नाही हे कळल्यामुळे जे काही राहिले ते म्हणजे अज्ञान अविद्या मी श्री गुरु गहिनीना अर्पण करुन मी फक्त त्या हरिरुपालाच विनटलो. हरिच माझे व्रत व कथा झाल्यामुळे त्या हरिच्या पंथाला मी मार्गस्थ झालो. त्यामुळे माझा देहभान गळला व मी हरिरुप असल्याची जाणिव झाली व ह्याच जन्मात माझ्या जन्म मरणांच्या खेपातुन सुटका झाली. निवृतिनाथ म्हणतात देहभावालाच संपवुन हरिरुप दिल्यामुळे माझा प्रपंच ही निरसला. किंवा प्रपंच ही हरिरुप झाला.

सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे अभंग क्र.१८२

सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे । प्रत्यक्ष आम्हां दिसे गुरुकृपा ॥
विरालें ते ध्येय ध्यान गेलें मनीं । मनाची उन्मनि एक जाली ॥
ठेला अहंभाव सर्व दिसे देव । निःसंदेह भाव नाहीं आम्हां ॥
निवृत्ति साधन गयनिप्रसादें । सर्व हा गोविन्द सांगतुसे ॥

अर्थ: सर्व शरिरात तो परमात्मा एकत्वाने प्रकाश किंवा चैतन्य रुपाने वसत आहे पण तो फक्त गुरुकृने पाहता येतो. ध्येय ध्याता ध्यान ह्या त्रिपुटीचा निरास त्यानी केल्याने मन उन्मनाची एकच अवस्था झाली किंवा अवस्था लागली. त्या बोधाने अहंभाव गेल्याने सर्वत्र तो परमात्मा पाहता आल्याने माझ्या भावही निसंदेह पणे राहिला नाही.निवृतिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी नामाचे साधन सांगितल्यामुळे सर्वच त्या गोविदांची स्वरुप आहेत ह्याचे भान झाले.

माता पिता नाहीं बंधु बोध कांही अभंग क्र.१८३

माता पिता नाहीं बंधु बोध कांही । सर्वसम डोही वर्तताती ॥
सर्व आम्हा राम भजनीं निष्काम । दिन कळा नेम भजनशीळ ॥
दया वसे देहीं क्षमा ते माधवीं । कासवीं शोभवी जनीं इये ॥
निवृत्ति म्हणे ऐसा गयनि सद्‌गुरु । उपदेश पूरु अमृताचा ॥

अर्थ: आई बाप बंधु हे उपाधीने वेगळे वाटले तरी एकाच वंशाचे असतात तसेच सर्व स्वरुपात तो परमात्मा एकत्वाने असल्याने सर्वा ठायी सम आहे. आम्ही निष्काम राम भजन करतो ते दिन काला नेमावर नाही तर सतत जन करणे ह्या प्रमाणे आहे. कासवीच्या नेत्रातुन केलेल्या प्रेमपान्ह्यामुळे ती पिले जशी शोभुन दिसतात तसे सतत भजनामुळे दया व क्षमा शरिरात उतरल्याने भक्त शोभुन दिसतात. निवृतिनाथ म्हणतात, त्या कासवीच्या सारखा उपदेशाचा पान्हा गुरु गहिनीनी माझ्यावर धरल्या मुळे ते माझे सदगुरु झाले.

पूर्णबोधें धाले आत्मराम धाले अभंग क्र.१८४

पूर्णबोधें धाले आत्मराम धाले । निखळ वोतले पूर्णतत्त्वें ॥
पूर्वपूण्य चोख आम्हांसि सफळ । गयनि कल्लोळ तुषार आम्हां ॥
चंद्र सूर्य कीर्ण आकाश प्रावर्ण । पृथ्वी अंथुरण सर्वकाळ ॥
निवृत्ति म्हणे गुरु धडफुडा । ब्रह्मांडा एवढा अनंत माझा ॥

अर्थ: माझ्या आत्माला गुरुकृपेने पुर्ण बोध झाल्याने मला आत्मरामाचे दर्शन घडले. आमचे पुर्वपुण्य चोख असलाने श्री गुरुनी नामामृत कल्लोळाचे तुशार आम्हावर उडवले.त्यामुळे आम्ही आकाशाचे पांघरुण व पृथ्वीचे आंथरुण करुन चंद्र सुर्याचा प्रकाश सर्वकाळ भोगतो. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथ धडफुडा म्हणजे खरे गुरु असल्याने त्या ब्रह्मांडाचे अनंत स्वरुप मला समजले.

आम्हां जप नाम गुरुखूण सम अभंग क्र.१८५

आम्हां जप नाम गुरुखूण सम । जन वन धाम गुरुचेचि ॥
नेघों कल्पना न चढों वासना । एका पूर्णघना शरण जाऊं ॥
तप हें अमूप नलगे संकल्प । साधितां संकल्प जवळी असे ॥
निवृत्ति म्हणे मज निरोपिलें धन । हेचि ब्रह्मखुण जाणिजेसु ॥

अर्थ: आम्हाला नामजपाची खुण गुरु समानच असल्यामुळे आम्हाला हे जन किंवा वन हे श्रीगुरुंचे आहेत असे वाटते. कोणत्याही कल्पनेत न अडकता वासनेला स्वतवर आरुढ न होऊ दिल्यामुळे मला त्या एकमेव पुर्णघन हरिला शरण जाता आले. तो परमात्मा आमच्या जवळ असल्याने आम्हाला साधनेचे संकल्प न करता अमुप तप करता आले.निवृतिनाथ म्हणतात, तो नाम धनाचा ठेवा श्री गुरु गहिनीनाथानी दिल्यामुळे त्या परब्रह्माची खुण आम्हाला समजली.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *